तुम्हाला जर पुढची 5 वर्षे लाडकी बहीण योजना सुरु ठेवायची असेल तर…; वाईच्या सभेत अजितदादांचे बहिणींना आवाहन

Ajit Pawar News

सातारा प्रतिनिधी । राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनि आज वाईत जनसन्मान यात्रेतून लाडक्या बहिणींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेत लाडक्या बहिणींना महत्वाचे आवाहन देखील केले. “माझ्या लाडक्या बहिणींनो तुम्हाला पुढची पाच वर्षे तुमची लाडकी भिन्न योजना सुरु ठेवायची असेल तर राष्ट्रवादीचा उमेदवार जिथे उभा असेल तिथे घड्याळाचे … Read more

अजितदादांचा लाडक्या ‘ताईं’साठी ‘वाई’ दौरा, राजकीय घडामोडींकडे जिल्ह्याचं लक्ष

Ajit Pawar News 20241007 080338 0000

सातारा प्रतिनिधी | उपमुख्यमंत्री अजित पवार आज वाई विधानसभा मतदार संघात येत आहेत. लाडकी बहीणसह शासनाच्या अन्य लोककल्याणकारी योजनांच्या पार्श्वभूमीवर ते लोकांशी संवाद साधणार आहेत. त्यासाठी खासदार नितीन पाटील, आमदार मकरंद पाटील यांनी जय्यत तयारी केली आहे. अजितदादांच्या सातारा दौऱ्यात काय घडामोडी घडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. लोकसभेच्या निवडणूकी नंतर अजितदादांनी कामाचा, जनसंपर्काचा … Read more

पाचगणीत मध्यरात्री भाजीपाल्याच्या दुकानांना आग, 7 दुकाने जळून खाक

Crime News 15

सातारा प्रतिनिधी । पाचगणी, ता. महाबळेश्वर मार्केटमधील भाजीपाल्याची दुकाने व गोदामांना भीषण आग लागून बाजारातील सात दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडलयाची घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या घटनेत भाजीपाला आणि साहित्य जळून खाक झाल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पाचगणी पालिकेचा बंब व पालिका कर्मचाऱ्यांसह स्थानिक युवकांनी आग आटोक्यात आणली असून सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी … Read more

‘मी’ पणाच्या नादात विद्यमान आमदारांनी मतदार संघात दहशत माजवली; शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाची मकरंद पाटलांवर टीका

Satara News 2024 10 06T111711.148

सातारा प्रतिनिधी | वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात माझ्याच घरात सर्व सत्ता घेऊन विद्यमान आमदारांनी लोकशाहीची थट्टा चालवली आहे. मीच आमदार, माझाच भाऊ खासदार, जिल्हा बँकेचा चेअरमन देखील आमच्याकडे, मीच दोन्ही साखर कारखान्याचा चेअरमन, आम्हीच बाजार समितीचे संचालक, आम्हीच नाहं सरपंच… अशा ‘मी’ पणाच्या नादात विद्यमान आमदारांनी सत्तेचे केंद्रीकरण करून मतदार संघात दहशत माजवली आहे. मात्र मी … Read more

जिल्ह्यातील आमदार साहेबांना सोशल मीडियात किती आहेत फॉलोअर्स?

Satara News 96

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आमदारकीसाठी अनेक नेतेमंडळींनी दंड थोपटले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी विद्यमान आठ आमदारांनाही आपापल्या पक्षाकडून उमेदवारी मिळण्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात ९ आमदार राहतील अशी परिस्थिती सध्या दिसत आहे. विधानसभेची निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होणार असून या निवडणुकीत जे आमदार आणि इच्छुक उभे राहणार आहेत त्यांच्याकडून सोशल … Read more

ई-केवायसीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ; जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना मिळाला दिलासा

Satara News 92

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना दि. ३० सप्टेंबरपर्यंत ई केवायसी करून घेण्याचे आवाहन पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले होते. त्यानुसार काही शिधापत्रिकाधारकांनी ई केवायसी करून घेतली. त्यानंतर आता अशासनाने ई केवायसी करून घेण्यासाठीची मुदत वाढवली असून ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे ई केवायसी बाकी राहिलेल्या शिधापत्रिकाधारकांना दिलासा मिळालेला आहे. सातारा जिल्ह्यात अद्याप १२ … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘या’ गडावर दोन घट बसविण्याची परंपरा; राज्यातील एकमेव मंदिर माहितीय का?

Pratapgad News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक अशी ठिकाणे आहेत. त्यामधील एक ऐतिहासिक ठिकाण म्हणजे महाबळेश्वर तालुक्यातील किल्ले प्रतापगड होय. हा किल्ला अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार राहिलेला आहे. या किल्ल्यावर असलेले भवानी मातेचे मंदिर, देवीची मूर्ती अन् मंदिरात बसविले जाणारे दोन घट या मागेही रंजक इतिहास लपला आहे. या गटाडावरील भवानी मातेच्या मंदिरात ३६२ वर्षांपासून … Read more

“हे बघा, लाभ नायक,” म्हणत मदनदादांची कन्या डॉ. सुरभी भोसलेंचा मकरंद आबांवर निशाणा

Satara News 20240930 122435 0000

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील विधानसभेच्या आठ मतदारसंघापैकी वाई हा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. या मतदार संघात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गटाचे विद्यमान आमदार मकरंद पाटील यांच्याकडून लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेण्याचे काम केले जात असल्याचे एका पोस्टरवरून दिसल्याने भाजप नेते मदन भोसले यांच्या कन्या तथा भाजप नेत्या डॉ. सुरभी भोसले यांनी मकरंद पाटील यांच्यावर … Read more

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत महाबळेश्र्वर गिरीस्थान प्रशालेने पटकावला दुसरा क्रमांक

Mahabaleshawar News 20240925 183805 0000

सातारा प्रतिनिधी | मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील महाबळेश्र्वर गिरीस्थान प्रशालेने दुसरा क्रमांक पटकवला. या अभियानाचा दुसरा टप्पा संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या सुरू आहे. महाबळेश्वर गिरीस्थान प्रशालेत पायाभूत सुविधा मध्ये शालेय फर्निचर,पर्यावरण पूरक शाळा, सर्व वर्ग खोल्या सुबक रंगरंगोटी करून बोलक्या भिंती कऱण्यात आल्या. संपूर्ण प्रशालेच्या चेहरा मोहरा बदलण्यात आला असून शासनाच्या शैक्षणिक … Read more

पाचगणी पोलिसांची धडक कारवाई; 2 गुन्हे उघडकीस करून 51 लाखांचा माल हस्तगत

Crime News 20240919 201603 0000

सातारा प्रतिनिधी | पाचगणी पोलीसांनी २४ तासाच्या आत गुन्हा उघड़कीस आणुन हिरेजडीत सोन्याच्या अंगठया हस्तगत केल्या आहेत. तसेच मोटर सायकल चोरीचे २ गुन्हे उघडकीस आणुन २ मोटर सायकली केल्या हस्तगत करून एकुण ३५ गहाळ मोबाईलचा शोध लावुन ५१ लाख रुपयांचा माल हस्तगत केला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि.१०.०९.२०२४ रोजी सायं ७.३० वा.चे … Read more

महाबळेश्वरातील हॉटेल व्यावसायिकाची फसवणूक, CID च्या अप्पर पोलीस अधीक्षकास अटक, 5 दिवस कोठडी

Crime News 20240909 081645 0000

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर येथील हॉटेल व्यवसायिकाची मद्य विक्रीचा परवाना मिळवून देतो असे सांगून एक कोटी पाच लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभाग (पुणे) येथे नेमणुकीस असलेल्या अपर पोलीस अधीक्षकास अटक करण्यात आली आहे. त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. श्रीकांत नामदेवराव कोल्हापूरे असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. गुन्हे अन्वेषण विभाग सीआयडी, … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘या’ 3 बसस्थानकांच्या इमारतीसाठी 42 कोटी निधीस मंजुरी

Satara News 20240905 081520 0000

सातारा प्रतिनिधी | राज्य परिवहन महामंडळातील सातारा विभागातील महत्वाच्या तीन एसटी आगारातील इमारतीसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला आहे. सातारा, वाई व महाबळेश्वर मध्यवर्ती बसस्थानकाच्या इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी राज्य शासनाच्या गृह विभागाने सुमारे 42 कोटींच्या निधीस मंजुरी दिली आहे. सातारा विभागात पुणे-बंगलोर महामार्गावर मध्यवर्ती बसस्थानक म्हणून सातारा बसस्थानकाची ओळख आहे. या बसस्थानकावर सतत प्रवाशांची वर्दळ असते. … Read more