देवदर्शनाला गेलेल्या महाबळेश्वरातील तिघांचा महाडच्या सावित्री नदीत बुडून मृत्यु, मृतांमध्ये सख्ख्या भावांचा समावेश

Mahabaleshwar News 20240818 212947 0000

सातारा प्रतिनिधी | महाडमधील सव गावातील दर्ग्यात दर्शनाला गेलेल्या महाबळेश्वरमधील तिघांचा सावित्री नदीत बुडून मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी ही हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळं महाबळेश्वरमधील गवळी मोहल्ल्यावर शोककळा पसरली आहे. महाबळेश्वरमधील तिघांचा महाडमधील सावित्री नदीत बुडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. दर्ग्यात दर्शन घेतल्यानंतर जेटीकडे गेलेल्या एकाचा पाय घसरून तो … Read more

शेतकरी व घरगुती वीजग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Satara News 20240818 201254 0000

सातारा प्रतिनिधी | राज्य शासनाने गेल्या अडीच वर्षांत सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून वीजक्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. राज्यातील ४४ लाख शेतकऱ्यांना एप्रिलपासून पुढील पाच वर्ष मोफत वीज देण्यात येत आहे. तर मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना व मागेल त्यांना सौर कृषिपंप योजनेतून दिवसा वीजपुरवठा करण्यात येणार आहे. सोबतच केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतून घरगुती … Read more

बहिणींच्या खात्यात पैसे जमा होताच विरोधकांची थोबाडं पांढरी फटक झाली; साताऱ्यात मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सणसणीत टोला

Satara News 20240818 171220 0000

सातारा प्रतिनिधी | योजना फसवी आहे, चुनावी जुमला आहे, पैसे येणारच नाहीत, अशी टीका करत सावत्र भावांनी ही योजना बंद पाडण्याचे प्रयत्न केले. मात्र, लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाल्याचे मेसेज पाहून विरोधकांच्या छातीत धडकी भरली. त्यांची थोबाडं पांढरी फटक झाली असल्याचा सणसणीत टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. या योजनेमुळं वेडे झालेल्या विरोधकांना … Read more

जिल्ह्यासह सातारा शहराला पावसाने झोडपले; सर्वत्र पाणीच पाणी

Satara News 20240818 152850 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा दिवसाच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर शनिवारी सायंकाळी पावसाचे जोरदार पुनरागमन झाले. काल आणि आज सातारा शहर व परिसरास ढगफुटीसदृश पावसाने झोडपून काढले.शनिवारी रात्री सोसाट्याचा वारा व विजांच्या कडकडाटात सुमारे तासभर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. जावली तालुक्यातही ठिकठिकाणी पावसाने थैमान घातले. गेल्या काही दिवसांपासून … Read more

लाडकी बहीण योजनेच्या मुदतीची अट काढून टाका; माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाणांची मुख्यमंत्री शिंदेकडे मागणी

Karad News 20240818 142436 0000

कराड प्रतिनिधी | शासनाची मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा सर्व्हर वारंवार बंद असल्याने योजनेमध्ये नोंदणीला विलंब होत असून काही ठिकाणी नोंदणीच होत नसल्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत. ६-६ तास ओटीपी येत नाही. त्यामूळे लाभार्थीना दिवस-दिवसभर आधार केंद्रात ताटकळत बसावे लागत आहे. त्यामुळे अंतिम तारखेपर्यंत नाव नोंदणी होऊ शकणार नाही ही चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे या … Read more

मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान कार्यक्रमासाठी 400 एसटी गाड्यांच बुकींग, शासकीय अधिकाऱ्यांना लावलं कामाला

Satara News 20240818 123652 0000

सातारा प्रतिनिधी | साताऱ्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान सोहळ्याला नेण्यासाठी शिंदे सरकारनं ४०० एसटी बसेस बुक केल्या आहेत. या गाड्या भरण्यासाठी गावोगावच्या तलाठी, ग्रामसेवकाना, कामाला लावल आहे. सकाळी ८ वाजता बसेस गावांमध्ये उभ्या करण्यात आल्या आहेत. मात्र, तीन तास झाले तरी गाड्या निम्म्याही भरलेल्या नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय. कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविकांनाही सक्ती मोठ्या गावांमध्ये प्रत्येकी … Read more

सातारा जिल्ह्यातील 8 हजार 735 लाडक्या बहिणी झाल्या अपात्र

Satara News 20240818 121815 0000

सातारा प्रतिनिधी | राज्य शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या टप्प्यात महिलांच्या खात्यावर दोन महिन्यांचे 3 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात स्वातंत्र्य दिनापर्यंत 5 लाख 12 हजार 367 महिला पात्र ठरल्या आहेत. त्यामुळे या महिलांना सुमारे 153 कोटी 71 लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे, तर केवायसी व इतर कमतरतांमुळे 8 … Read more

साताऱ्यात लाडकी बहीण योजनेचा सन्मान सोहळ्यासाठी वाहतुकीत मोठा बदल

Satara News 20240818 105253 0000

सातारा प्रतिनिधी | साताऱ्यात आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सन्मान सोहळा, वचनपूर्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि अजित पवार आज दुपारी सैनिक स्कूलच्या मैदानावर कार्यक्रम पार पडणार आहे. यानिमित्ताने सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंत वाहतुक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. या कार्यक्रमास पालकमंत्री शंभूराज देसाई, … Read more

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निधीतून कराड ‘फेज 2’ ची सुरूवात – राजेंद्रसिंह यादव

Karad News 20240818 100510 0000

कराड प्रतिनिधी | कराडच्या भुयारी गटर आणि पाणी योजनेच्या अद्ययावतीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०९ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या दोन्ही योजना कराडकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून या माध्यमातून कराड फेज टू या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात झाली असल्याची माहिती यशवंत विकास आघाडी व शिवसेनेचे नेते राजेंद्रसिंह यादव यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. कराड शहराच्या … Read more

सातारा जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी, लाडकी बहीण सोहळ्याचे बॅनर पडले पाण्यात

Satara News 20240818 085921 0000

सातारा प्रतिनिधी | लाडकी बहीण योजनेचा सन्मान सोहळा साताऱ्यात आज होत आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत. मात्र कार्यक्रमाच्या आदल्याच दिवशी (शनिवारी) रात्री साताऱ्यात मुसळधार पावसाने सैनिक स्कूलच्या ग्राऊंडवर चिखल केला. वादळी वारे आणि पावसामुळे लाडकी बहीण वचनपूर्तीचे बॅनर पाण्यात पडले. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे आठवडाभर … Read more

ट्रेनी डॉक्टरच्या हत्येप्रकरणी कोरेगावात निघाला निषेध मोर्चा

Satara News 20240818 082925 0000

सातारा प्रतिनिधी | कोलकाता येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील ट्रेनी डॉक्टरसोबत अत्याचार आणि हत्या केल्यावर देशभरात निषेध आणि आंदोलने सुरु आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनने देखील याबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे शनिवारी कोरेगाव शहर आणि तालुक्यातील सर्व वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात आल्या. कोरेगावातील आंदोलनाला समाजातील सर्वच घटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नगरपंचायत, रोटरी क्लब, इनरव्हील क्लब, केमिस्ट … Read more

विश्रांतीनंतर जिल्ह्यात पाऊस झाला सक्रिय; ढगांच्या गडगडाटासह मुसळधारपणे लावली हजेरी

Satara News 20240817 185353 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात अनेक दिवसापासून पावसाने उघडीप दिल्यानंतर वातावरणात उकाडा निर्माण झाला होता. दरम्यान, जिल्ह्यात आज खऱ्या अर्थाने शनिवारी पाऊस पुन्हा सक्रीय झाला. शुक्रवारी रात्रीपासूनच जिल्ह्यातील अनेक भागात धो-धो पाऊस होण्यास सुरूवात झाली आहे. तर सातारा शहरात आठवड्यानंतर शनिवारी सायंकाळच्या सुमारास ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला. आॅगस्ट उजाडल्यानंतर पावसाचा जोर … Read more