साताऱ्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती; 8 मतदारसंघात आता ‘काटे की टक्कर’

Satara News 1 3

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जाहीर झालेली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची उद्या अंतिम तारीख आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात विधानसभेच्या सातारा, कराड उत्तर, कराड दक्षिण, वाई, पाटण, कोरेगाव, फलटण, माण या आठ मतदारसंघात लढती निश्चित झाल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी उमेदवारांमध्ये काटे कि टक्कर पहायला मिळणार आहे. सातारा जिल्ह्यात असलेल्या आठही विधानसभा मतदार संघातून … Read more

सातारा जिल्ह्यातील 594 प्राथमिक शाळांमध्ये आता सीसीटीव्हीची नजर

Satara CCTV News

सातारा प्रतिनिधी | विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने नेहमीच प्राधान्य दिले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील 622 पैकी 594 माध्यमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. उर्वरित शाळांमध्येही कॅमेरे बसवण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत माध्यमिक शिक्षण विभागाने शिक्षण संस्थांशी पत्रव्यवहार करून आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या … Read more

कराड दक्षिणेतून पृथ्वीराज बाबांनी साधेपणाने तर उत्तरेतून मनोज घोरपडेंनी वाजत गाजत भरला अर्ज

Karad News 20241028 131744 0000

कराड प्रतिनिधी | कराड दक्षिण, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सकाळी महायुतीचे कराड उत्तर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार मनोज घोरपडे यांनी तर महाविकास आघाडीतून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी … Read more

जिल्ह्यातून दिवाळीत लालपरी धावणार सुसाट; विविध भागांत वाढविल्या 31 जादा फेऱ्या

ST Bus News

सातारा प्रतिनिधी | दिवाळीच्या सुट्या सुरू असलेल्या प्रत्येकाला या सणानिमित्ताने आपल्या माणसांना भेटण्याची ओढ लागली आहे. हीच मनोकामना लालपरी पूर्ण करणार आहे. या काळात प्रत्येकाचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाने जादा फेऱ्या वाढविल्या आहेत. सातारा जिल्ह्यातून विविध भागात जादा फेऱ्या वाढविल्या आहेत. विविध भागात सरासरी ३१ गाड्या सोडण्यात येणार आहेत. सातारकरांचे … Read more

बिबट्याकडून दुचाकीस्वारांचा पाठलाग; उंडाळे परिसरामध्ये बिबट्यासह २ बछड्यांचा धुमाकूळ

Karad News 11

कराड प्रतिनिधी | उंडाळेसह परिसरात मादी बिबट्या व तिच्या दोन पिल्लांनी – धुमाकूळ घातला आहे. उंडाळे तुळसण रस्त्यावर शनिवारी दिवसभरात दहा ते पंधरा दुचाकीस्वारांचा बिबट्याने पाठलाग केला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उंडाळे व तूळसण फाटा दरम्यान निगडीचा ओढा म्हणून प्रसिद्ध असलेल्या परिसरात शनिवारी दिवसभरात बिबट्या व तिच्या दोन पिल्लांनी शनिवारी दिवसभरात अनेकदा … Read more

कोरेगावात 1,738 अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदान प्रशिक्षण

Koregaon ews

सातारा प्रतिनिधी | कोरेगाव मतदारसंघ निवडणुकीसाठी दोन दिवसांत १ हजार ७३८ अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. केंद्राध्यक्ष तसेच विविध मतदान अधिकारी तसेच सर्वच कर्मचारी यांनी मतदानविषयक आपले कर्तव्य अचूक बजावावे. समन्वयाने काम करावे. एकमेकांमध्ये सामंजस्य ठेवावे आणि मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यास योगदान द्यावे असे आवाहन प्रांताधिकारी अभिजीत नाईक यांनी केले. कोरेगाव मतदारसंघाच्या ३५४ मतदान … Read more

विहेत जिल्हा परिषदेच्या शाळेतील चिमुकल्यांनी पथनाट्याद्वारे केली मतदान जनजागृती

Patan ews

पाटण प्रतिनिधी । निवडणूक विभागाच्या वतीने मतदान जागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. दरम्यान, प्रशासनाच्या मतदान जागृतीमध्ये जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील सहभाग घेतला आहे. पाटण तालुक्यातील विहे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे गावामध्ये जनजागृती केली. “चला जावूया मतदान करायला, मतदानाचा हक्क बजवा मात्रभूमीच शान वाढावा”, 18 वर्षावरील तरुण, वयोवृद्धांनी येत्या 20 नोव्हेंबरला … Read more

शेरेत 12 एकरांतील ऊस जळून खाक; भरदुपारी शॉर्टसर्किटमुळे घडली दुर्घटना

Karad News 20241028 091222 0000

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील शेरे येथील मारुती पाणंद शिवारात रविवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीत १२ एकर ऊस जळाल्याने नुकसान झाले. भर दुपारी आग लागल्याने तिचा वणवा इतका मोठा होता, की काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. बघता बघता सुमारे १२ एकर उसाचे नुकसान झाले. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न झाले. मात्र, त्या प्रयत्नांना यश आले … Read more

पुरुषोत्तम जाधवांकडून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन जिल्हा प्रमुखपदाचा राजीनामा; वाई -खंडाळा- महाबळेश्वर मतदारसंघातून अपक्ष लढणार

Political News 20241028 082402 0000

सातारा प्रतिनिधी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती, कट्टर शिवसैनिक पुरुषोत्तम जाधव यांनी शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख पदाचा व शिवसेना सदस्यत्वाचा आज वर्षा निवासस्थानी जाऊन राजीनामा दिला असून, वाई -खंडाळा -महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून रणांगणात उतरणार आहे, असे पुरुषोत्तम जाधव यांनी जाहीर केले आहे. पुरुषोत्तम जाधव यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे की, गेली अनेक … Read more

कराड नजिक तासवडे टोलनाक्यावर साडेपाच कोटीचे सोने-चांदी ताब्यात; पोलिसांची आणखी एक मोठी कारवाई

Karad News 20241028 072939 0000

कराड प्रतिनिधी | सातारा बाजूकडून कराड शहराच्या दिशेने निघालेल्या कारमधून तब्बल साडेपाच कोटी रुपयांचे सोने आणि चांदीची वाहतूक केली जात असताना पोलिसांकडून ती पकडण्यात आली. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर तासवडे, ता. कराड येथील टोलनाक्यावर रविवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.पोलिसांनी संबंधित कार तसेच सोने व चांदी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी चौकशी सुरू होती. … Read more

महायुतीकडून कराड उत्तरसाठी मनोज घोरपडेंना उमेदवारी जाहीर; उद्याच भरणार अर्ज

Karad News 20241027 214007 0000

कराड प्रतिनिधी | जिल्ह्यातील बहुचर्चित कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू होती. या मतदारसंघामध्ये भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि कराड उत्तरचे निवडणुक प्रमुख मनोज घोरपडे या दोघांमध्ये समेट घडवून आणण्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना अखेर आज यश आले असून शनिवारी मध्यरात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून मनोजदादा घोरपडे यांच्या … Read more

शिवेंद्रसिंहराजें विरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला!; अमित कदमांना सातारा विधानसभेसाठी उमेदवारी

Satara News 18 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जावळी विधानसभा मतदार संघात महायुतीने यापूर्वीच भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinhraje Bhosale) यांची उमेदवारी निश्चित केली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीकौन अर्ज भरण्यास दिवस उरले असताना देखील उमेदवार निश्चित करण्यात आला नव्हता. दरम्यान, आज रविवारी सायंकाळी महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अमित कदम यांना सातारा जावळीची उमेवारी देण्यात आली. तत्पूर्वी कदम … Read more