मायणी मेडिकल कॉलेज प्रकरणात ED ने देशमुखांना घेतले ताब्यात

Mayni News 20240905 110524 0000

सातारा प्रतिनिधी | मायणी मेडिकल कॉलेज प्रकरणात सातारा आर्थिक गुन्‍हे शाखेत हजेरीसाठी आलेल्‍या दीपक देशमुख यांना अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने ताब्यात घेतले. मायणी मेडिकल कॉलेज अपहार प्रकरणातून गुन्‍ह्यांची मालिका दाखल झालेली आहे. वडूज पोलिस ठाणे तेथून सातारा आर्थिक गुन्‍हे शाखा व पुढे ईडीपर्यंत यातील गुन्‍हे वर्ग झालेले आहेत. दीपक देशमुख यांच्यावर मायणी मेडिकल कॉलेज प्रकरणातून २०२३ … Read more

कोयना धरणाचे दरवाजे 4 फुटांनी उघडले, 40 हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडलं

Koyna News 20240905 101227 0000

पाटण प्रतिनिधी | जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून पाऊस होत आहे. जूनमध्ये चांगला पाऊस झाला. तर जुलैमध्ये अतिवृष्टी झाली होती. यामुळे पश्चिम भागातील तळ गाठलेल्या धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. सर्वच धरणे ८० टक्क्यांवर भरली. पूर्व भागात मागील वर्षभर दुष्काळ होता. सततच्या पावसामुळे तलाव आणि धरणांत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक … Read more

कास पठार फुलणाऱ्या हंगामासाठी सज्ज; आज होणार उद्घाटन

Satara News 20240905 090035 0000

सातारा प्रतिनिधी | जिल्ह्यातील कास पठार हे महाराष्ट्रासह देशातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ असून याला महाराष्ट्राची ‘व्हॅली ऑफ फ्लावर’ असेही म्हणतात. सातारा शहरापासून 25 किमीच्य अंतरावर कास पठार वसलेले आहे. दरम्यान, आज खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आज साताऱ्यात यंदाच्या फुलांच्या हंगामाचे अधिकृत उद्घाटन होणार आहे. कास पठारावर 800 पेक्षा अधिक … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘या’ 3 बसस्थानकांच्या इमारतीसाठी 42 कोटी निधीस मंजुरी

Satara News 20240905 081520 0000

सातारा प्रतिनिधी | राज्य परिवहन महामंडळातील सातारा विभागातील महत्वाच्या तीन एसटी आगारातील इमारतीसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला आहे. सातारा, वाई व महाबळेश्वर मध्यवर्ती बसस्थानकाच्या इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी राज्य शासनाच्या गृह विभागाने सुमारे 42 कोटींच्या निधीस मंजुरी दिली आहे. सातारा विभागात पुणे-बंगलोर महामार्गावर मध्यवर्ती बसस्थानक म्हणून सातारा बसस्थानकाची ओळख आहे. या बसस्थानकावर सतत प्रवाशांची वर्दळ असते. … Read more

कराड तालुक्यात ‘इतक्या’ गावात यंदा ‘नो DJ अन् Dolby’

Karad News 20240904 201948 0000

कराड प्रतिनिधी | गणेशोत्सव येत्या काही दिवसांमध्ये ठेपला असल्याने त्याची सर्वत्र तयारी केली जात आहे. उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासन खबरदारी घेत असते. यंदा ही खबरदारीच्या उपाययोजनांबाबत सूचना देण्यासाठी कराड तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पोलिसांनी सूचना केल्या. त्यामध्ये डॉल्बी, डिजे न वापरण्याबाबत सूचना केल्या. यावेळी कराड तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस … Read more

फलटण ते बारामती रस्त्याचे कामकाज अंतिम टप्प्याकडे

Phalatan News 20240904 191701 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण ते बारामती रस्त्याचे कामकाज हे अंतिम टप्प्यात आले आहे. यामध्ये अनेक अडीअडचणी आल्या होत्या त्यामध्ये प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी पुढाकार घेत स्थानिक पदाधिकारी, प्रकल्पग्रस्त शेतकरी व स्थानिक राजकारणी यांच्याशी समन्वय साधत सदरील रस्त्याचे काम युद्धपातळीवर करण्याचे निर्देश दिले. प्रांताधिकारी ढोले यांनी नुकतीच फलटण ते बारामती रस्त्याचे कामकाजाची प्रत्यक्ष भेट देत पाहणी … Read more

गणेश विसर्जनासाठी सातारा शहरातील वाहतुकीत तात्पुरता बदल

Satara News 20240904 172309 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरामध्ये 16 व 17 सप्टेंबर 2024 रोजी सार्वजनिक गणेश मंडळांचे गणपती विसर्जन केले जाते. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 कलम 34 अन्वये त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारान्वये दि. 16 सप्टेंबरच्या 6 वा. पासून 18 सप्टेंबरच्या सकाळी 7 वाजेपर्यंत सातारा शहरातील वाहतुकीमध्ये तात्पुरते बदल केले आहेत. … Read more

चिमुकलीवर कुत्र्याचा हल्ला, आईसमोरच नेले फरपटत; गंभीर जखमी

Karad News 20240904 143104 0000

कराड प्रतिनिधी | घरासमोर आईच्या हाताला धरून चालत निघालेल्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर मोकाट कुत्र्याने हल्ला चढवला. चिमुकलीला जबड्यात पकडून कुत्र्याने तिला सुमारे पन्नास फूट शेतात फरपटत नेले. मात्र, आईने प्रसंगावधान राखून आरडाओरडा केल्यामुळे ग्रामस्थांनी धाव घेत चिमुकलीला कुत्र्याच्या तावडीतून वाचवले. कराड तालुक्यातील कोपर्डे हवेलीत मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अविरा स्वप्नील सरगडे … Read more

माझी शाळा आदर्श शाळा कार्यशाळेचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते उद्घाटन

Satara News 20240904 103516 0000

सातारा प्रतिनिधी | माझी शाळा आदर्श शाळा हा उपक्रम जिल्हा परिषदेतील शाळेंमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ करणारा आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी लोकप्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच, शाळा समितीचे सदस्य, ग्रामस्थ यांनी सहकार्य करून हा उपक्रम जिल्ह्यात यशस्वी करावा, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. जिल्हा परिषदेच्या माझी शाळा आदर्श शाळा उपक्रमांतर्गत स्व. यशवंतराव सभागृहात कार्यशाळेचे आयोजन … Read more

साताऱ्यात बेमुदत आंदोलनामुळं लालपरीची चाकं थांबली, एसटी कर्मचाऱ्यांनी गुणरत्न सदावर्तेच्या वक्तव्याचा केला निषेध

Karad News 20240904 092434 0000

कराड प्रतिनिधी | प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे सातारा विभागातील ९०६ फेऱ्या रद्द झाल्या. प्रवाशी आणि विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. कृती समितीला किडे समिती म्हणणाऱ्या ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या वक्तव्यांचा कर्मचाऱ्यांनी निषेध केला. खासगीकरणाला विरोध आणि प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्याऱ्यांच्या विविध संघटनांच्या कृती समितीने पुकारलेल्या बेमुदत बंदमुळे साताऱ्यात प्रवाशी आणि विद्यार्थ्यांचे हाल झाले. प्रवाशांना … Read more

मुख्यमंत्र्यांच्या ‘लाडकी बहीण’चा गैरफायदा; दाम्पत्याला वडूज पोलिसांनी घेतले ताब्यात

Crime News 20240904 084059 0000

सातारा प्रतिनिधी | राज्यभरातील महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत असतानाच खटाव तालुक्यात गैरकारभार झाल्याचे निष्पन्न झाले. या योजनेतील पैसे घेण्यासाठी महिलेने विविध पेहरावांत सेल्फी घेऊन फोटो अपलोड केले. अशा प्रकारे २९ अर्ज भरले असल्याचे समारे आल्यानंतर वडूज पोलिसांनी निमसोड, ता. खटाव येथील गणेश संजय घाडगे (वय ३०) व त्याची पत्नी … Read more

पुसेसावळी दंगलीतील मुख्य फरारी संशयिताला अटक, उद्यापर्यंत पोलीस कोठडी

Crime News 20240903 204137 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी (ता. खटाव) येथे झालेल्या दंगलीतील फरारी असलेल्या मुख्य संशयिताच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. दंगलीच्या घटनेला आठ दिवसांनी वर्ष पूर्ण होत आहे. त्यापूर्वी पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी गावात गतवर्षी झालेल्या दंगल आणि हत्येप्रकरणी फरारी असलेल्या मुख्य संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. नितीन … Read more