कोरेगाव, माण मतदारसंघात 903 जादा मतदान यंत्रे; प्रशासनाकडून निवडणुकीची जय्यत तयारी

Satara News 49

सातार प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात प्रशासनाकडूनही जय्यत तयारी सुरू आहे. कोरेगाव तसेच माण विधानसभा मतदारसंघात उमेदवार संख्या वाढल्याने ९०३ अतिरिक्त मतदान यंत्रांची आवश्यकता भासणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ही मतदानयंत्रे उपलब्ध करून दिली आहेत. त्या मतदान यंत्रांची तपासणी आली असून त्या-त्या मतदारसंघात त्या मतदान यंत्रांचे वितरणही करण्यात आले आहे. जिल्ह्यातील … Read more

विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत हजारोंच्या हातांना मिळतंय काम; मंडप-खुर्च्यांना वाढलं डिमांड !

Political News 10

सातारा प्रतिनिधी । विधानसभा निवडणूकीच्या उमेदवारांकडून प्रचार सभांना सुरुवात करण्यात आलेली आहे. निवडणुकीच्या काळात हजारो हातांना काम मिळाले आहे. त्यातून लाखोंची उलाढाल होत आहे. सध्या प्रचार सुरू झाल्याने मंडप व्यावसायिक, वाद्य व्यावसायिक, खानावळी चालविणारे, तसेच अन्य व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत. सध्या कष्टकरी मजुरांच्या हाताला काम मिळाल्याने एरवी कामाच्या शोधात असणारे हे कामगार आता निवडणुकीच्या … Read more

उमेदवारांचे लक्ष लाडक्या बहिणींच्या मतांकडे मात्र, विधानसभेला ‘भावा’चीच मते ठरणार निर्णायक

Satara News 42

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत इच्छुकांसह उमेदवारांचे लक्ष आहे ते लाडक्या बहिणींच्या मतांकडे होय. कारण आतापर्यंतच्या निवणुकीत महिलांच्या मतांपेक्षा जास्त पुरुषांच्या मतांकडे लक्ष दिले जायचे. मात्र आता पुरुषांप्रमाणे महिलांच्या मतांकडे उमेदवारांनी लक्ष केंद्रित केले आहे. यावेळेस महिलांच्या मतांपेक्षा पुरुष मतदारच उमेदवारांचे भवितव्य … Read more

यंदा 51 मुहूर्त; तुळशी विवाहानंतर उडणार लग्नाचे बार !; 18 नोव्हेंबरपासून विवाह इच्छुकांच्या डोक्यावर पडणार अक्षता

Marriage News

सातारा प्रतिनिधी । नुकताच दिवाळीचा सण झाला. सर्वांनी मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला. दिवाळीनंतर तुलसी विवाह जवंजाळ आला असून आपल्याकडे तुळशी विवाह आटोपल्यानंतर लग्नाचे बार उडण्यास प्रारंभ होतो. लग्नाचे मुहूर्त ही त्याच पद्धतीचे असतात. यंदा १२ नोव्हेंबर रोजी प्रबोधिनी एकादशी असून दुसऱ्या दिवसांपासून तुळशी विवाहाला प्रारंभ होणार आहे. तर १८ नोव्हेंबरपासून लग्नसराई सुरू होणार … Read more

माणमध्ये होणार गोरे-घार्गेत फाईट; विधानसभेतून 12 उमेदवारांची माघार

Man News 20241105 092050 0000

सातारा प्रतिनिधी | माण (२५८) विधानसभा मतदारसंघात आमदार जयकुमार गोरे विरुद्ध माजी आमदार प्रभाकर घार्गे असा सामना रंगणार आहे. माणमध्ये आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी १२ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता २१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. महत्त्वपूर्ण अशा संदीप मांडवे, नंदकुमार मोरे, अनिल पवार यांनी माघार घेतल्याने महाविकास आघाडीने सुटकेचा निश्वास सोडला … Read more

सातारा जिल्ह्यात ‘या’ 5 ठिकाणी नवीन चेहरे; आघाडी-युतीमध्ये दोघेजण आयात

Political News 3

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. आता तासाभरातच माघारीनंतर अंतिम चित्र स्पष्ट होईल. पण, या निवडणुकीत आघाडी आणि महायुतीतील सामना अधिक चुरशीचा आहे. कारण, प्रत्येक मतदारसंघात तगडे उमेदवार आहेत. यासाठी उमेदवारांना दुसऱ्या पक्षातून घेणे, नवीन चेहरे देणे असे प्रयोग करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट होत … Read more

लेकीची शपथ घेऊन सांगा ‘तुतारी’वर लढवण्याचा शब्द दिला की नाही?; घार्गेना उमेदवारी देताच शेखर गोरेंचा पवारांवर निशाणा

Satara News 24 1

सातारा प्रतिनिधी । माण- खटाव विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरून महाविकास आघाडीत सध्या चांगलेच टीकेचे फटाके उडू लागले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात जयकुमार गोरे यांच्या विरोधात आघाडीचा उमेदवार कोण राहील, याबाबत उत्कंठा लागून राहिली होती. ती उत्कंठा काल प्रभाकर घार्गे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने संपली. मात्र, त्याचे पडसाद मतदारसंघात उमटू लागले आहेत. शिवसेनेचे संपर्क प्रमुख शेखर गोरे यांना … Read more

विद्यार्थ्यांकडून आकाश कंदीलातून मतदान जनजागृतीचा संदेश; जिल्हा परिषद शाळेचा अनोखा उपक्रम

Satara News 23

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा परिषदेची माण तालुक्यातील गोंदवलेकर महाराजांच्या नगरीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघमोडेवाडी यांनी राबवला अनोखा उपक्रम राबवला. मतदान जनजागृतीचा संदेश लोकांपर्यंत कसा पोहोचवायचा असा प्रश्न या शाळेतील नवोपक्रमशील शिक्षिका सौ भारती ओंबासे यांना पडला. तेव्हा त्यांनी शाळेमध्ये आकाशकंदील निर्मिती कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांना आकाशकंदील तयार करण्यास सांगितले. त्यानंतर शाळेतील 49 विद्यार्थ्यांनी आकाशकंदील … Read more

साताऱ्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती; 8 मतदारसंघात आता ‘काटे की टक्कर’

Satara News 1 3

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जाहीर झालेली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची उद्या अंतिम तारीख आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात विधानसभेच्या सातारा, कराड उत्तर, कराड दक्षिण, वाई, पाटण, कोरेगाव, फलटण, माण या आठ मतदारसंघात लढती निश्चित झाल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी उमेदवारांमध्ये काटे कि टक्कर पहायला मिळणार आहे. सातारा जिल्ह्यात असलेल्या आठही विधानसभा मतदार संघातून … Read more

सातारा जिल्ह्यातील रेशन दुकान बंद आंदोलन तूर्त स्थगित

Satara News 20241026 085738 0000

सातारा प्रतिनिधी | रेशन दुकानदारांच्या न्याय व प्रलंबित मागण्यांसाठी दोन्ही राज्य संघटनेच्यावतीने एकत्रित आवाहनानुसार दि. 1 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रातील 56,200 रेशन दुकानदारांनी धान्य उचल बंद, धान्य वाटप बंद, दुकान बंद आंदोलन पुकारलेले होते. मात्र, मंत्रालयात झालेल्या बैठकीप्रसंगी चर्चेनंतर तूर्त हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचा निर्णय सातारा जिल्हा रेशन दुकानदार संघटनेच्या वतीने घेण्यात आला. याबाबत अधिक माहिती … Read more

महावितरणाचा लाचखोर कर्मचारी ‘लाचलुचपत’ विभागाच्या जाळ्यात

Satara News 12 1

सातारा प्रतिनिधी । विजेचा ट्रान्सफॉर्मरवर बसविण्यासाठी सहाशे रुपयांची लाच स्वीकारताना गोंदवले कार्यालयातील लाइन हेल्परला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने छापा घालून रंगेहात पकडले. विशाल लाला जाधव (वय २७) असे संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत माहिती अशी, की पळशी, ता. माण येथील तक्रारदार यांच्या शेतात दोन विद्युत मोटार कनेक्शन असून, … Read more

महिलेची दोन चिमुकल्या मुलींसह तलावात उडी मारून आत्महत्या, पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न

Crime News 20241023 074335 0000

सातारा प्रतिनिधी | एका महिलेनं दोन चिमुकल्या मुलींसह तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात घडली आहे. या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात एका महिलेने आपल्या दोन चिमुकल्या मुलींसह गावालगतच्या तलावात उडी मारुन जीवन संपवलं आहे. ही घटना समजल्यानंतर पतीनेही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. … Read more