माझ्याकडचे 2 लाखाचे औषध घ्या मग महिला गरोदर होईल असं म्हणून भोंदूगिरी करणारी टोळी गजाआड

Satara News 6

सातारा – अपत्य प्राप्तीच्या अमिष दाखवून भोंदूगिरी करत लाखो रूपयांना गंडा घालणाऱ्या चौघांच्या टोळीला तळबीड पोलिसांनी गजाआड केले आहे. संशयितांना आज कराड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली. राहुल धरमगिरी गोसावी, अश्विन अशोक गोसावी, शैलेश सुरेश गोसावी आणि देवेंद्र ज्ञानेश्वर पवार, अशी संशयितांची नावे आहेत. तीन संशयित हे धुळे जिल्ह्यातील … Read more

सातारा जिल्ह्यात आज पत्रकरांच्यावतीने पत्रकार संरक्षण कायद्याची होळी

Jarnalist News 20230817 091258 0000 jpg

कराड प्रतिनिधी । पत्रकारांना संरक्षण मिळावे, यासाठी पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आल्‍यानंतरही पत्रकारांवरील हल्‍ले वाढतच राहिले आहेत. जबाबदार लोकप्रतिनिधींकडूनही पत्रकारांवर हल्‍ले होत असल्‍याने त्‍या निषेधार्थ सातारा जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने आज, गुरुवार, दि. १७ ऑगस्‍ट रोजी दुपारी १२ वाजता सातारा जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर तसेच तालुका स्‍तरावर त्‍या त्‍या सर्व तहसील कार्यालयांसमोर पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करुन … Read more

1 वर्षांपासून ‘तो’ देत होता गुंगारा, अखेर पोलिसांनी केले जेरबंद

Satara Local Crime Branch News

सातारा प्रतिनिधी । तब्बल एक वर्षांपासून गुंगारा देत फिरत असलेल्या मोक्कातील एका आरोपीस जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकास यश आले आहे. पिन्या उर्फ सुनील माणिकराव शिरतोडे (रा. पाडळी सातारारोड, ता. कोरेगाव) असे आरोपीचे नाव असून त्याला फलटण तालुक्यातून अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त … Read more

उत्कृष्ट कार्याबाबत कराडचे मानद वन्यजीवरक्षक रोहन भाटे यांचा कोल्हापुरात वन विभागातर्फे सन्मान

Forest Department Wildlife Warden Rohan Bhate jpg

कराड प्रतिनिधी । वन क्षेत्रातील गुन्हे उघडकीस आणणे व वनसंरक्षण, वनसंवर्धन, जनजागरण यामध्ये कराडचे मानद वन्यजीवरक्षक रोहन भाटे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत मंगळवारी स्वातंत्र्यदिनी कोल्हापुरात वन विभागाच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले. कोल्हापुरात मंगळवारी वन विभागाच्या वतीने स्वातंत्र्यदिन व अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्र मधील … Read more

भाजप नेत्या चित्राताई वाघ यांच्या उपस्थिती कराडात शुक्रवारी कृष्णा महिला पतसंस्थेचा स्नेहमेळावा

Chitratai Wagh jpg

कराड प्रतिनिधी । येथील कृष्णा महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या ओगलेवाडी (ता. कराड) येथील नूतन शाखेचा शुभारंभ शुक्रवार, दि. 18 रोजी भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा सौ. चित्राताई वाघ यांच्या हस्ते होणार आहे. यानिमित्त त्यांच्या प्रमुख उपस्थितीत कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन (टाऊन हॉल) येथे सकाळी 11 वाजता महिला स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या … Read more

साताऱ्यातील भर रस्त्यात ‘ते’ हातात कोयता घेऊन फिरत होते; पुढं घडला हा प्रकार…

Shahupuri Police Station Satara

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात कोयता गॅंग पुन्हा सक्रिय झाली आहे का? तसेच या कोयत्या गॅंगला पोलिसांचा धाक राहिलेला नाही का? असा प्रश्न अनेकदा पडतो. कारण कुणी रात्रीच्यावेळी तर कुणी दिवसाढवळ्या हातात कोयता घेऊन फिरताना दिसतो. अशीच घटना सातारा शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर काही तरुणांनी कोयता आणि तलवार घेऊन फिरताना आढळून आल्याची घडली आहे. याप्रकरणी शाहूपुरी … Read more

राज्यातील सर्व निर्णय फडणवीसांच्या हाती तर मुख्यमंत्री शिंदे BJP च्या हातातील बाहुली : पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan Eknath Shinde Devendra Fadnavis News jpg

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्यातील सर्व निर्णय हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच घेतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फक्त नावापुरते मुख्यमंत्री आहेत. फडणवीस सांगतील तसे त्यांना वागावे लागते. त्यामुळे एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या हातातील बाहुली आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. माढा लोकसभा मतदारसंघातील माण, खटाव … Read more

‘द्रौपदी से द्रौपदी तक’ लिहिलेल्या साड्या नेसून साताऱ्यात ‘परिवर्तनवादी’च्या महिलांकडून निषेध; नेमकं प्रकरण काय?

Satara News 3 2 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा येथील परिवर्तनवादी संघटनांच्या महिला कार्यकर्त्यांकडून ‘द्रौपदी से द्रौपदी तक’ अशा आशयाची एक चळवळ राबविली जात आहे. या संघटनेच्या महिलांनी काल साताऱ्यात स्वातंत्र्यदिनी ‘द्रौपदी से द्रौपदी तक’ लिहिलेल्या साड्या नेसून ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी शहरातून रॅली काढून मणिपूर येथील घटनेचा निषेधही व्यक्त केला. पुराण काळात ज्याप्रमाणे द्रौपदीचे वस्त्रहरण करत महिलेची … Read more

कोयना धरण 80 टक्के भरले; ‘इतका’ TMC जमा झाला पाणीसाठा

Koyna Dam

पाटण प्रतिनिधी। गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाने आता पुन्हा दडी मारली आहे. दरम्यान, बुधवारी सकाळपर्यंत महाबळेश्वरला अवघा 14 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. अशात पावसाअभावी कोयनेत येणाऱ्या पाण्याची आवक घटली असली तरी धरणातील पाणीसाठ्याने 84 टीएमसीचा टप्पा पार केला आहे. कोयना धरणात सध्या 80.11 टक्के इतक्या … Read more

रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत 6 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह पैशांवर चोरट्यांनी मारला डल्ला

Crime News 1 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील लोणंद परिसरात सध्या चोरटयांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरे बुद्रुक येथील मधुकर कापसे यांच्या घराचे कुलूप तोडून रात्रीच्यावेळी अज्ञात चोरट्यांनी घरातील 6 तोळे सोने व 15 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील पिंपरे बुद्रुक हद्दीतील … Read more

कास योजनेच्या कामामुळे ‘या’ दोन दिवशी साताऱ्यातील पाणीपुरवठा राहणार बंद

Satara News 2 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या कास योजनेच्‍या वाहिनीस लागलेली गळती काढण्‍याचे काम पालिकेच्‍यावतीने हाती घेण्‍यात येणार आहे. त्यामुळे सातारा शहरात गुरुवारी, दि. १७ आणि शुक्रवारी दि. १८ या दोन दिवशी योजनेचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्‍याची माहिती पालिकेचे मुख्‍याधिकारी अभिजित बापट यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. कास योजनेच्‍या वाहिनीस आटाळी व कासाणी गावच्‍या हद्दीत … Read more

1 लाख किंमतीचे देशी बनावटीचे पिस्टल अन् 3 रिकामी काडतूसे जप्त; कराड तालुक्यातील एकास अटक

Crime News jpg

सातारा प्रतिनिधी । स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून नुकतीच देशी बनावटीचे पिस्टल, काडतुसे बाळगणाऱ्या विरुद्ध कारवाईची मोहीम राबविली जात आहे. दरम्यान, 1 देशी बनावटीचे पिस्टल व 3 रिकामी काडतुसे बाळगल्या प्रकारणी कराड तालुक्यातील एकास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून सुमारे सुमारे 1 लाख 15 रुपये किमतीचे पिस्टल व काडतुसे पोलिसांनी ताब्यात … Read more