शहीद जवान अनिल कळसेंच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Karad News 6 1 jpg

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील रेठरे खुर्द येथील भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले अनिल दिनकर कळसे यांना मणिपूर येथे सेवेत असताना अपघातात वीरमरण आले. त्यांच्या पार्थिवावर आज कराड तालुक्यातील रेठरे खुर्द येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण, कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आनंद पाथरकर, गटविकास अधिकारी … Read more

विकसित भारत संकल्प यात्रा 100 टक्के यशस्वी करा – सहसचिव अनिता शहा अकेला

Satara News 15 1 jpg

सातारा प्रतिनिधी । केंद्र शासनाच्या ग्रामीण विकासाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी राबविण्यात येत असलेली ‘विकसित भारत संकल्प यात्रा शंभर टक्के यशस्वी करावी, असे आवाहन, केंद्र शासनाच्या कार्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या सहसचिव अनिता शहा अकेला यांनी केले. विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमाच्या सातारा जिल्ह्यातील सुरु असलेल्या अंमलबजावणीचा आढावा श्रीमती शहा अकेला यांच्या अध्यक्षतेखाली … Read more

खंबाटकी घाटात पुन्हा वाहतूक कोंडी; इंजिन गरम झाल्यानं शंभरहून अधिक वाहनं पडली बंद

Khambataki Ghat News jpg

सातारा प्रतिनिधी । तीन दिवस सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात पर्यटनस्थळी जाण्यासाठी बाहेर पडले आहेत. मात्र, या पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे. कारण पुणे-बंगळुरू महामार्गावरील खंबाटकी घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विकेंडसाठी गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांसाठी मुंबई-पुणे-कोल्हापूर हा मार्ग सोयीचा राहतो. त्यामुळे या महामार्गावरून जास्त वाहनांची रेलचेल असते. … Read more

मांढरदेवीची यात्रा उत्साहात पार पाडण्यासाठी प्रयत्न करावे; तहसीलदार मेटकरी यांच्या सूचना

Satara News 14 1 jpg

सातारा प्रतिनिधी । वाई तालुक्यातील मांढरदेव येथील श्री काळेश्वरी देवीची यात्रा येत्या दि. २४ व २५ जानेवारीला होत आहे. या यात्रेसाठी महिनाभर राज्यातून आणि राज्याबाहेरून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. यात्रा काळात येणाऱ्या सर्व भाविकांना अधिक चांगल्या सुविधा देण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची आहे. त्यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी झोकून देऊन काम करावे, अशा सूचना तहसीलदार सोनाली … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा आढळला पहिला रुग्ण

Satara News 13 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सध्या आरोग्य विभागाकडून सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्य तपासणी मोहीम राबविली जात आहे. ताप थंडीसह खोकल्याचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेकडून अशा रुग्णावर उपचार देखील केले जात आहेत. अशात कोरोनाचे रुग्ण देखील इतर जिल्ह्यात आढळत असल्याने सातारा जिल्हा प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात असताना सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेगाव येथे … Read more

नरबळी कायद्याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबांची अधिवेशनात महत्वाची मागणी; म्हणाले की,

Karad News 5 1 jpg

कराड प्रतिनिधी । राज्याचे हिवाळा अधिवेशन काल पार पडले. यावेळचे अधिवेशन अनेक मुद्यांची चांगलेच गाजले. अधिवेशनात माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी नरबळी बाबत राज्यातील घडलेल्या घटनांबाबत “औचित्याचा मुद्दा” माध्यमातून विधानसभेत प्रश्न उपस्थित केले. यावेळी त्यांनी राज्यात नरबळी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी या कायद्याचे नियम तात्काळ करावेत, अशी आग्रहाची मागणी देखील चव्हाण यांनी केली. ६ … Read more

जिल्ह्यात हाॅटेल्स, ढाब्याच्या वेळेबाबत पोलिसांचा मोठा निर्णय; आता ‘ही’ वेळ होताच होणार शटर डाऊन

Satara News 11 1 jpg

सातारा प्रतिनिधी । रात्रीच्या वेळी हाॅटेल्स, ढाबे निर्धारित वेळेपेक्षा अधिक कालावधीसाठी सुरू राहण्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. याचा विचार करुन पोलिस अधीक्षका समीर शेख यांनी रात्री १० पर्यंत खाद्यपदार्थ पुरविण्यास तर ११ : ३० वाजेपर्यंत आस्थापना बंद करण्याचा मोठा निर्णय जारी केला आहे. यामुळे यापुढे संबंधितांना वेळ पाळावी लागणार आहे. अन्यथा … Read more

खा. उदयनराजेंच्या ‘त्या’ प्रस्तावाला मान्यता देण्याचं केंद्रीयमंत्री राणेंनी दिलं आश्वासन

Satara News 10 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारच्या नियोजित टेक्नॉलॉजी सेंटरसाठी आठ दिवसांत केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिल्या आहेत. प्रस्तावास तत्काळ मान्यता देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना दिले. सातारा येथे मध्यंतरी झालेल्या बिझनेस कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना नारायण राणे यांनी साताऱ्यात टेक्नॉलॉजी सेंटर सुरू करण्याची घोषणा केली होती. … Read more

‘ससून’ रुग्णालय घोटाळ्यामधील मुख्य आरोपी कराडचा; एकाला अटक

Crime News 9 jpg

कराड प्रतिनिधी । ससून रुग्णालयातून 14 डिसेंबर रोजी वैद्यकीय अधिक्षकांच्या कार्यालयातून दोन शिक्के चोरीला गेले होते. येथील रुग्णालयातून वैद्यकीय अधीक्षक आणि डॉक्टरांचे शिक्के चोरुन बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करणाऱ्या दोघं आरोपींमधील एका आरोपीला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली असून, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश पांडुरंग मोंडकर (रा.कणकवली, सिंधुदूर्ग) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव … Read more

काळुबाईचं दर्शन घेऊन परतत असताना नवरा बायकोवर काळाचा घाला

Crime News 8 jpg

कराड प्रतिनिधी । मांढरदेवी येथील काळुबाई देवीचे दर्शन घेऊन आपल्या उंब्रज गावी निघालेल्या दाम्पत्यावर काळाने घाला घातला. वाई-पाचवड रस्त्यालगत पार्किंगला उभा असणाऱ्या ट्रकवर दुचाकी धडकून कराड तालुक्यातील पती-पत्नी जागीच ठार झाली आहेत. सोमनाथ नानासाहेब चव्हाण (वय ४६) रेखा सोमनाथ चव्हाण (वय ४०) रा. लक्ष्मीनगर, उंब्रज, ता. कराड, जि. सातारा अशी त्यांची नावे आहेत. ही घटना … Read more

भर चौकातून सराईत गुन्हेगारांची पोलिसांनी काढली धिंड

Crime News 7 jpg

सातारा प्रतिनिधी । शिरवळ पोलिस स्टेशन हद्दीमध्ये असणाऱ्या अवैध धंदे करणाऱ्यांना शिरवळ पोलिसांनी दणका दिला आहे. या ठिकाणी अवैध धंदे करणाऱ्या २० जणांची पोलिसांनी शिरवळमधून धिंड काढली आहे. शिरवळ पोलिसांनी अवैध धंदे करणाऱ्यांविरुध्द उघडलेल्या धडक कारवाईचा धसका अवैध धंदे करणाऱ्यांनी घेतला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शिरवळ पोलिस स्टेशन हद्दीतील अल्पवयीन पंधरा वर्षीय युवतीच्या … Read more

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पट्टेरी वाघाचे दर्शन; पायांचे ठसे आणि विष्ठाही आढळली

Satara News 8 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील ट्रॅप कॅमेऱ्यात पट्टेरी वाघ कैद झाला आहे. दि. १७ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता ट्रॅप कॅमेऱ्याने वाघाचे फोटो टिपले आहेत. ही बाब अत्यंत आशादायी असून व्याघ्र प्रकल्पातील अधिकाऱ्यांना आता अधिक सतर्क करण्यात आले आहे. वाघाच्या पायाचे ठसे आढळले… सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील दाट जंगल भागात दि. १२ डिसेंबर रोजी पट्टेरी … Read more