ध्वजारोहणानंतर पोहण्यासाठी ‘त्या’ दोघांनी पाण्यात टाकल्या उड्या; पुढं घडलं असं काही….

Satara News 1 1 jpg

सातारा प्रतिनिधी । 15 ऑगस्टचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम केल्यानंतर सुट्टी असल्याने दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास दोघं मित्रांनी मस्तपैकी पोहण्याचा प्लॅन केला. थोडं खाल्यानंतर घरापासून काही अंतरावर असलेल्या एका बंधाऱ्यावर पोहचले. अंगावरचे कपडे काढून दोघांनी एकामागून एक पाण्यात उड्या टाकल्या आणि दोघांवर काळाने घाला घातला. हि दुर्दैवी घटना सातारा शहरातील जानकर कॉलनी परिसरात घडली. यामध्ये दोघा शाळकरी … Read more

चांदोली अभयारण्य परिसरात 3. 4 रिश्टेर स्केलचा भूकंपाचा धक्का; कोयनेला जाणवली सौम्य लक्षणे

Earthquake News 20230816 102538 0000 jpg

पाटण प्रतिनिधी | कोल्हापूर सातारासह सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चांदोली अभयारण्य परिसरात आज बुधवारी सकाळी 6.48 वाजता 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची सौम्य लक्षणे भूकंपाच्या केंद्र बिंदूपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या पाटण तालुक्याला जाणवली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली 5 किलोमीटर खोल होता. कोल्हापूरपासून 76 किमी अंतरावर चांदोली अभयारण्य … Read more

पोलिस सेवेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सातारा जिल्ह्यातील माया मोरे यांना पदक

Maya More

सातारा – पोलीस सेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलीस पदके जाहीर करण्यात आली आहेत. त्यामध्ये मुंबईतील पोलीस उपायुक्त (एसीपी) माया मोरे यांचा समावेश असून त्यांना प्रसंशनीय कामगिरीसाठी पोलीस पदक जाहीर झाले आहे. माया मोरे या मोरेवाडी-कुठरे (ता. पाटण) येथील असून आरेवाडी (ता. कराड) हे त्यांचे माहेर आहे. पदक जाहीर झाल्यााबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा … Read more

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अमृत महोत्सव समारंभास कराडच्या प्रीतिसंगमावरून ‘यशवंत ज्योती’ने प्रारंभ

Karad News 1 1 jpg

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मंगळवार दि. 15 ऑगस्ट रोजी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. या निमित्ताने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला कराड ते सातारा अशी नेण्यात येणारी यशवंत ज्योत कराडच्या प्रीतीसंगमावर यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, जेष्ठ संचालक विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते प्रज्वलित … Read more

साताऱ्यात अतिक्रमणांवर ‘सार्वजनिक बांधकाम’चा हातोडा; 3 अतिक्रमणे जमीनदोस्त

Satara News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात वाढत असलेल्या अतिक्रमणाविरोधात पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कारवाई सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारी शहरातील आरटीओ चौकातील अतिक्रमणांवर सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई करीत 3 बांधकामे जमीनदोस्त केली. सातारा शहरात पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेविले पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. साताच्यातील … Read more

“आजच लग्न कर,”असं म्हणत ‘त्यानं’ युवतीला जबरदस्तीनं गाडीत बसवलं; पुढं घडलं असं काही…

Karad Crime News jpg

कराड प्रतिनिधी । भर दुपारी ती आपल्या घरामध्ये झोपली होती. इतक्यात कुणीतरी दरवाजात आल्याचं तिनं पाहिलं. दरवाजापुढं जाताच तो सात ते आठ जणांसह उभा असलेला तिनं पाहिला. मग क्षणाचाही विलंब न लावता तो म्हणाला, हे बघ मी तयार होऊन आलोय, आपण दोघं आजच लग्न करू, असं त्यानं बोलताच तिला धक्का बसला. काही करणार इतक्यात त्यानं … Read more

कराडात 2800 विद्यार्थ्यांसह अवतरले भगतसिंग, राजगुरू अन् सुखदेव…

Karad News jpg

कराड प्रतिनिधी । आपण सर्वजण 15 ऑगस्ट रोजी ‘स्वातंत्र्यदिन’ साजरा करण्यासाठी सज्ज झालो आहोत. या स्वातंत्र्यदिनाची जय्यत तयारी सध्या शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांच्या ठिकाणी केली जात आहे. उद्या होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर तसेच भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत कराड येथील शाळा क्रमांक तीनच्या वतीने काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत सुमारे … Read more

उदयनराजेंची जिप्सी राईड, चाहत्यांना दिला ‘फ्लाईंग किस’!

Udayanaraje Bhosale Flying Kiss jpg

सातारा प्रतिनिधी । आपल्या हटके स्टाईल आणि डायलॉगमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या साताऱ्याचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा जिप्सी राईड केली आहे. यावेळी खा. उदयनराजे भोसले यांनी फ्लाईंग किस दिली आहे. त्यांच्या या फ्लाईंग किसचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकसभा सभागृहात राहुल गांधींनी दिलेल्या ‘फ्लाईंग किस’वरून मोठा गदारोळ झाला होता. मात्र, … Read more

सातारा सेतू कार्यालयातील गैरव्यवहाराचा अहवाल प्रांतांकडून जिल्हाधिकाऱ्यांना सादर

Satara News 5 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा तहसीलदार कार्यालयाच्या आवारात असलेल्या सेतू कार्यालयातील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी झालेल्या तक्रारीची चौकशी प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी केली आहे. सदर चौकशीचा अहवाल प्रांताधिकारी कार्यालयाकडून जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना देण्यात आला आहे. या अहवालानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी नेमकी काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा सेतू … Read more

कराड जनता बॅंक कर्ज प्रकरणी बँकेच्या अध्यक्षांसह 27 जणांची चौकशी करा!

Karad Janata Bank News jpg

कराड प्रतिनिधी । कराड जनता सहकारी बँकेच्या 296 कर्मचाऱ्यांच्या नावावर काढलेल्या 4 कोटी 62 लाख 87 हजारांच्या कर्ज प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कारण बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राजेश पाटील- वाठारकर याच्यांसह 27 जणांसह बँकेचे अवसायानिकांच्या चौकशी करण्याचे आदेश कराड येथील फौजदारी न्यायाधीश एम. व्ही. भागवत यांनी नुकतेच दिले आहेत. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याची … Read more

पोलीस असल्याचे भासवून वृद्ध महिलेचे दागिने केले लंपास; भामटे CCTV कॅमेऱ्यात कैद

Karad Crime News 2 jpg

कराड प्रतिनिधी । कराड शहरात गेल्या अनेक दिवसांपासून धूम स्टाईलने महिलांच्या गळ्यातील दागिने लूटण्याच्या घटना घडत आहेत. दरम्यान, पोलिस असल्याचे भासवत कराड शहरातील शुक्रवार पेठेतील एका महिलेची 80 हजार रुपये किमतीची दोन तोळे सोन्याची माळ दोघा भामट्यांनी लंपास केल्याची घटना नुकतीच घडली आहे. दरम्यान, या घटनेतील दोन भामटे सीसीटिव्ही कॅमेरेमध्ये कैद झाले आहेत. याबाबत पोलिसांनी … Read more

भरधाव वेगाने निघालेल्या पिकअप गाडीचा अचानक फुटला टायर; पुढं घडलं असं काही…

Satara Accident News jpg

सातारा प्रतिनिधी । पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाई तालुक्यातील अनवडी येथे रविवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास अपघाताची घटना घडली. पुण्याकडून साताऱ्याकडे निघालेल्या पिकअप गाडीचा अचानक टायर फुटल्याने गाडी पलटी झाली. यामध्ये एकजण किरकोळ जखमी झाला आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळाली माहिती अशी की, पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून एमएच ११ डीडी ००६८ हि पिकअप गाडी पुण्याहून सातारच्या … Read more