Koyana Dam : कोयना धरण क्षेत्रात मागील २४ तास नॉनस्टॉप पाऊस! नदीकाठच्या गावांना अलर्ट जारी, पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार..

Koyana Dam

सातारा प्रतिनिधी । कोयना धरणाच्या (Koyana Dam) पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्यामुळे धरणांमध्ये आवक वाढली आहे. सध्या कोयना धरणाच्या पायथा विद्युत गृहाचे एक युनिट कार्यान्वित असून कोयना नदीमध्ये 1050 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे. मागील २४ तासात नॉनस्टॉप पाऊस सुरु असल्याने पाणीपातळीत वाढ झाली आहे. उद्या दि. 27 जुलै 2023 रोजी दुपारी 4:00 … Read more

50 हजारांची मागितली लाच; ACB कडून मंडलाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

ACB News

कराड प्रतिनिधी । तक्रारदाराने जमिनीतून स्वखर्चाने गाळ, मुरूम, माती काढून वाहतूक करण्याकरिता भाड्याने वापरलेली वाहने जप्त करू नयेत म्हणून लाचेची मागणी करणाऱ्या पिंपोडे बु. ता. कोरेगाव येथील मांडलाधिकाऱ्यावर आज लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केला. संबंधिताने सुरुवातीला 50 हजारांची लाचेची मागणी केली होती. नंतर 40 हजार रूपयांवर तडजोड केल्या प्रकरणी कारवाई करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक … Read more

मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर कराडात पोलिसांचे संचलन

Karad City Police Movement News

कराड प्रतिनिधी । मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर कराड शहरातील अंतर्गत मार्गावरून बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कराड शहर व तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या पथकाने संचलन केले. यावेळी कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली 1 पोलीस निरीक्षक, बारा पोलीस अधिकारी, 38 पोलीस अंमलदार वाहतूक, 1 आरसीपी पथक, 24 होमगार्ड यांचा संचलनात सहभाग घेतला होता. बुधवारी सायंकाळी सहा … Read more

Mumbai High Court चा सातारा न्यायालयातील 2 न्यायमूर्तींना दणका ! दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

Satara Court News

सातारा प्रतिनिधी । मुंबई उच्च न्यायालयाच्यावतीने आज एक महत्वपूर्ण आदेश देण्यात आला. यामध्ये सातारा न्यायालयातील दोन न्यायमूर्तींना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. दिलेल्या आदेशानुसार एका न्यायमूर्तींना पदावनतीला सामोरे जावे लागले असून दुसऱ्या न्यायमूर्तींना तात्काळ बदली आदेश देण्यात आले आहेत. याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहिती अशी की, काही महिन्यांपूर्वी सातारा बार असोसिएशनने प्रमुख सत्र व जिल्हा … Read more

कराड – चिपळूण मार्गावरील कुंभार्ली घाटात दरड कोसळल्याने रस्ता खचला

Kumbharli Ghat Karad-Chiplun Road News

पाटण प्रतिनिधी । सध्या सातारा व रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस कोसळत असल्याने घाट मार्गावरील रस्त्यावर दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. या ठिकाणी प्रशासनाकडून तत्काळ उपाययोजना केल्या जात आहेत. दरम्यान कराड – चिपळूण मार्गावरील कुंभार्ली घाटातील मार्गावरील सोनपात्र वळणावरील दरड कोसळून रस्ता खचून गेला असल्याची घटना घडली आहे. या ठिकाणी कोणतेही अपघात होऊ नये यासाठी तात्पुरत्या उपाययोजना … Read more

इर्शाळवाडीहून NDRF ची टीम थेट कराडात दाखल

NDRF Team Karad News

कराड प्रतिनिधी । रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळ दुर्गम भागात असलेल्या इर्शाळ गडाच्या पायथ्याशी आदिवासी पाड्यावर दरड कोसळल्याची दुर्घटना नुकतीच घडली. या ठिकाणचे बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर NDRF ची टीम आज बुधवारी दुपारी 3 वाजता कराडात दाखल झाली. सातारा जिल्ह्यात हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे अतिवृष्टी होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली … Read more

कराड तालुक्यात 3 बिबट्यांची दहशत; रात्रीस ‘या’ गावात वावर

3 Leopards Agai Karad News

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यात रात्रीच्यावेळी अगोदरच चोरट्यांकडून धुमाकूळ घेतला जात असताना आता तालुक्यात तब्बल 3 बिबटे आढळल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कराड तालुक्यातील वराडे गावच्या हद्दीत मंगळवारी रात्री ठीक 1 वाजून 34 मिनिटांनी रस्त्यावरून जात असलेली या बिबट्यांची दृश्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. याबाबत अधिक माहिती की, कराड तालुक्यातील वराडे गाव … Read more

अवैध गुटखा वाहतुकीवर शाहुपूरी पोलीसांची धडक कारवाई, एक जणास अटक; 92 हजाराचा मुद्देमाल जप्त

Gutkha News

सातारा प्रतिनिधी । साताऱ्यातील शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या वतीने सातारा शहरामध्ये तंबाखु जन्य पदार्थाची विक्री व वाहतुक करणाऱ्या एका युवकास ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून सुमारे 92 हजार 130 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. अन्वर नजीर सय्यद (वय 45, रा. 203 बुधवार पेठ सातारा ता. जि. सातारा) असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत … Read more

कराडात कारगिल शौर्य दिन साजरा; विजय दिवस चौकात स्मृतीस्तंभाला अभिवादन

Kargil Valor Day is celebrated in Karad News

कराड प्रतिनिधी । 26 जुलै 1999 रोजी कारगिल युद्धामध्ये भारताने विजय संपादन केले. या विजयाप्रित्यर्थ हा दिवस ‘कारगिल शौर्य दिन’ म्हणून कराड येथे साजरा केला जातो. आज बुधवारी सकाळी येथील विजय दिवस चौकात विजय दिवस समारोह समिती व त्रिशक्ती फाउंडेशन यांच्या वतीने कारगिल शौर्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी विजय दिवस चौकात असणाऱ्या विजयस्तंभाला मान्यवरांच्या हस्ते … Read more

साताऱ्यातील फुटक्या तलावातील हजारो माश्यांचा मृत्यू

Death of Fish Futka Lake Satara News 1

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील प्रसिद्ध असलेल्या फुटक्या तलावातील हजारो मासे आज, बुधवारी सकाळी अचानक मृत्युमुखी पडले आहेत. या घडलेल्या प्रकारानंतर पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी काही नागरिकांच्या मदतीने तलावातील मृत पावलेले मासे तात्काळ बाहेर काढले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या फुटके तळे आहे. या … Read more

कासकडे जाणाऱ्या मार्गावर भेगा पडल्याने 2 बस अडकल्‍या

Kas lake in Satara News

कराड प्रतिनिधी । सध्या महाबळेश्वर, पाटण तालुक्यात पाऊस कोसळत असल्यामुळे या ठिकाणचे धबधबे ओसंडून वाहत आहेत. तसेच तलावही भरल्याने त्या ठिकाणी पर्यटकांकडून गर्दी केली जात आहे. मात्र, पावसाळ्यात दरडी कोसळणे, भेगा पडणे आदी घटना घडत आहेत. अशीच घटना बुधवारी सकाळी घडली. साताऱ्याच्या कास पठाराकडे घाटाईदेवी मार्गे जाणाऱ्या रस्त्याला मधोमध भेगा पडल्या आहेत. त्‍यामुळे या मार्गावरून … Read more

तुला जिवंत सोडत नाही म्हणत ‘त्यांनी’ युवकावर केला कोयत्याने हल्ला

Karad City Police

कराड प्रतिनिधी । कराडात पूर्ववैमन्यातून हल्ल्याच्या घटना घडण्याचे प्रमाण वाढले आहे. अशीच घटना कराड येथील सह्याद्री दूध डेअरीसमोर घडली. आपल्या आजीचे औषध आणण्यासाठी गेलेल्या एका युवकावर धारदार कोयत्याने ४ जणांनी कोयत्याने वार केले. ही घटना कराड शहरातील मंगळवार पेठेत मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली असून या हल्ल्यात आयेजरजा अल्ताफ मुजावर (वय १९, रा. गुरूवार पेठ, कराड) … Read more