जिल्ह्यातील अतिसाराच्या साथीबाबत शंभूराज देसाईंचे महत्वाचे विधान; म्हणाले की,

Shambhuraj Desai 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यामध्ये अतिसाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिध्द झाले आहे. यामुळे नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण झाला आहे. तथापि जिल्ह्यामध्ये अतिसाराची कोणत्याही प्रकारची साथ नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. अतिसाराच्या रुग्णांमध्ये वाढ या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री देसाई यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक घेतली. यावेळी … Read more

अखेर खाते वाटप जाहीर ! शिंदे गटाच्या शंभूराज देसाईंना मिळालं ‘हे’ खातं?

Shambhuraj Desai News

कराड प्रतिनिधी । गत आठवडाभरापासून राज्यात सरकारमध्ये खाते वाटपाबाबत सुरु असलेल्या चर्चांना आज पूर्णविराम मिळाले. नव्या शिंदे-पवार-फडणवीस सरकारचे नुकतेच खातेवाटप जाहीर झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले. राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करण्यात आले आहेत. दरम्यान खातेवाटपापूर्वी सातारा जिल्ह्यातील पालकमंत्रिपद व आमदार शंभूराज देसाई यांच्या मंत्रिपदाबाबत … Read more

ठाकरेंकडून फडणवीसांबाबत उच्चारलेल्या ‘त्या’ शब्दाबाबत मंत्री शंभूराजेंची प्रतिक्रिया; म्हणाले की,

Shambhuraj Desai

कराड प्रतिनिधी । शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत वापरलेल्या ‘कलंक’ या शब्दावरून महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यावर आता शिंदे गटाचे नेते तथा पालकमंत्री शंभूराज देसाईंनी प्रतिक्रिया दिली आहे. “उद्धव ठाकरे संयमी नेते आहेत. मात्र, संजय राऊत जवळ असल्याने त्यांच्या सवयीचा परिणाम ठाकरेंवर बहुदा झाला असावा. … Read more

BRS जिल्ह्यातील आगामी सर्व निवडणुका लढवणार; शंकरराव गोडसे यांचं मोठं विधान

jpg 20230709 221642 0000

कराड प्रतिनिधी : तेलंगणाचे राज्य सरकारने मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या आहेत. त्यामुळे शेतीबाबत तेलंगणा पंजाबच्याही पुढे गेले आहे. महाराष्ट्रातील शेतकरीही या पक्षाकडे आकर्षित होत असून आगामी काळात येणाऱ्या सातारा लोकसभेसह जिल्हय़ातील आठही विधानसभा मतदारसंघ तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका BRS (भारत राष्ट्र समिती) लढवणार आहे. बीआरएस हा कोणत्याही पक्षाची … Read more

मोरणा नदीकाठच्या ग्रामस्थांनो सावध रहा…; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

Morna River Dam News

कराड प्रतिनिधी । गेल्या चार ते पाच दिवसांत पाटण तालुक्यात पावसाची संततधार सुरु असल्यामुळे ओढे-नाले खळखळून वाहू लागले आहेत. परिणामी या तालुक्यातील मोरणा (गुरेघर) मध्यम प्रकल्पाच्या पाणीसाठ्यामध्येही झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे मोरणा नदी काठावरील गावातील ग्रामस्थ, नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये, असे आवाहन मोरणा गुरेघर धरण मध्यम प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे. मोरणा गुरेघर … Read more

कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात 24 तासात 1.5 TMC ने वाढ; प्रतिसेकंद 30 हजार क्युसेक पाण्याची आवक

Koyna Dam

सातारा प्रतिनिधी | कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे दमदार पुनरागमन झाले असून गेल्या 24 तासात कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात 1.5 TMC ने वाढ झाली आहे. तसेच धरणात प्रतिसेकंद 30 हजार 266 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. महाबळेश्वरमध्ये विक्रमी 153, नवजामध्ये 124 आणि कोयनानगरमध्ये 98 मिलीमीटर पाऊस झाला आहे. दमदार पाऊस आणि पाण्याची आवक वाढल्याने धरणातील पाणीसाठा … Read more

सातारा जिल्ह्यात पावसाची पश्चिमेकडे पुन्हा रिपरिप; महाबळेश्वर, नवजाचा पावसाची ‘इतकी’ नोंद

Karad Rain News

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सध्या पावसाची रिपरिप सुरु असून पश्चिम भागात गुरुवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे सर्वाधिक १२३ तर महाबळेश्वरला १०४ मिलमीटरची नोंद झाली. तर आता नवजाच्या पावसानेही एक हजार मिलीमीटरचा टप्पा पार केला असून कोयना धरणातील पाणीसाठाही १७ टीएमसीजवळ पोहोचला आहे. मात्र, पेरणींसाठी अजून पावसाची … Read more

‘संवाद-तक्रारदारांशी’ मधून पोलीस साधणार नागरिकांशी थेट संवाद

Police Department

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून अनेक घटना घडत आहेत. कधी चोरी तर कधी मारामारी या घटना घडल्यानंतर पोलिसांकडून तात्काळ कारवाई देखील केली जातेय. मात्र, पोलीस विभागातही अनेकी समस्या आहेत. त्या संबधीत समस्या सोडवण्याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा कार्यालय स्तरावर एक उपक्रम राबविला जात आहे. ‘संवाद तक्रारदारांशी’ हा उपक्रम पोलीस विभागाच्यावतीने राबविला जाय … Read more

सुसाट निघालेल्या दुचाकीवर बिबट्यानं घेतली झेप; पुढं घडलं असं काही…

Leopard Attacked

कराड प्रतिनिधी । बिबट्याकडून अनेकजणांवर हल्ले केल्याची घटना आपण अनेकदा ऐकली आणि पाहिलीही असेल. बिबट्या कधी चालताना पाठीमागून येऊन अचानक झडप घालतो तर कधी दबक्या पावलांनी जनावरांच्या गोठ्यात जाऊन शिकार करतो. अशा या बिबट्याने सुसाट निघालेल्या दुचाकीस्वारावर झडप घालून त्याला जखमी केल्याची घटना पाटण तालुक्यातील चोपदारवाडी ते सूर्यवंशीवाडी रस्त्यादरम्यान घडली आहे. या हल्ल्यात सोनईचीवाडी येथील … Read more

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला

Koyna Dam

कराड प्रतिनिधी । कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह कोयना, नवजा, तापोळा, बामणोली, महाबळेश्वर, कांदाटी खोऱ्यात रिमझिम पाऊस पडत आहे. दोन दिवसांपासून या क्षेत्रात पावसाचा जोर कमी झालेला असून पूर्व भागात पावसाने चांगली उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी रखडलेल्या खरिपाच्या पेरण्या पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत पडलेलय पावसामध्ये महाबळेश्वरने आज १ हजार मिलिमीटर पावसाचा … Read more

ठाकरेंसोबत युतीबाबत मंत्री शंभूराज देसाईंचं मोठं विधान; म्हणाले की, ठाकरेंनी साद घातली तर…

jpg 20230705 003447 0000

कराड प्रतिनिधी | राज्यात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि आता अजित पवार असे तिघांचे मिळून महायुतीचे सरकार आहे. नुकतेच अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत बंडखोरी करत भाजप व शिंदेंसोबत सरकारमध्ये गेल्यामुळे शिंदे गटातील आमदारांची अस्वस्थता बाहेर पडू लागली आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सायंकाळी मंत्री आणि आमदारांची बैठक बोलावली … Read more

नवजात पावसाची जोरदार बॅटींग; 24 तासात ‘इतक्या’ मिलीमीटर पावसाची नोंद

jpg 20230702 124811 0000

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे पावसाने पाठ फिरवली आहे. मात्र, पश्चिम भागात पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळत आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील नवजा येथे गेल्या चोवीस तासात तब्बल 130 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. नवजासह कोयनानगर आणि महाबळेश्वरमधील दमदार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात 1 टीएमसीने वाढ झाली आहे. संपुर्ण सातारा जिल्ह्यात दमदार पावसाला … Read more