“उठ मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो…”; पथनाट्यातून कराडच्या विद्यार्थ्यांकडून मतदान जनजागृती

Karad News 38

कराड प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान 20 नोव्हेंबर रोजी पार पडत आहे. भारतीय निवडणूक आयोग निर्भय,मुक्त व पारदर्शक वातावरणात निवडणुका घेण्यासाठी कटिबद्ध आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी, भारतीय लोकशाही बळकट व्हावी यासाठी प्रयत्नशील असते. यासाठी मतदार जनजागृतीचे उपक्रम (SVEEP)उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय निवडणूक आयोग करीत असतो. याचाच एक भाग म्हणून यशवंतराव … Read more

लाडकी बहीण योजना सत्ताधाऱ्यांना किती फायद्याची अन् तोटीची?; साताऱ्यात शरद पवारांचे महत्वाचे विधान

Satara Sharad Pawar News

सातारा प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आज साताऱ्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून महायुतीवर टीका केली. “लोकांना खूश करण्यासाठी त्यांनी लोकांना आनंदी ठेवणारी योजना आणली, लोकांना पैसे दिले. योजना किती दिवस टिकणार याची माहिती द्यायला हवी होती. आज निवडणुका काढायच्या ही त्यांची मानसिकता आहे. लाडकी बहीण योजनेतून महिन्याला पैसे देऊन … Read more

सोयाबीन खरेदी केंद्रांना ऑनलाइन नोंदणीस मुदतवाढ; सहकार विभागाच्या अवर सचिवांचे पत्र

Satara Agri News

सातारा प्रतिनिधी | जिल्ह्यात हमीभाव दराने सोयाबीन खरेदी करण्यासाठी पाच केंद्रांना मान्यता दिली आहे. या केंद्रांवर सोयाबीन घालण्यासाठी ऑनलाइन नोंदणीची मुदत आजपर्यंत देण्यात आली होती. मात्र, त्यास ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन चांगल्या पद्धतीने घेतले जाते. त्यामुळे उत्पादनही मोठ्या प्रमाणात होते. यावर्षीही सोयाबीनचे उत्पादन चांगले निघाले आहे. मात्र, बाजारपेठेत ऐन दीपावलीच्या … Read more

अजितदादांची उद्या फलटणमध्ये सभा; नेमकं काय बोलणार?

Ajit Pawar News 20241116 090717 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुती अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार सचिन सुधाकर पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे उद्या फलटण दौऱ्यावर येत आहेत. उद्या, रविवार, दि. 17 रोजी सायंकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. … Read more

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील नियुक्त केंद्राध्यक्ष व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण उत्साहात

IMG 20241116 WA0002

कराड प्रतिनिधी | मतदान यंत्रे आम्ही तळ हातातील फोडाप्रमाणे जपली आहेत. 19 तारखेला एसटीतून मतदान केंद्रावर जाताना ती आमच्याप्रमाणे तुम्हीपण जपा तरच मतदानादिवशी ती आपल्याला जपतील अशी विनोदनिर्मिती करून मतदान मशीन्स जिवाप्रमाणे जपा व सुस्थितीत न्या, अशा सूचना कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी केल्या. 260 कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी बाहेरील … Read more

वाई विधानसभा मतदार संघात फिरत्या चित्ररथातून मतदान जनजागृती

Wai News 20241116 063931 0000

सातारा प्रतिनिधी | वाई विधानसभा मतदार संघातील महाबळेश्वर तालुक्यत मतदान जनजागृती कार्यक्रमांतर्गत मेटतळे, हरोशी, जावली, दरे, नवेनगर, कुंभरोशी, कुमठे, पारसोंड, बिरवाडी, चतुरबेट, शिरवली, देवळी, दुधगांव या ठिकाणी मतदान जनजागृती रथाच्या माध्यमातून मतदारांमध्ये उत्साही वातावरणात मतदान विषयक जागृती करण्यात आली. या गावांमध्ये मतदान करण्याविषयीचे विविध फलक घेऊन ज्येष्ठ नागरिक, महिला वप्राथमिक शाळेतील मुला-मुलींनी जनजगृती केली. तसेच … Read more

पृथ्वीराज चव्हाणांविरोधात फडणवीसांकडून अपशब्द; दत्त चौकात काँग्रेसनं केलं आंदोलन

Karad News 20241116 062448 0000

कराड प्रतिनिधी | कराड दक्षिण मतदार संघात मलकापूर येथे महायुतीच्या प्रचाराला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी जाहीर सभेत आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली व अपशब्द वापरले असा आरोप करत काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा दत्तचौकात रात्री जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांनी, महिलांनी फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यांच्या … Read more

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनंतर कराड विमानतळावर देवेंद्र फडणवीसांच्याही साहित्याची तपासणी, ‘ही’ वस्तू देखील पाहिली उघडून

Karad News 20241115 222015 0000

कराड प्रतिनिधी | फक्त विरोधी नेत्यांच्याच साहित्याची तपासणी होत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. त्यानंतर निवडणूक यंत्रणेनं सत्ताधाऱ्यांच्याही साहित्याची तपासणी सुरू केली आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचार सभेसाठी आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगा, साहित्याची शुक्रवारी कराड विमानतळावर तपासणी करण्यात आली. विमानात असलेल्या पिशवीतील डबाही उघडून पाहण्यात … Read more

जिल्ह्यातील निवडणूक कर्मचारी, यंत्रणांच्या दळणवळणासाठी 449 ‘लालपरी’ सहभागी होणार

Satara News 58

सातारा प्रतिनिधी । देश, राज्याच्या कारभारात मतदान हा महत्त्वाचा भाग मानला जातो. लोकशाहीचा हा उत्सव बुधवार, दि. २० रोजी साजरा होणार आहे. या उत्सवात सातारा जिल्ह्यातील निवडणूक कर्मचारी, यंत्रणांची ने- आण करण्यासाठी तब्बल ४४९ ‘लालपरी’ सहभागी होणार आहे. जिल्हा प्रशासनाने तशी मागणी राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाकडे नोंदविण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील सातारा, वाई, फलटण, … Read more

निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध : जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

Satara News 57

सातारा प्रतिनिधी । भारत निवडणूक आयोगामार्फत विधानसभा निवडणूक २०२४ साठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने निवडणूक कालावधीत निवडणूक अंदाज (ओपिनियन पोल तसेच एक्झिट पोल) दर्शविण्यावर प्रतिबंध केला आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार सदर अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रकाशित करण्यात आली आहे. या … Read more

पृथ्वीराजबाबा विधानसभेचं मटेरियल नाही ते तर…; कराडात देवेंद्र फडणवीसांची टोलेबाजी

Karad News 36

कराड प्रतिनिधी । पृथ्वीराज चव्हाण हे विधानसभा निवडणूक लढवत आहेत. ते विधानसभेचे मटेरिअल नाहीत ते तर आंतरराष्ट्रीय मटेरियल आहेत. तुम्ही त्यांना इथंच अडवून ठेवताय. विधानसभेचं विधानसभेचं.. विधानसभेचं. आता तरुण, उमदर, जनतेत राहणारा, अर्ध्या रात्री उपलब्ध असणारा असा आमदार दिला पाहिजे ना. कोणत्याही पदावर नसताना अतुल भोसलेंनी विकासकामे मंजूर करून आणली. मात्र पृथ्वीराजबाबांनी मुख्यमंत्री असताना एक … Read more

जमाना डिजिटल, तरीही प्रचारात रिक्षाचा रुबाब कायम; दररोज 1500 रुपये भाडे

Satara News 56

सातारा प्रतिनिधी | निवडणूक प्रचारात कमी वेळेत सर्व मतदारांच्या दारात पोहोचणे शक्यच नसते. अशावेळी अधिकाधिक मतदारांच्या कानावर उमेदवाराचे नाव, त्याचे कार्य आणि चिन्ह याची माहिती पडण्यासाठी रिक्षा फिरवणे आवश्यक ठरते. डिजिटल युगातही रिक्षातून पुकारा करत होणारा प्रचार सर्वच उमेदवारांना हवासा वाटतो. गेल्या २५ ते ३० वर्षांपूर्वी एखाद्या गोष्टीची जाहिरात करायची असेल किंवा प्रसार करायचा असेल, … Read more