पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या गावात ग्रामसभेत धक्काबुक्की; सरपंचांच्या तक्रारीनंतर 10 जणांवर गुन्हा

Patan News 1 jpg

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे पाटण तालुक्यातील गाव असलेल्या मरळीच्या ग्रामसभेत पेयजल योजनेच्या कामावरून वादावादी, धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे. या वादानंतर सरपंचांनी मल्हारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून यावरून दहा जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी घडली. याबाबत सरपंच कांचन संभाजी पाटील (रा. मरळी) यांनी दिलेल्या … Read more

कुणबी दाखल्याबाबत मराठा समन्वयकांनी घेतली पाटणच्या तहसीलदारांची भेट, केली महत्वाची मागणी

Patan News jpg

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सर्वाधिक नोंदी या पाटण तालुक्यात सापडल्या आहेत. ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. अशा बांधवांना कुणबी जात प्रमाणपत्र लवकरात लवकर द्यावे, अशी मागणी मराठा समाजाचे राज्य समन्वयक राजेंद्र निकम यांनी तहसीलदार रमेश पाटील यांच्याकडे केली आहे. पाटण तालुक्यातील सकल मराठा समाज समन्वयकांनी तहसीलदार रमेश पाटील यांची नुकतीच भेट घेतली. … Read more

वाल्मीक पठारावर 4 गव्यांचा युवकावर हल्ला

Karad News 7 1 jpg

कराड प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील वाल्मीक पठारावरील पानेरी गावातील शेतकरी बाबू हरिबा झोरे (वय 32) यांच्यावर 4 गव्यांनी हल्ला केला. या गव्यांच्या हल्ल्यात ते जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ८:३० च्या सुमारास घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पुणेरी बाबू झोरे हे शनिवारी सायंकाळी आईला मुंबईला सोडण्यासाठी ढेबेवाडी येथून परत घरी जात असताना पानेरी … Read more

अखेर ‘त्या’ रात्री तिघांनी मिळून केला त्याचा ‘गेम’

Crime News 5 1 jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील कुसूर येथील एका युवकाचा ढेबेवाडी परिसरात खून झाल्याची घटना घडली सोमवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास ढेबेवाडी परिसरात घडली. संबंधित युवकाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थित मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे. ऋतुराज दिलीप देशमुख (वय 31, रा. कुसूर, ता. कराड) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव होते. या युवकाच्या खून प्रकरणी पोलिसांनी … Read more

वांग-मराठवाडी धरणाच्या बांधकामास मुहूर्त सापडला

Wang Marathwadi Dam News jpg

पाटण प्रतिनिधी । वांग – मराठवाडी धरणाच्या उर्वरित कामास कधी सुरुवात होणार? अशी विचारणा केली जात असताना आता धरणाच्या कामासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. प्रत्यक्षात कामाला मुहूर्त लागला असून कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. धरणाचे काम अंतिम टप्यात आले असून, काही महिन्यांतच धरणाचे काम पूर्ण होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून संघर्षात असलेले मराठवाडी धरण कधी … Read more

गुजरवाडी घाटात चारचाकी गाडी हजार फूट दरीत कोसळली; एक गंभीर जखमी, गाडीचा चक्काचूर

Crime News 20231215 095327 0000 jpg

पाटण प्रतिनिधी | गुजरवाडी, ता. पाटण येथील घाटात तीव्र वळणावरून चारचाकी मारूती अल्टो गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी थेट एक ते दीड हजार फूट खोल दरीत कोसळल्याची घटना गुरूवारी सायंकाळी 5.15 वाजण्याच्या सुमारास घडली. गाडीचा चालक शहाजी व्यंकट भिसे (52, रा. नाडे-नवारस्ता) हा या अपघातात गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांच्यावर पाटण ग्रामीण रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी … Read more

चक्क गावकऱ्यांनी आपल्या घरांना दिली फळे – फुलांची नावे…

Patan Manyachiwadi News jpg

पाटण प्रतिनिधी । आपण एखादे नवे घर बांधले कि त्याची वास्तुशांती करून त्या घराला साजेसं असं नाव देतो. मग कुणी आईची कृपा, आई-वडिलांचा आशीर्वाद तर कुणी त्याला पटेल असे नाव देतो. मात्र, सातारा जिल्ह्यातील एक असं गाव आहे कि त्या गावातील ग्रामस्थांनी एकत्रित येत गावातील प्रत्येक घराला आपल्या आई वडिलांचे नाव न देता चक्क फळे, … Read more

वांग-मराठवाडी प्रकल्पग्रस्तांच्या ‘या’ प्रश्नासाठी प्रांताधिकाऱ्यांसह तहसीलदार सांगली जिल्ह्यात…

Wang Marathwadi Project News jpg

पाटण प्रतिनिधी । वांग – मराठवाडी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे सुमारे १२ ते १५ वर्षापूर्वी सांगली जिल्ह्यातील कडेगांव तालुक्यात शिवाजीनगर तोंडोली, नेवरी तसेच विटा तालुक्यात कार्वे, माऊली, कलंबी आदी ठिकाणी पुनर्वसन झाले होते. त्या ठिकाणी सदर प्रकल्पग्रस्त कायमस्वरूपी स्थायिक झाले आहेत. मात्र, अद्यापही त्यांच्या पाटण तालुक्यातील गावात त्यांची मतदार यादीत नावे तशीच आहेत. ती नावे कमी करण्यासाठी … Read more

कोयनेच्या प्रलयकारी भूकंपास तब्बल 56 वर्षे पूर्ण, ‘त्या’ आठवणींनी आजही उडतो थरकाप…

Earthquake Koyna jpg

पाटण प्रतिनिधी । 11 डिसेंबर 1967 रोजीची ती रात्र ही काळरात्र ठरेल हे कुणाच्या ध्यानीमनी देखील वाटले नसेल कारण बरोबर आजच्या दिवशी 56 वर्षांपूर्वी कोयना परिसरातील महाप्रलंयकारी भूकंप आला होता. या दिवसाला आज 56 वर्षे पूर्ण होत आहेत. 11 डिसेंबर 1967 च्या काळरात्रीने हजारो घरे बेचिराख करत संसार उद्ध्वस्त केले. यामध्ये अनेकांना आपला जीव देखील … Read more

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रांताधिकाऱ्यांकडून ढेबेवाडीत कामाचा आढावा

Special Brief Revision Program News jpg

कराड प्रतिनिधी । मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत पाटण तालुक्यातील ढेबेवाडी व तळमावळे येथील महसूल मंडलातील बीएलओमार्फत मयत मतदारांची यादी बनवून त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कामाचा आज पाटणचे प्रांताधिकारी सुनील गाडे यांनी प्रत्यक्ष भेट देत आढावा घेतला. प्रांताधिकाऱ्यांनी ढेबेवाडी विभागात प्रत्यक्ष पाहणी करून मृत्यूच्या नोंदी नसलेल्या ठिकाणी संबंधित मयत … Read more

अनधिकृत उपसा सिंचन पंप काढून घ्या; अन्यथा कठोर कारवाई करू; कोयना सिंचन विभागाचा इशारा

Koyna Irrigation News jpg

पाटण प्रतिनिधी । कोयना सिंचन व्यवस्थापनाच्या कार्यक्षेत्रातील अनधिकृतपणे पाणी उचलत असलेल्या उपसा सिंचन योजनाधारकांनी आपले उपसा सिंचन पंप तात्काळ काढून घ्यावेत. अन्यथा त्यांच्यावर पाटबंधारे अधिनियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कोयना सिंचन विभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांच्या वतीने देण्यात आला आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत. त्यामुळे जुलै २०२४ अखेर पिण्याचे पाणी … Read more

पाटणमध्ये 40 वर्षाच्या व्यक्तीची धारदार शस्त्राने वार करून हत्या; स्मशानभूमीत आढळला मृतदेह

Crime News 20231203 221749 0000 jpg

पाटण प्रतिनिधी | कराडमध्ये कार्वे नाका येथील भर चौकात शस्त्राने सपासप वार करून तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच पाटणमध्येही एकाचा अज्ञाताने शस्त्राने वार करून खून केल्याची घटना समोर आली आहे. प्रकाश परशुराम पवार (मानेवाडी, सातारा), असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पाटणमध्ये ही थरारक घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. खून झाल्यानंतर संबधित व्यक्तीचा … Read more