सहकार निवडणुकीसाठी मतदार यादी तयार ठेवा; आयुक्त कवडेंच्या महत्वाच्या सूचना

Satara News 43

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत गुरुवारी सहकार प्राधिकरण सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्याची विभागीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीत सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त अनिल कवडे यांनी सहकारातील निवडणुकीच्या कामासाठी कोणतीही संस्था दाद देत नसल्यास थेट कारवाई करा, निवडणुकीपूर्वी ऑनलाइनसह इतर सर्व कामे पूर्ण करून घ्या, अशा महत्वाच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. … Read more

पुणे-बंगळुरू महामार्गावर मलकापूरच्या हद्दीत कार मालट्रक अपघातात एकजण ठार

Accident News

कराड प्रतिनिधी | पुणे-बंगळुरू महामार्गाकडेला उभ्या मालट्रकला भरधाव कारची पाठीमागून धडक होऊन झालेल्या अपघातात कार ट्रकखाली घुसली. या अपघातात कारमधील एकजण जागीच ठार तर एकजण जखमी झाल्याची घटना पुणे- बंगळुरू महामार्गावर मलकापूर हद्दीत बुधवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर कराड -कोल्हापूर लेनवरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. विष्णू दत्तू सुतार (वय ५५, रा. पिंपळगाव … Read more

महाबळेश्वरला 22 मिलीमीटरची नोंद; कोयना धरणात 33.60 टीएमसीवर पाणीसाठा

Koyna Rain News 1

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात कमी झालेलया पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी सकाळपर्यंत नवजा येथे 20 मिलीमीटर पर्जन्यमान झाले. तर कोयनानगर येथे 13 आणि महाबळेश्वरला 22 मिलीमीटरची नोंद झाली आहे. कोयना धरणातील पाणीसाठाही 33.60 टीएमसीवर पोहोचला आहे. तर सातारा शहरात पावसाची उघडीप कायम राहिली आहे. सातारा जिल्ह्यात मागील एक महिन्यापासून पाऊस पडत असून आतापर्यंत … Read more

जिल्ह्यात दहा हजार हेक्टर क्षेत्रावर सुपर केन नर्सरी द्वारा ऊस लागवड करणार : भाग्यश्री फरांदे

Satara News 20240712 100821 0000

सातारा प्रतिनिधी | ऊसाच्या विक्रमी उत्पादनासाठी जिल्ह्यात दहा हजार हेक्टर क्षेत्रावर सुपर केन नर्सरी द्वारा ऊस लागवड करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे निवृत्त शास्त्रज्ञ व सुपरकेन नर्सरी चे जनक डॉ. बाळकृष्ण जमदग्नी, प्रभारी तालुका कृषी अधिकारी युवराज काटे, रीजनल मॅनेजर विजय आगरे इत्यादी मान्यवर उपस्थित … Read more

फलटणच्या माजी मुख्याधिकार्‍यांसह चौघेजण सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश

Phalatan News 20240712 091400 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण तालुक्यात तत्कालीन मुख्याधिकारी, नगररचनाकार व दोन लिपिकांनी एका कुटुंबाची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे ज्या कुटुंबाची ही जमीन आहे त्यांना कोर्टात हेलपाटे मारावे लागले. प्रकरणात संबंधित अधिकार्‍यांचे निलंबन करणार का? जे चुकीचे घडले त्याची चौकशी करून कारवाई करणार का? असा सवाल आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी विधिमंडळात उपस्थित केला. दरम्यान, यावर … Read more

दिंडीसोबत चालत असलेल्या ज्येष्ठ वारकऱ्याला पाठीमागून ट्रकची धडक; जागीच मृत्यू

Phalatan News 20240712 080439 0000

सातारा प्रतिनिधी | दिंडीसोबत चालत असताना पाठीमागून आलेल्या ट्रकने वारकऱ्याला धडक दिली. त्यानंतर ट्रकच्या पुढच्या चाकाखाली सापडून वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात विडणी, ता. फलटण येथे बुधवार, दि. १० रोजी सकाळी साडेअकरा वाजता झाला. मोतीराम तुळशीराम तायडे (वय ७८, रा. मसला खुर्द, जि. बुलढाणा), असे अपघातात ठार झालेल्या वारकऱ्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती … Read more

शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकासाठी 15 कोटी रुपये निधी मंजूर

Satara News 20240711 221800 0000

सातारा प्रतिनिधी | जावली तालुक्यातील केडंबे गावचे सुपुत्र वीर शहीद तुकाराम ओंबळे यांचे भव्य स्मारक उभारले जावे यासाठी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरु होता. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून राज्य सरकारने ग्रामविकास विभागामार्फत शहीद तुकाराम ओंबळे यांचे स्मारक उभारण्यासाठी १५ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. राज्य सरकारकडून … Read more

सातारा जिल्ह्यात मोठ्या उद्योगांची गुंतवणूक वाढवण्यास प्रयत्न करणार : उदय सामंत

Satara News 42

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याकरिता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक कार्यालय मंजूर केल्याबद्दल जिल्ह्यातील सर्व उद्योजक व मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) च्या पदाधिकाऱ्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेत त्यांचे आभार मानले. यावेळी सातारा जिल्ह्यातील उद्योजकांच्या नवीन प्रस्तावित औद्योगिक वसाहत, ग्रामपंचायत कर व मोठ्या उद्योगांची गुंतवणूक वाढावी यासाठी प्रयत्न करू. तसेच इतर प्रश्नाबाबत सातारा … Read more

जिल्ह्यात एका दिवसात 78 वीजचोऱ्या उघडकीस; ‘महावितरण’च्या भरारी पथकाची धडक कारवाई

Satara News 41

सातारा प्रतिनिधी । महावितरणकडून वितरण व वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात वीजचोरी विरोधी एक दिवसीय विशेष मोहीम करीत राबविण्यात आली. यामध्ये सातारा जिल्ह्यात वीजचोरीच्या ७८ घटना उघडकीस आल्या असून, संबंधितांनी ५ लाख ७४ हजार रुपयांची वीज चोरी केल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास आले आहे. पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांच्या निर्देशानुसार वीजचोरीविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात … Read more

फलटण येथील पालखीतळी स्वच्छता मोहिम; संजीवराजे नाईक निंबाळकरांनी घेतला सहभाग

Phalatan News 1

सातारा प्रतिनिधी । श्री. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या फलटण येथील पालखीतळी आज स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेचा शुभारंभ सातारा जिल्ह्या परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी निंबाळकर यांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी होत स्वच्छता केली. यावेळी विविध पदाधिकारी व विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संजीवराजे … Read more

केळवली धबधब्यात बुडालेल्या कराडच्या सैदापूरातील युवकाचा मृतदेह सापडला

Satara News 40

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील केळवली भागात फिरण्यासाठी गेलेला कराड तालुक्यातील सैदापूर येथील २२ वर्षीय ऋषिकेश कांबळे हा युवक धबधब्यात पाय घसरून पडल्याची घटना आठवडाभरपूर्वी घडली होती. यानंतर संबंधित युवकाचा शोध घेण्याचे काम केले जात होते. दरम्यान, धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेलेल्या ऋषिकेशचा मृतदेह आज छत्रपती शिवेंद्रराजे भोसले ट्रेकर्सच्या युवकांनी पोलिसांच्या मदतीने बाहेर काढला. याबाबत … Read more

झाडाणी प्रकरणी ‘या’ दिवशी होणार अंतिम सुनावणी; चंद्रकांत वळवींनी दिली कबुली

Satara News 39

सातारा प्रतिनिधी । सध्या राज्यात गाजत असलेल्या महाबळेश्वरमधील झाडाणी येथील तब्बल ६२० एकर जमीन व्यवहार प्रकरणी आज गुरुवारी अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांच्यासमोर पुन्हा सुनावणी पार पडली. यावेळी सुनावणीस गुजरातचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांनी स्वतः उपस्थिती लावली. त्यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांसमोर काही कागदपत्रे सादर केली तर उर्वरित कागदपत्रे सादर करण्यासाठी व म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागितली. … Read more