पाटणच्या दुर्गम भागातील शाळकरी मुलींनी लिहलं 52 पाणी पुस्तक

Patan News 12 jpg

पाटण प्रतिनिधी । दुर्गम व डोंगरी पाटण तालुक्यात लहान वयात समृध्द दहा लेखिका तयार झाल्या असून त्यांच्या नवनव्या कल्पना प्रत्यक्ष कागदावर उतरवल्या आहेत. गृहपाठ करता-करता चिमुकल्या हातांनी पेन हाती घेत त्या पेनने गृहपाठच नव्हे तर वेगवेगळ्या गोष्टी कागदावर उतरवल्या. या गोष्टींचे पुढे जाऊन पुस्तक तयार झाले. ‘मुळगावच्या मुलांच्या गोष्टी’ या दहा शालेय विद्यार्थीनींनी लिहलेल्या पुस्तकाचे … Read more

पाटणला नगरपंचायतीच्या करवसूली पथकाकडून धडक मोहीम

Patan News 9 jpg

पाटण प्रतिनिधी । पाटण नगरपंचायतीच्या वतीने पाटण शहरात विविध कर वसुली धडक मोहीम राबवण्यात येत आहे. पाटण शहरातील नागरिकांनी आपली घरपट्टी, पाणीपट्टी, व इतर कर नगरपंचायतीचे कार्यालयात अथवा आपल्याला घरी नगरपचायंतीचे कर्मचारी येतील त्याच्याकडे भरावा, अन्यथा पाणी पुरवठा बंद करून थकबाकीदाराचे नावाचे डीजीटल फलकावर चौका चौकात लावले जातील, याची नोंद घ्यावी, असे आवाहन पाटण नगरपंचायतीचे … Read more

जिल्ह्यातील दोन तालुक्यात समावेश होणाऱ्या ‘या’ गावातील पाण्याचा तिढा सुटला

Jangalwadi News 1 jpg

पाटण प्रतिनिधी । आपल्या कानावर ‘एक घाव, दोन तुकडे’, अशी म्हण अनेकदा पडली असेल. मात्र, अशीच म्हण सातारा जिल्ह्यातील पाटण आणि कराड या दोन्ही तालुक्यांचा समावेश होणाऱ्या एका गावाबाबत लागू होतेय. सातारा जिल्ह्यातील जंगलवाडी हे असं गाव आहे कि याचा निम्मा कराड आणि निम्मा पाटण तालुक्यात समावेश आहे. डोंगरावर वसलेल्या आणि सुमारे चारशे लोकवस्ती असलेल्या … Read more

पाटणच्या 540 दरडग्रस्तांसाठीचा घरांचा आराखडा शासनाकडे सादर; 165 कोटी रुपयांचा निधी मंजूर

Patan News 1 1 jpg

पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यात तीन वर्षांपूर्वी मुसळधार पावसाने 8 ठिकाणी भूस्खलन होऊन दरड कोसळल्याची घटना घडली होती. या गावातील 540 दरडग्रस्त कुटुंबांना कायमस्वरुपी घरे देण्याचा शुभारंभ नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात करण्यात आला. शासनाच्या नगर विकास खात्याचा एमएमआरडीए विभाग त्यांना घरे बांधून देणार असल्याचे शासनाने जाहीर केले होते. परंतु, केवळ तीन दिवसांत हा निर्णय … Read more

कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करणार : उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे

Patan News 8 1 jpg

पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यात यंत्रांचा हंगाम सुरु असून येणाऱ्या लोकसभेची सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटण उपविभागीय पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अतिसंवेदनशील गावात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवला असून कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची पूर्णपणे दक्षता घेतली जात आहे. या काळात कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक … Read more

पोलीससह ‘महावितरण’च्या भरतीसंदर्भात पाटण तालुका मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन

Patan News 6 jpg

पाटण प्रतिनिधी । एसईबीसी १० टक्के मराठा आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत महावितरण आणि पोलिस मेगा नोकरभरती थांबवावी आणि सध्या सुरू असलेली मेगा भरती पुढे ढकलावी अशी मागणी पाटण तालुक्यातील सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आली आहे. मराठा समाजबांधवांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागण्यांचे निवेदन प्रांताधिकार्‍यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या एकदिवसीय … Read more

पाटण तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी गव्याच्या हल्ल्यात दोघे जखमी, प्रकृती चिंताजनक

Crime News 20240318 091618 0000 jpg

पाटण प्रतिनिधी | कोयना विभागात गवारेड्यांनी धुमाकूळ घातला आहे. शनिवार कोयनेच्या पश्चिमेकडील घाटमाथा परिसरात गवारेड्याच्या हल्ल्यात रुकसाना आयुब पटेल ही महिला गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर रविवारी पुन्हा गवारेड्याने संगमनगर (धक्का) येथील दोघांवर हल्ला केला आहे. त्यात ते गंभीररीत्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कराडमधील कृष्णा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुभम रामचंद्र बाबर (वय १९) … Read more

गव्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरु

Patan News 5 jpg

पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील घाटमाथा परिसरात जनावरे चरण्यासाठी गेलेल्या रुकसाना अयुब पाटील (वय ४०) महिलेवर गवारेड्याने अचानकपणे हल्ला केल्याची घटना शनिवारी घडली. हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी कराड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिच्यावर आयसीयुमध्ये उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, पाटण तालुक्यातील घाटमाथा परिसरात … Read more

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वाटोळेतील पहिल्या प्रशिक्षण केंद्राच्या प्रकल्प आराखड्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता

Shambhuraj Desai News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । ‘सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील वाटोळे येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाकरिता स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. हे विभागाचे राज्यातील पहिलेच प्रशिक्षण केंद्र असून यामध्ये अद्ययावत अशा सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. या प्रशिक्षण केंद्रासाठी ३४८ कोटी रुपयांच्या प्रकल्प आराखड्यास मान्यता देण्यात आली असून यामुळे विभागातील अधिकारी, जवान, कर्मचारी यांची क्षमता वृद्धी … Read more

कोयनेच्या आपत्कालीन दरवाजातून सांगलीतील सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग सुरु

Koyna News 2 jpg

पाटण प्रतिनिधी । सध्या सांगलीत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात दुष्काळीस्थिती वाढलयामुळे कोयना सिंचन विभागाकडे वारंवार पाणी सोडण्याची मागणी केली जात आहे. या मागणीची दखल घेत कोयना धरणातून सिंचनासाठी विसर्ग वाढविण्यात आला आहे. यासाठी पुन्हा धरणाचे आपत्कालिन दरवाजे खुले करण्यात आले आहे. त्यामुळे धरणाच्या दरवाजातून सांगलीसाठी ५०० आणि पायथा वीजगृहातील २१०० असा २६०० क्यूसेक … Read more

पालकमंत्री देसाईंनी मतदारसंघात घेतला जनता दरबार; प्रत्येक अर्जांवर 2 महिन्याच्या आत कार्यवाही करण्याच्या दिल्या सूचना

Patan News 20240311 070936 0000 jpg

पाटण प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील जनतेच्या प्रशासनाकडे प्रलंबित असलेल्या कामांचा निपटारा होण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. या दरबारात आलेल्या अर्जांवर सकारात्मक निर्णय घ्या, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. पाटण पंचायत समिती येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस … Read more

महिला तक्रारदारांपर्यंत पोलीस 10 मिनिटात पोहोचतील अशी यंत्रणा कार्यान्वित करा : पालकमंत्री शंभूराज देसाई

Patan News 8 jpg

पाटण प्रतिनिधी । “पोलिसांकडे महिलांची तक्रार आल्यास पोलीस कर्मचारी दहा मिनिटाच्या आत त्या तक्रारदार महिले पर्यंत पोहोचेल, अशी यंत्रणा पोलीस विभागाने कारणीत करावी,” असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. पाटण येथील शासकीय विश्रामगृहात महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राबविण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा पालकमंत्री श्री. देसाई यांनी आज घेतला. यावेळी घेतलेल्या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य … Read more