नवीन महाबळेश्वर प्रकल्पामुळे पर्यावरणाची मोठी हानी : डॉ. मधुकर बाचूळकर

Satara News 20241024 165701 0000

सातारा प्रतिनिधी | नवीन महाबळेश्वर प्रकल्पामुळे पर्यावरण उद्ध्वस्त होणार असून जैवविविधतेची मोठी हानी होणार असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध वनस्पतिशास्त्र अभ्यासक आणि निसर्ग तज्ज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर यांनी केले. नवीन महाबळेश्वर गिरिस्थान विकास प्रकल्प प्रारूप आराखड्यासंदर्भात चर्चासत्र पार पडले. यावेळी ते बोलत होते. यावेळी मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे, सुधीर सुकाळे, शौनक कदम, यशवंत आगुंडे, पांडुरंग गोरे … Read more

साताऱ्यातील ‘या’ संग्रहालयास 50 किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्पाला मंजुरी

Satara News 20241024 152106 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ५० किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे. या कामास लवकरच प्रारंभ होणार असून, प्रकल्पामुळे संग्रहालयाच्या वीजबिलात मासिक सुमारे एक लाख रुपयांची बचतही होणार आहे. केंद्र व राज्य शासनाने पारंपरिक ऊर्जा साधनांचा कमीत कमी वापर करुन अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर वाढविण्यासाठी नवनव्या योजना सुरू … Read more

कराड दक्षिणेत ‘पृथ्वीराज’ अन् ‘अतुल’बाबांमध्ये होणार तगडी फाईट; डॉ. अतुल भोसलेंनी भरला उमेदवारी अर्ज

Karad News 20241024 133204 0000

कराड प्रतिनिधी | कराड दक्षिण विधानसभा मतदार संघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, तो ढासळण्यासाठी महायुतीचे कराड दक्षिणचे अधिकृत उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी चांगलीच तयारी केली आहे. यावेळेस देखील विधानसभा निवडणुकीसाठी डॉ. अतुल भोसले यांनी आज सकाळी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी डॉ. सुरेश भोसले, … Read more

ई-केवायसी करा, अन्यथा रेशनकार्ड रद्द; 31 ऑक्टोबर अंतिम मुदत

Satara News 20241024 121256 0000

सातारा प्रतिनिधी | राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत गरीब गरजूंना रेशनधान्य पुरवठा केला जातो. त्या योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना सरकारने ई-केवायसीची अट घातली आहे. योजनेतील बनावट लाभार्थ्यांचा शोध ‘ई-केवायसी’तून लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे. ‘ई-केवायसी’ न केलेल्यांचे रेशनधान्य, तसेच रेशनकार्ड १ नोव्हेंबरपासून बंद होणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत स्वस्तातील … Read more

फलटणमध्ये भाजपला धक्का; माजी नगरसेवक भरत बेडकेसह अजिंक्य बेडके पुन्हा राजेगटात

Phalatan News 20241024 103631 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा फलटणमधील उद्योजक भरत दत्ताजीराव बेडके व त्यांचे चिरंजीव अजिंक्य बेडके यांनी राजेगटप्रणित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून मागील काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. मात्र, त्यांनी पुन्हा माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची बुधवारी सकाळी भेट घेतली. दरम्यान, त्यांनी चर्चा केल्यानंतर सातारा जिल्हा … Read more

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस आजीवन कारावासाची शिक्षा

Crime News 20241024 082718 0000

सातारा प्रतिनिधी | नागझरी (ता. कोरेगाव) येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्याप्रकरणी पतीला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. बाबू बापू जाधव (वय ३६, मूळ रा. नामदेववाडी झोपडपट्टी, सातारा. घटनेवेळी नागझरी) असे शिक्षा मिळालेल्याचे नाव आहे. दिनांक २३/०५/२०२२ रोजी सकाळी ०९.४५ वा. चे सुमारास (नागझरी, ता. कोरेगांव, जि. सातारा) येथे आरोपी बाबु बापु … Read more

शिवसेना ठाकरे गटाची 65 जणांची यादी जाहीर; पाटणमधून हर्षद कदमांना मिळाली उमेदवारी

Patan News 20241023 231122 0000

पाटण प्रतिनिधी | महाविकास आघाडीतील घटकपक्ष राष्ट्रवादी (शरद पवार) आणि काँग्रेस यांच्याशी जागा वाटपासंबंधी अनेक बैठका पार पडल्यानंतर, तिन्ही पक्षांच्या समन्वयातून अंतिम समीकरण ठरल्याने शिवसेना ठाकरे गटाने उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली. ठाकरे गटाने पक्षाने पहिल्या उमेदवारी यादीत विद्यमान आमदारांसह नव्या चेहऱ्यांना देखील संधी देण्यात आलेली आहे. सातारा जिल्ह्यात पाटण विधानसभा मतदार संघात हर्षद कदम … Read more

महावितरणाचा लाचखोर कर्मचारी ‘लाचलुचपत’ विभागाच्या जाळ्यात

Satara News 12 1

सातारा प्रतिनिधी । विजेचा ट्रान्सफॉर्मरवर बसविण्यासाठी सहाशे रुपयांची लाच स्वीकारताना गोंदवले कार्यालयातील लाइन हेल्परला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने छापा घालून रंगेहात पकडले. विशाल लाला जाधव (वय २७) असे संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत माहिती अशी, की पळशी, ता. माण येथील तक्रारदार यांच्या शेतात दोन विद्युत मोटार कनेक्शन असून, … Read more

विधानसभेसाठी जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी 7 उमेदवारी अर्ज दाखल

Satara News 11

सातारा प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीसाठी काल मंगळवारपासून नामनिर्देशनपत्र भरण्याच्या पहिल्या दिवशी ६ नामनिर्देश अर्ज दाखल करण्यात आले. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी ७अर्ज दाखल झाले. यामध्ये फलटण मतदारसंघासाठी १, कोरेगावसाठी २ उमेदवारांचे ३, माणमधून १, कराड उत्तरमधून २ अशी एकूण ७ नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत. विधानसभा निवडणूक प्रक्रियेत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास काल दि. 22 ऑक्टोबर … Read more

साताऱ्यात अजितदादांच्या गटाला मिळाला दुसरा जिल्हाध्यक्ष; निवडणुकीच्या तोंडावर खांद्यावर जिल्ह्याची जबाबदारी

Satara News 10 1

सातारा प्रतिनिधी । मागील वर्षी जुलै महिन्यात राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार महायुतीबरोबर गेले. त्यावेळी राष्ट्रवादीकडे जिल्हाध्यक्षच नव्हता. दोन महिन्यांनंतर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक – निंबाळकर यांची नियुक्ती झाली. पण, वर्षभरातच जिल्हाध्यक्षांनी काडीमोड घेतला. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला गेली दहा दिवसांपासून नवीन जिल्हाध्यक्ष नव्हता. मात्र, अजितदादांनी आता नवीन दुसरा जिल्हाध्यक्ष शोधला … Read more

निवडणूक खर्च पडताळणी निरीक्षकांकडून कराड उत्तर-दक्षिणच्या कामकाजाचा आढावा; अधिकाऱ्यांना केल्या महत्वाच्या सूचना

Karad News 3 1

कराड प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीस्थायी कालपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवरविधानसभा निवडणूक 2024 अंतर्गत भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांच्यावतीने नियुक्त केलेले निवडणूक खर्च पडताळणी निरीक्षक पी. सेंथील यांनी कराड उत्तर व कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघास आज भेट … Read more

निवडणुक आयोगाच्या पथकाकडुन दक्षिणेत वाहनांची तपासणी; ‘उत्तरे’त स्थिर पथके तैनात

Karad News 2 2

कराड प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात होण्यासाठी कराड उत्तर आणि दक्षिण मतदारसंघात मंगळवारपासून मतदार संघाच्या हद्दीसह अनेक ठिकाणी स्थिरपथके तैनात करण्यात आली आहेत. मतदार संघात येणाऱ्या वाहनांची तपासणी करून विनापरवाना ५० हजारांपेक्षा जास्त रोकड, मद्य, शस्त्रे वाहतूक किंवा इतर संशयास्पद वस्तूंची तपासणी केली जाणार आहे. तर दक्षिण विधानसभा मतदार संघात देखील … Read more