पावसाची उघडीप; कोयना धरणातील पाणीसाठा झाला 33.03 TMC

Koyna News 2

पाटण प्रतिनिधी । हवामान विभागाने सातारा जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवला असला तरी तीन ते चार दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या, २४ तासांत महाबळेश्वरला फक्त 22 आणि नवजा येथे 55 मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली तर कोयना धरणात पाणी आवक सुरू असल्याने धरणातील पाणीसाठा 33.03 टीएमसीवर पोहोचला आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात मागील काही दिवसांपासून … Read more

पाचगणीतील हाॅटेल फर्नला उच्च न्यायालयाने ठोठावला 10 लाखांचा दंड

Pachagani News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात पाचगणी येथील हॉटेल द फर्नला जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सील ठोकल्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईला आव्हान देणारी याचिका चांदणी रियाल्टी यांनी पाचगणी पालिकेविरोधात दाखल करण्यात आली होती. ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून हॉटेल फर्नला दहा लाखाचा दंड ठोठावला आहे. या निकालामुळे इतर अशा इमारती वापरकर्ते याची गंभीर दखल घेतील असा … Read more

महाबळेश्वर तालुक्यात ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेला वृद्धाचा मृतदेह सापडला

Crime News 20240703 140340 0000

सातारा प्रतिनिधी | केळवली धबधब्यात तरूण बुडाल्याची घटना ताजी असतानाच महाबळेश्वर तालुक्यात वृध्द ओढ्याच्या पाण्यात वाहून गेल्याची आणखी एक घटना मंगळवारी दुपारी घडली होती. या प्रकरणी संबंधितांचा शोध घेतला जात होता. आज बुधवारी वाहून गेलेल्या वृद्धाचा शोध घेण्यात ट्रेकर्सच्या पथकास यश आले. बबन पांडुरंग कदम (वय ६२, रा. घावरी, ता. महाबळेश्वर) असे वृद्धाचे नाव आहे. … Read more

महाबळेश्र्वरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

Mahabaleshawar News 20240703 070730 0000

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर तालुक्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नदी, नाले, ओढे ओसंडून वाहू लागले आहेत. चार दिवसांपासून संततधार मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे चोवीस तासांत १०६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वर परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाबळेश्वरात आतापर्यंत ८७०.६० मिलिमीटर पाऊस पडल्याची माहिती हवामान … Read more

धबधब्याच्या ठिकाणी जाताना काळजी घ्या : जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

Satara News 20240702 111215 0000

सातारा प्रतिनिधी | पावसाळ्यामध्ये पर्यटक धबधब्याच्या ठिकाणी जातात व पर्यटनाचा आनंद घेतात. पर्यटकांनी धबधब्याचा आनंद घेत असताना स्वतःच्या जीविताची काळजी घेणे गरजेचे आहे. दोन दिवसांपूर्वी सातारा येथे धबधब्याच्या ठिकाणी एका पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाला ही बाब लक्षात घेता पर्यटकांनी पावसाळी पर्यटनाचा आनंद घेत असताना काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. जिल्हाधिकारी डूडी … Read more

मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावर पहाटे दरड कोसळली

Satara News 20240702 065202 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला असून, धरण पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू आहे. महाबळेश्वर-तापोळा मुख्य रस्त्यावर महाबळेश्वरपासून 9 कि.मी. अंतरावर चिखली शेड परिसरात सोमवारी पहाटे दरड कोसळली. डोंगरावरून राडारोडा आणि मोठे दगड खाली आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. सोमवारी महाबळेश्वरमध्ये दिवसभरात 45 मि. मी., तर सातार्‍यात 3.2 मि. मी. पावसाची नोंद … Read more

मेढा-महाबळेश्वर मार्गावर कार-दुचाकीचा भीषण अपघात, एक तरूण जागीच ठार, एक गंभीर

Accideant News 20240629 071355 0000

सातारा प्रतिनिधी | मेढा-महाबळेश्वर मार्गावर आंबेघर तर्फ मेढा गावच्या हद्दीत भरधाव कारने दुचाकीला समोरून भीषण धडक दिली. या अपघातात (वरोशी ता. जावली) गावातील एक तरूण जागीच ठार झाला तर एक गंभीररित्या जखमी झाला आहे. प्रवीण कोडीबा कासुर्डे, असं मृत तरूणाचं तर सिद्धार्थ संतोष कदम, या तरूणाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू … Read more

कोयना पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस; धरणात ‘इतका’ झाला पाणीसाठा

Patan News 4

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर चांगलाच वाढत असून शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत नवजा येथे 74 मिलीमीटर पाऊस पडला. तर कोयनानगर येथे 68 आणि महाबळेश्वरला 60 मिलीमीटरची नोंद झाली आहे. या पावसामुळे कोयना धरणात यावर्षी प्रथमच आवक सुरू झाली आहे. सध्या साडेपाच हजार क्यूसेक वेगाने पाणी येत आहे. मागील 15 दिवसांपासून पाऊस … Read more

2 दिवसाचा मुक्काम करून सलमानने गाठली मुंबई; RTI अर्जामुळे महाबळेश्वरातून घेतला काढता पाय

Salman Khan News 20240622 072026 0000

सातारा प्रतिनिधी | बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा महाबळेश्वरातील मुक्काम चांगलाच वादग्रस्त ठरला. ईडीन सील केलेल्या वाधवान बंधूच्या बंगल्याला वीज, पाण्याची सुविधा पूर्ववत कोणी केली, अशी माहिती आरटीआय कार्यकर्त्यान मागवल्यानं सलमानने महाबळेश्वरातील आपला मुक्काम शुक्रवारी हलवला आणि थेट मुंबई गाठली. सील केलेल्या बंगल्यात मुक्काम डीएचएलएफ घोटाळ्यातील वाधवान बंधूंच्या महाबळेश्वरातील अलिशान बंगल्यात सलमान खानचं वास्तव्य चर्चेचं ठरलं. … Read more

कोयना, नवजा, महाबळेश्वरला पावसाचा जोर वाढला; कोयना धरणात ‘इतका’ TMC झाला पाणीसाठा

Koyna News 4

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात आठ दिवसानंतर पावसाने पुन्हा जाेर धरला आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी सध्या पाऊस पडत असून शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेत 139 आणि महाबळेश्वरात 74 तर नवजा येथे 148 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. कोयना धरणात सध्या 15.61 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. सातारा जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस ७ जूनपूर्वीच दाखल … Read more

Salman Khan : सलमान खानचा मुक्काम महाबळेश्वरमधील वाधवानच्या बंगल्यात

Salman Khan News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वर येथील वाधवान बंगल्यात बुधवारी रात्री सुपरस्टार सलमान खानने (Salman Khan) ताफ्यासह पाहुणा म्हणून दाखल होत पाहुणचार घेतल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे सलमान ज्या बंगल्यात थांबला आहे तो देशातील मोठ्या आर्थिक घोटाळ्यातील मुख्य आरोपी येस बँक घोटाळ्याचे डीएचएफएल उद्योग समूहाचे उद्योगपती कपिल वाधवान व … Read more

झाडाणी प्रकरणातील सर्व नोटीसधारकांचे वकीलपत्र रद्द, ‘या’ दिवशी समक्ष हजर राहण्याचे आदेश

Mahableshwar News 20240620 185449 0000

सातारा प्रतिनिधी | माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी झाडाणी गावातील जमीन घोटाळा उघडकीस आणत राज्यात खळबळ उडवून दिली होती. झाडाणी (ता. महाबळेश्वर) येथील तब्बल ६२० एकर जमीन अहमदाबादचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी आणि त्यांच्या नातेवाईकांनी बळकावल्याचे कागदपत्रांवरुन समोर आले होते. यात पहिल्यांदा वळवींसह तिघांना तर नंतर आठ जणांना नोटीसा बजावल्या होत्या. त्या रद्द करून … Read more