सातारा-जावलीतील 26 ग्रामपंचायत इमारतींच्या बांधकामासाठी 5 कोटी 20 लाख मंजूर

Satara News 53

सातारा प्रतिनिधी । सातारा – जावली विधानसभा मतदारसंघातील तब्बल 26 ग्रामपंचायतींना आता नवीन इमारती मिळणार आहेत. कारण या ग्रामपंचायतीच्या नवीन इमारत बांधकामासाठी 5 कोटी 20 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रयत्न केले आहेत. राज्याच्या ग्रामविकास विभागामार्फत स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी ही योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून … Read more

पावसाळ्यातील जनावरांच्या उध्दभवणाऱ्या आजारांबाबत जिल्ह्यात शेतकऱ्यांना ‘पशुसंवर्धन’कडून महत्वाचे आवाहन

Satara News 51

सातारा प्रतिनिधी । वातावरण बदल, पावसाचे पाणी व पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण न केल्यामुळे घटसर्प, फऱ्या, पीपीआर व आदी रोगांची जनावरांना लागण होते. यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पाऊस झाल्यामुळे माशा, डासांची उत्पत्ती वाढलेली आहे. मात्र, जनावरांना आजाराची लागण झाल्याचे लक्षात येताच त्यांचे लसीकरण व उपचार करून घेणे आवश्यक आहे. घटसर्प, फऱ्या या आजारांची लागण होऊ नये म्हणून … Read more

कास पुष्पपठार शनिवार-रविवार सुट्टीमुळे पर्यटकांनी हाऊसफुल्ल!

Kas Satara News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात पावसाळ्यात पर्यटन करण्यासाठी अनेक पर्यटनस्थळे आहेत. त्यातील खास असे पर्यटनस्थळ म्हणून कास पुष्पपठारास ओळखले जाते. या ठिकाणी पर्यटनाच्या आनंदासाठी देश- विदेशातील पावले पश्चिमेकडे वळून यवतेश्वर, कास, भांबवली, बामणोलीला पर्यटकांची गर्दी होत आहे. संततधारेमुळे मनमोहक निसर्ग खुणावत असून, पर्यटक मोठ्या प्रमाणावर कास परिसरात दाखल होत आहेत. शनिवार, रविवार सलग सुट्टी असल्याने … Read more

राज्यात परत एकदा महायुतीचे सरकार आणण्यासाठी…; कराडात आ. सदाभाऊ खोत यांचे महत्वाचे विधान

Karad News 23

कराड प्रतिनिधी । विधान परिषदेच्या निवडणुकीत विजय झाल्यानंतर रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी आज कराड येथील दिवंगत यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी भेट देत अभिवादन केले. यावेळी त्यांनी “राज्यात परत एकदा महायुतीचे सरकार आणण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न निश्चितपणाने केले जातील. शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार, गावगाडा यांच्या प्रश्नावरती काम करण्याचा प्रयत्न या आमदारकीच्या माध्यमातून करू,” असे महत्वाचे … Read more

कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; कोयना धरणात ‘इतका’ TMC पाणीसाठा

Koyna Rain News 4

पाटण प्रतिनिधी । आज हवामान विभागाने मुंबई, पुणे, कोकण, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. परिणामी सकाळपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असून पाटण तालुक्यात देखील पावसाने चांगली हजेरी लावली आहे. रविवारी सकाळपर्यंत नवजा येथे 162 मिलीमीटर पर्जन्यमान झाले. तर कोयनानगर येथे 147 आणि महाबळेश्वरला 138 मिलीमीटरची नोंद झाली आहे. धरणातील पाणीसाठा वाढू … Read more

पुणे-बिकानेर-पुणे साप्ताहिक एक्सप्रेसचा मिरजपर्यंत विस्तार

Karad News 22

कराड प्रतिनिधी । पुणे-बिकानेर-पुणे साप्ताहिक एक्सप्रेसचा मिरजपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना आता मिरजमधून थेट बिकानेर जाण्यासाठी नवीन एक्सप्रेस उपलब्ध झाली आहे. या एक्सप्रेसमुळे पुणे जिल्ह्याच्या दक्षिणे सातारा, सांगली आणि कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी सोया झाली असल्याची माहिती रेल्वे सल्लागार समिती सदस्य गोपाल तिवारी यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना … Read more

डॉ. तात्याराव लहानेंच्या उपस्थितीत ‘रोटरी क्लब ऑफ कराड’चा पदग्रहण सोहळा उत्साहात

Karad News 19

कराड प्रतिनिधी । “बदलत्या युगामध्ये आणि धावत्या जगामध्ये आपण डिजिटल तंत्रज्ञानाच्या आहारी गेलो आहोत. डिजिटल तंत्रज्ञान जितके फायदेशीर आहे, तितकेच योग्य काळजी न घेतल्यास ते घातक ही आहे. विशेषतः या डिजिटल साधनांचा वापर करताना डोळ्याची सुरक्षितता जपणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध नेत्रतज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केले. कराड येथील टाऊन हॉलमध्ये शनिवारी रोटरी … Read more

महाबळेश्वरमध्ये विविध मागण्यासाठी दलित विकास आघाडीच्या वतीने आंदोलन

Mahabaleshwar News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर येथे विविध मागण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल दलित विकास आघाडीच्यावतीने पालिकेपुढे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनातून झोपडपट्टी सुरक्षा दल दलित विकास आघाडीच्यावतीने पालिका प्रशासनास निवेदन देण्यात आले. पालिकेने उभारलेल्या सांस्कृतिक भवनाला लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नाव द्यावे, झोपडपट्टीवासीयांना 8अचे उतारे द्यावेत, रामगड रस्त्यावर … Read more

साताऱ्यात भाजप जिल्हा कार्यालयात झळकले दोन्ही राजेंचे फोटो

Satara News 20240714 103221 0000

सातारा प्रतिनिधी | भाजप जिल्हा कार्यालयात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे फोटो लावण्यात आले आहेत. उदयनराजे समर्थक व जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्यामध्ये वाद पेटला असताना अशात दोन्ही राजेंचे फोटो लावण्यात आल्याने त्यांच्या या फोटोंची चर्चा सद्या सुरू आहे. आमदार जयकुमार गोरे हे जिल्हाध्यक्ष असताना, विसावा नाका येथे भाजपचे जिल्हा कार्यालय सुरू करण्यात … Read more

ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर केलेल्या विश्वासघातामुळेच भाजपची घसरगुंडी; भास्कर जाधवांचा भाजपवर निशाणा

Karad News 20240714 093525 0000

कराड प्रतिनिधी | महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना ज्यांच्या बरोबर असते. त्यांनाच महाराष्ट्र सर्वाधिक जागा मिळतात. शिवसेना होती तेव्हा त्यांना २३ जागा मिळाल्या होत्या. मात्र, आता ठाकरेंची शिवसेना नसल्याने ते आता ९ जागांवर घसरले आहेत. शिवसेनेबरोबर केलेल्या विश्वासघातामुळेच भाजपाची घसरगुंडी झाल्याची टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना विभागीय संपर्क नेते आमदार भास्कर … Read more

सातारा जिल्ह्याला हवामान विभागाकडून पावसाचा रेड अलर्ट

Satara News 20240714 081320 0000

सातारा प्रतिनिधी | शनिवारी मुंबईत आणि पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे दोन्ही जिल्ह्यात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. आज देखील हवामान विभागाने मुंबई, पुणे, कोकण, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर रायगड, ठाणे आणि पुण्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज समुद्रसपाटीवरील कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्रात … Read more

दुर्घटना टाळण्यासाठी अधिकारी अ‍ॅक्शन मोडवर; भांबवली, ठोसेघरला भेट

Satara News 20240714 072243 0000

सातारा प्रतिनिधी | पावसाळी पर्यटनाला सुरुवात झाली असून केळवली धबधब्यात बुडून एकाचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर संभाव्य धोका टाळण्याच्या अनुषंगाने प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार नागेश गायकवाड, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी ठोसेघर, कास, भांबवली येथे भेटी देऊन विविध विभागांसमवेत आढावा घेतला. यावेळी त्यांनी विविध उपाययोजनाही सुचवल्या. ठोसेघर परिसरातील मालदेव धरणावर कायमस्वरूपी स्वयंसेवक नेमावा, पाण्यात पर्यटक … Read more