सातारा-कास रस्त्यावर भरधाव कारचा टायर फुटला;पहा व्हिडिओ

Satara News 20240120 082956 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | भरधाव गाडीचा टायर फुटल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले अन् कारने रस्त्याकडेला असलेल्या हॉटेलच्या भिंतीला धडक दिली. सातारा-कास मार्गावर गुरुवारी दुपारी हा थरारक अपघात झाला. या घटनेच्या वेळी समोरून एक दुचाकीस्वार येत होता. त्याच्या गाडीवर पत्नी आणि मुले होती. सुदैवाने कार रस्त्यातून बाजूला जाऊन हॉटेलच्या संरक्षक भिंतीला धडकली. अन्यथा भीषण अपघात घडला असता. … Read more

साताऱ्यात निघाली हेल्मेट सुरक्षा अन् नो-हॉर्न रॅली

Satara News 20240119 201655 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | केंद्र शासनाच्या निर्देशानुसार रस्ते सुरक्षिततेबाबतच्या जनजागृतीसाठी सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस विभाग सातारा, महामार्ग पोलीस, वाहतूक शाखा सातारा व सातारा रायडर्स यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून हेल्मेट सुरक्षा रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, महामार्ग पोलीस विभागाचे कर्मचारी तसेच जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा यांचे अधिकारी व … Read more

पंतप्रधानांच्या ऑनलाईन उपस्थितीत साताऱ्यात झाला महत्वाच्या योजनेचा सोहळा, दोन्ही राजेंची उपस्थिती

Satara News 20240119 145846 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरास पाणीपुरवठा करणार्‍या कास जलवाहिनी वाढीव कामाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन द्वारे आज करण्यात आला. यावेळी खा. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. अमृत २.० योजनेअंतर्गत पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज राज्यातील 6-7 प्रकल्पांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. त्यामध्ये कास धरण जलवाहिनी कामाचाही समावेश करण्यात … Read more

सातारा तालुक्यातील ‘ड’ वर्गातील सहकारी संस्थांची मतदार यादी प्रसिद्ध

Satara News 20240119 122155 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा तालुक्यातील ‘ड’ वर्गातील 7 सहकारी संस्थांचा संचालक मंडळ पंचवार्षीक निवडणूक येणाऱ्या काळात होणार आहे. ही निवडणूक पार पाडण्यासाठी सदर सहकारी संस्थाच्या प्रारुप मतदार यादी अंतिम करण्याचा कार्यक्रम व प्रारुप मतदार यादी या कार्यालयाच्या व संस्थेच्या नोटीस बोर्डावर 18 जानेवारी 2024 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. दरम्यान, प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर ज्या … Read more

कालगावच्या ‘कालभैरव’ पॅनेलच्या विजयी उमेदवारांचा आ. बाळासाहेब पाटलांच्या हस्ते सत्कार

20240119 120345 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील कालगाव बेलवाडी चिंचणीची पंचवार्षिक निवडणुक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत कालभैरव जय हनुमान शेतकरी विकास पॅनेलच्या सर्व उमेदवारांनी 9/0 असा विजय संपादन केला. सर्व विजयी उमेदवारांनी ग्रामस्थांसमवेत राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री आ. बाळासाहेब पाटील यांची कराड येथील संपर्क कार्यालय सदिच्छा भेट घेतली. यावेळी आ. बाळासाहेब पाटील यांनी त्यांचे … Read more

दहिवडी-नातेपुते मार्गावर अज्ञात वाहनाची बसली तरसाला धडक, पुढं घडलं असं काही…

Satara News 20240119 102220 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | दरवर्षी अज्ञात वाहनांच्या धडकेत अनेक वन्य प्राण्यांचा मृत्यू होतो. अशीच एक घटना माण तालुक्यातील दहिवडी-नातेपुते मार्गावर वावरहिरे येथे घडली. या ठिकाणी तरस हा वन्य प्राणी मृतावस्थेत आढळून आला आहे. दहिवडी-नातेपुते मार्गावर वावरहिरे येथे असणाऱ्या मोठ्या पुलाजवळ असलेल्या बाभळीच्या झाडाखाली तरस मृतावस्थेत आढळून आला. तरसाला अज्ञात वाहनाची धडक बसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला … Read more

कराड – पाटण मार्गावर ट्रक – दुचाकीचा भीषण अपघात

Karad News 20240119 083445 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड-चिपळूण मार्गावर वारूंजी गावच्या हद्दीत ट्रक व दुचाकीचा अपघात झाल्याची घटना गुरुवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला. निखील हणमंत जाधव (वय 19, रा. म्होप्रे, ता. कराड) असे अपघातात मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कराड तालुक्यातील म्होप्रे येथील युवक निखील जाधव … Read more

भाजप आ. शिवेंद्रराजे भोसलेसह 48 जणांबाबत न्यायालयाकडून निर्णय

20240118 234832 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लघन केल्या प्रकरणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह ४८ जणांची जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. सातारा शहरात ६ ऑक्टोबर २०१७ रोजी आनेवाडी टोल नाक्यावरून वाद झाला होता. शासकीय विश्रामगृह येथे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांकडून याप्रकरणावरून गोंधळ घालण्यास आला होता. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लघंन केल्याच्या कारणातून सातारा शहर … Read more

शिरवळात पार पडले शेळीसह कुक्कुट पालन प्रशिक्षण

Copy of Satara News 20240118 184805 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | जागतिक बँक अर्थसहाय्यित मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिरवळ येथे नुकतेच ‘शेळी व परसातील कुक्कुट पालन प्रशिक्षण’ या विषयावर प्रशिक्षण पार पडले. यावेळी पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाने यांनी दृकश्राव्य प्रणालीद्वारे उपस्थित प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. यावेळी … Read more

दुष्काळी स्थितीच्या उपाययोजनांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डुडींनी दिल्या ‘या’ सूचना

Satara News 20240118 180521 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | चालू वर्षी अत्यल्प पर्जन्यमान झाले असल्याने दि.11 नोव्हे. 2023 च्या शासन निर्णयानुसार, 75 टक्केपेक्षा कमी पर्जन्यमान झालेले असे सातारा जिल्हयामध्ये 65 मंडलांचा समावेश आहे. याशिवाय नवीन 12 मंडलांचा प्रस्ताव केलेला आहे. या मंडलांमध्ये दुष्काळ घोषित झाल्यानंतर त्या अनुषंगाने सवलती, कर्जवसूली स्थगिती, शालेय विद्यार्थ्यांची परिक्षा फी माफी, रोजगार कामांमध्ये काही प्रमाणात शिथिलता, पिण्याच्या … Read more

खासदार उदयनराजेंनी वाईच्या गणपती घाटावर केली स्वच्छता, भिंतीवर रेखाटलं ‘कमळ’

Wai News 20240118 161155 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | अयोध्येतील मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्याचे आवाहन केल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील वाईतील गणपती घाटावर स्वच्छता केली. वाईच्या महागणपतीचे दर्शन घेऊन त्यांनी घाटावर स्वच्छता केली. साक्षात श्रीगणेशाची सेवा करत असल्याची भावना मनात निर्माण झाल्याची प्रतिक्रिया उदयनराजेंनी व्यक्त केली. मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद… अयोध्येत श्रीराम मंदिरात … Read more

पोलिसांनी घरफोडीतील चोरट्याला ठोकल्या बेड्या; 6.40 लाखांचा मुद्देमाल जप्त

Copy of Crime News 20240118 150534 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | खटाव तालुक्यातील चोराडे येथे साडे तीन महिन्यांपूर्वी अज्ञात चोरट्याने महालक्ष्मी सव्हिसिंग सेंटरमध्ये प्रवेश करत ६ लाख १० हजार रुपये किमतीचे साऊंडी सिस्टीम, स्पीकर, एम्पीफायर असे साहित्य चोरून नेले होते. या चोरीचा छडा लावण्यात औंध पोलिसांना यश आले असून त्यांनी चोरट्यास अटक करत त्याच्याकडून मुद्देमाल व दुचाकी असा एकूण ६ लाख ४० हजाराचा … Read more