सातारा पालिकेची पोवई नाक्यावरील अतिक्रमणावर धडक कारवाई

Satara News 20240713 100330 0000

सातारा प्रतिनिधी | पोवई नाक्यावरील टपाल कार्यालयाच्या सुशोभीकरणाला अडथळा ठरणारी सर्व अतिक्रमणे शुक्रवारी पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून हटविण्यात आली. सूचना देऊनही संबंधितांनी टपऱ्या व खाद्यपदार्थांच्या गाड्या न काढल्याने पालिकेला ही कारवाई करावी लागली. टपाल कार्यालयाने मुख्य इमारतीच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेतले आहे. या कामासाठी शासनाकडून अडीच कोटींचा निधी मंजूर झाला असून, पहिल्या टप्प्यात रंगरंगोटी, संरक्षक … Read more

सातारा जिल्ह्यात खरीप हंगाम पेरणी अंतिम टप्प्यात; आतापर्यंत ‘इतक्या’ लाख हेक्टरवर पेरणी पूर्ण

Agriculture News 20240713 083209 0000

सातारा प्रतिनिधी | पेरणीसाठी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील खरीप हंगाम पेरणी अंतिम टप्प्यात असून अडीच लाख हेक्टरवर पूर्ण झाली आहे. हे प्रमाण ८७ टक्के इतके झाले आहे. त्यामुळे यंदा चांगल्या पावसामुळे वेळेत पेरणी पूर्ण होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र हे २ लाख ८८ हजार ४९४ हेक्टर निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये … Read more

वेण्णालेक सांडव्यावरून पाणी वाहू लागले; पाचगणीसह महाबळेश्र्वरकरांचा पाण्याचा प्रश्न मिटला

Venna Lake News 20240713 080403 0000

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर पर्यटनस्थळी गेल्या काही दिवसांपासून बरसणाऱ्या पावसाने वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून गुरुवारी सायंकाळी सांडव्यावरून पाणी वाहू लागले. त्यामुळे महाबळेश्वर व पाचगणी वासियांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे आज अखेर ५५ इंच पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरमध्ये ०१ जून ते ०१ जुलै या एका महिन्यात ८७०.६० मिमी (३४.२७ इंच ) पावसाची नोंद … Read more

मुलीशी झालेल्या वादातून युवकाला विवस्त्र करून चामडी पट्ट्याने जबर मारहाण, खंडाळ्यातील खळबळजनक घटना

Crime News 20240712 220840 0000

सातारा प्रतिनिधी | मुलीशी वाद झाल्याच्या कारणातून दोन अज्ञातांनी खंडाळ्यातील युवकास नग्न करून चामडी पट्टा आणि निरगुडीच्या काठीने जबर मारहाण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. तसेच या घटनेचं संशयितांनी चित्रीकरणही केलं आहे. जखमी युवकावर साताऱ्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दीपक मोहन वायदंडे (रा. खंडाळा), असं जखमी युवकांचं नाव असून याप्रकरणी दोन अज्ञातांवर खंडाळा … Read more

ट्रॅक्टर लावायचे, बोअरच्या मोटार काढून न्यायचे; साताऱ्यात शेतामधून चोरी करणाऱ्या चौघांना पकडले

Crime News 20240712 205744 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरालगतच्या खिंडवाडी परिसरातील शेतातून बोअरवेलमधील विद्युत मोटारी ट्रॅक्टरच्या सहाय्याने चोरुन नेणाऱ्या चाैघांच्या मुसक्या शहर पोलिसांनी आवळल्या. संशयित हे खिंडवाडी गावातीलच आहेत. पोलिसांनी संबंधितांकडून सुमारे साडे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार याप्रकरणी सुरज साहेबराव जाधव (वय ३१), प्रसाद उर्फ बंटी अनिल चव्हाण (वय २५), सुरज अशोक चव्हाण (वय २८) … Read more

विद्यानगर परिसरात पिस्टल विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक; 65 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

Karad Crime News 1

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील सैदापूर गावच्या हद्दीत विद्यानगर परिसरात पिस्टल बाळगून विक्रीसाठी आलेल्या दोघाजणांना कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने आज अटक केली. यावेळी त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल मॅक्झीनस अशा 65 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अभिषेक राजेंद्र नांगरे (वय 23, रा. मोरया कॉम्प्लेक्स आगाशिवनगर, ता. कराड), निकेतन राजेंद्र पाटील … Read more

महाबळेश्वरमध्ये ‘इतक्या’ मिलीमीटर पावसाची नोंद; कोयना धरणाचा पाणीसाठा झाला 33.84 TMC

Patan News 2

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. गुरुवारपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली असून शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना येथे 29 तर नवजाला 47 आणि महाबळेश्वरमध्ये 73 मिलीमीटर झाला. यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढली असून पाणीसाठा 33.84 टीएमसी झाला आहे. परिणामी धरण 32.15 टक्के भरले आहे. सातारा जिल्ह्यातील धरणक्षेत्रातही पावसाने … Read more

‘माझी लाडकी बहीण योजने’च्या अंमलबजावणीसाठी याशनी नागराजन यांच्याकडून मार्गदर्शक सुचना जारी

Satara News 45

सातारा प्रतिनिधी । “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” ही योजना सातारा जिल्ह्यामध्ये महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी तसेच कुटुबातील त्यांची भुमिका मजबुत करण्यासाठी ही योजना शासनामामार्फत जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता, निराधार महिला यांच्या कडून विहीत कालमर्यादेत अर्ज प्राप्त करून सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दीड … Read more

“बाहेर भेट तुला…” म्हणत ‘त्यानं’ सातारा कारागृहात कर्मचाऱ्याला दिली धमकी; पुढ घडलं असं काही…

Satara News 44

सातारा प्रतिनिधी । सातारा येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये एका बंदिवानाने कारागृहातील पोलिस शिपायाला धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. ‘मी बाहेर पिस्तूल उतरवलंय, तुला दाखवतोच तू बाहेर भेट,’ अशी त्याने धमकी दिल्याची घटना बुधवार, दि. १० जुलै रोजी सायंकाळी पावणेसहा वाजता घडली. याप्रकरणी एका बंदिवानावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात … Read more

स्व. शिवाजीराव देसाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त पोलीस अधिक्षकांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Patan News 5

पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील मरळी, दौलतनगर येथे स्व. शिवाजीराव देसाई यांच्या 38 व्या पुण्यतिथी निमित्त 10 वी व 12 वी मध्ये तालुक्यात प्रथम, द्वितीय आणि तृतीय आलेल्या तसेच प्रत्येक केंद्रावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी “विद्यार्थ्यांनी त्यांना जे क्षेत्र आवडते त्या … Read more

सातारा जिल्ह्यात ‘इतक्या’ हजार शेतकऱ्यांनी केली मृद तपासणी!

Satara Agri News

सातारा प्रतिनिधी । शेत जमिनीतील माती तपासल्यानंतर अन्नद्रव्यांचे प्रमाण समजते. त्यानुसार समतोल व योग्य प्रमाणात खताची मात्रा देऊन पीक उत्पादनात वाढ करता येते. यासाठी माती परीक्षण महत्त्वाचे ठरत असून जिल्ह्यातही शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढत आहे. २०२३-२४ वर्षात १३ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी मृद तपासणी केली आहे. तर साडेआठ हजार शेतकऱ्यांना आरोग्यपत्रिकांचे वाटप झाले आहे. जमिनीचे अनेक प्रकार … Read more

कराडात उद्या ठाकरे गटाचा जिल्हास्तरीय मेळावा; आमदार भास्करराव जाधव राहणार उपस्थित

Karad News 15

कराड प्रतिनिधी । नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांनी सुरु केली असून या पार्श्वभूमीवर उद्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जिल्हास्तरीय मेळावा कराड येथे घेण्यात येणार आहे. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी विभागीय संपर्क नेते तथा आमदार भास्करराव जाधव असून ते नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचे … Read more