पुसेसावळी दंगलीतील मुख्य फरारी संशयिताला अटक, उद्यापर्यंत पोलीस कोठडी

Crime News 20240903 204137 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी (ता. खटाव) येथे झालेल्या दंगलीतील फरारी असलेल्या मुख्य संशयिताच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. दंगलीच्या घटनेला आठ दिवसांनी वर्ष पूर्ण होत आहे. त्यापूर्वी पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी गावात गतवर्षी झालेल्या दंगल आणि हत्येप्रकरणी फरारी असलेल्या मुख्य संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. नितीन … Read more

गणेश उत्सवापूर्वी मिरवणुक व विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवा – पालकमंत्री शंभूराज देसाई

Satara News 20240903 195707 0000

सातारा प्रतिनिधी | गणेशोत्सवाला येत्या 7 सप्टेंबर पासून सुरुवात होत आहे. गणेशोत्सवापूर्वी नगर पालिका हद्दीतील मिरवणुक मार्गावरील व विसर्जन मार्गावरील खड्डे तात्काळ बुजवावेत तसेच रस्त्यांकडील नाले सफाईही करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात गणेशोत्सव-2024 पूर्वतयारी आढावा बैठक पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी जीवन … Read more

तीन महिन्यांत कोयना धरणातून ‘इतके’ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती

Koyna News 20240903 183816 0000

पाटण प्रतिनिधी | कोयना धरणाच्या तांत्रिक जलवर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत भलेही पाणलोट क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत पाऊस जादा पाण्याची आवकही झाली असली तरी चार जलविद्युत प्रकल्पातून 505.003 दशलक्ष युनिट इतकीच आतापर्यंत वीजनिर्मिती झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत पाणीवापर कमी झाल्याने तब्बल 159.231 दशलक्ष युनिट कमी वीजनिर्मिती झाल्याची तांत्रिक आकडेवारी आहे. जलवर्षात आत्तापर्यंत तीन महिन्यात कोयना जलविद्युत प्रकल्पात … Read more

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी विकास योजनेत घोटाळा, तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी

Satara News 20240903 163023 0000

सातारा प्रतिनिधी | सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेअंतर्गत येणाऱ्या बामणोली वनपरिक्षेत्रातील कारगाव ग्रामपरिस्थितीकीय विकास समितीच्या अध्यक्ष व सचिवांनी संगनमताने बनावट कागदपत्रे तयार करून, कागदोपत्री खरेदी दाखवून मोठ्या प्रमाणात आर्थिक अपहार केल्याचा धक्कादायक खुलासा सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केला. राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रात असणाऱ्या समित्यांमधील भ्रष्टाचाराची … Read more

शाहुपूरी पोलीसांची डॉल्बी मालकावर धडक कारवाई

Satara Crime News 20240903 153813 0000

सातारा प्रतिनिधी | शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सह्याद्री गणेश तरुण मंडळ, कर्तव्य ग्रुप गणेश तरुण मंडळ, अजिंक्यतारा गणेश मंडळांच्या गणेशमूर्ती आगमनावेळी वाजविण्यात आलेल्या डॉल्बी मालकावर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी डॉल्बी सिस्टीम आणि वाहन जप्त केले आहे. शाहुपुरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये गणपती आगमण सोहळयामध्ये मोठयाने डॉल्बी लावुन ध्वनी प्रदुषन अधिनियम 2000 चे उल्लंघन करणाऱ्या डॉल्बी … Read more

भारताला अभिमान वाटावे असेच काम करणार – हणमंतराव गायकवाड

Satara News 20240903 142504 0000

सातारा प्रतिनिधी | काही मित्रांच्या सहकार्याने सुरू केलेल्या भारत विकास ग्रुप या संस्थेचे काम आज वृद्धिंगत होताना सातारा जिल्ह्यामध्ये आज नऊ हजार लोकांना रोजगार मिळाला. आज शंभर जॉब प्रोफाइल तयार आहेत. तसेच 16 देश आपल्या देशाकडून कर्मचाऱ्यांची अपेक्षा करत आहेत आणि हे काम भारत विकास ग्रुपच्या कडून करण्याचे काम मी सुरू ठेवले आहे. आज जिल्ह्याला … Read more

देगावच्या पाझर तलावात पोहायला गेलेल्या एकाचा बुडून मृत्यू

Crime News 20240903 133026 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा तालुक्यातील देगाव येथील पाझर तलावात सोमवारी सायंकाळी पोहण्यासाठी देगाव येथील ३९ वर्षीय व्यक्ती गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला आहे. मंगेश गोविंद साळुंखे, असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मगेश साळुंखे हा पाझर तलावात पोहण्यासाठी गेला होता. पोहताना त्याला पाण्याचा … Read more

शाहूनगर, दरे खुर्द घरफोड्या; 4 लाखांचा ऐवज लंपास

Crime News 20240903 113307 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा शहर परिसरातील शाहूनगर व दरे खुर्द (ता. सातारा) येथे चोरट्यांनी घरफोडी करून खळबळ उडवून दिली. दोन्ही ठिकाणी झालेल्या चोर्‍यांमध्ये सुमारे 4 लाख रुपयांचा ऐवज चोरी झाला आहे. याप्रकरणी सातारा शहर व सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद झाली आहे. ग्रीनसिटी, शाहूनगर येथे झालेल्या घरफोडी प्रकरणी अब्दुल इमाम सय्यद (वय 28) यांनी … Read more

हॉटेल व्यावसायिकाला हनीट्रॅपमध्ये अडकवून उकळली 4 लाखांची खंडणी, महिलेसह सात जणांना अटक

Crime News 20240903 075653 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण शहरातील एका हॉटेल व्यावसायिकाला हनीट्रॅपमध्ये अडकवून अपहरण करत ४ लाखांची खंडणी उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी महिलेसह सात जणांना पोलिसांनी गजाआड केलं आहे. या टोळीने फलटण, लोणंद परिसरात आणखी गुन्हे केले असल्याचा पोलिसांना संशय आहे. हॉटेल व्यावसायिकाला केली मारहाण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीचा फलटणमध्ये हॉटेल व्यवसाय आहे. गेल्या चार महिन्यांपासून … Read more

कुणीही कसलाही दबाव टाकला तर मला भेटा, त्याचा योग्य तो बंदोबस्त करू : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

Ajit Pawar News 20240902 222437 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाची जनसंवाद यात्रा पार पडली. यात्रा संपल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोणत्याही कार्यकर्त्याला जर शासकीय किंवा राजकीय यंत्रणेकडून दबाव टाकून इतर पक्षात येण्याचे आवाहन कोणताही पक्ष करीत असेल तर याबाबत मला थेट येऊन भेटावे!; त्याचा योग्य तो बंदोबस्त … Read more

सत्ता गेल्याच्या नैराश्येतून ‘मविआ’चे राज्यात अशांतता निर्माणचे काम; केशव उपाध्ये यांचा थेट आरोप

Satara News 20240902 203104 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा येथे आज भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र विभाग साेशल मीडियाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महविकास आघाडीवर निशाणा साधला. सत्ता गेल्याच्या नैराश्यातून महाविकास आघाडी महाराष्ट्रात दुही आणि अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. पण, राज्यातील जनताच त्यांना विधानसभा निवडणुकीत उत्तर देईल. छत्रपती … Read more

गणेश विसर्जनासाठी सातार्‍यात यंदा 5 कृत्रिम तळी

Satara News 20240902 172151 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा पालिकेकडून गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. गणेश मंडळांच्या परवान्यांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सातार्‍यात पाच ठिकाणी विसर्जन तळी उभारण्यात येत आहेत. गर्दीची शक्यता असल्याने गोडाली गार्डन आणि बुधवार नाका कृत्रिम तळ्यावर फोकस राहणार आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका प्रशासनाने गणेशोत्सवाचे सूक्ष्म नियोजन … Read more