राज्यपाल रमेश बैस यांचे महाबळेश्वरात आगमन

Ramesh Bais News 3

सातारा प्रतिनिधी । राज्यपाल रमेश बैस यांचे आज महाबळेश्वर येथील राजभवन येथे आज नुकतेच आगमन झाले. महाबळेश्वर येथे आगमन होताच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रशासनाच्यावतीने राज्यपालांचे स्वागत केले. याप्रसंगी राज्यपाल महोदय यांच्या सहसचिव श्रीमती श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील, सार्वजनिक … Read more

GST मुख्य आयुक्तांच्या अनधिकृत बांधकामाचा अहवाल सादर

Satara News 2 1

सातारा प्रतिनिधी । अहमदाबादचे जीएसटी मुख्य आयुक्त असणारे चंद्रकांत वळवी व त्यांच्या कुटुंबीयांनी, नातेवाईक अशा एकूण १३ जणांनी झाडाणी (ता. महाबळेश्वर) हे संपूर्ण गावच खरेदी केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून आयुक्तांनी ६४० एकर भूखंड खरेदी करून त्यामधील ३५ एकरावर अनधिकृतपणे केलेले बांधकाम, बेकायदा उत्खनन, खाणकाम, वन्यजीव व वन … Read more

राज्यपाल रमेश बैस पाच दिवसाच्या महाबळेश्‍वर दौऱ्यावर

Governor Ramesh Bais News

सातारा प्रतिनिधी । राज्यपाल रमेश बैस उद्या मंगळवारपासून (दि. २१) पाच दिवस सातारा जिल्ह्यातील महाबळेश्‍वर दौऱ्यावर येत आहेत. राजभवन येथील अधिकृत निवासस्थान असलेल्या गिरिदर्शन या बंगल्यामध्ये ते मुक्कामी राहणार असून या दौऱ्यात ते जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. श्रीक्षेत्र महाबळेश्‍वर मंदिरासह बेल एअर रुग्णालय तसेच प्रेक्षणीय स्थळांनाही ते भेटी देणार आहेत. दरम्यान, राज्यपाल रमेश … Read more

गुजरातच्या GST आयुक्तांनी खरेदी केलं महाबळेश्वरमधील संपूर्ण गाव…

Crime News 20240519 162439 0000

सातारा प्रतिनिधी | नंदुरबारचे रहिवासी आणि अहमदाबाद येथे जीएसटी मुख्य आयुक्त असणारे चंद्रकांत वळवी व त्यांच्या कुटुंबीयांनी, नातेवाईक अशा एकूण १३ जणांनी झाडाणी (ता. महाबळेश्वर) हे संपूर्ण गावच खरेदी केल्याचा प्रकार घडला आहे. या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केली आहे. कांदाटी खोऱ्यातील झाडाणी येथील तब्बल ६२० एकर जमिनीच्या व्यवहाराची चौकशी … Read more

पाचगणीत ‘त्याने’ युवकावर धारदार शस्त्राने केले सपासप वार

Crime News 36

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील पाचगणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका युवकावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यास जखमी केल्याची घटना दि. ९ मे रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास ही घटना घडली. याबाबत पाचगणी पोलिसांनी हल्लेखोर युवकावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पाचगणी पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, दि. ९ मे रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास … Read more

महाबळेश्वरात छतावरून कोसळून बांधकाम कामगाराचा मृत्यू

Death News 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील बेल एअर संचालित ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम करताना कामगार छतावरून कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. जितेंद्र मारुती भिलारे (वय ४५, रा. भिलार, ता. महाबळेश्वर) असे मृताचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाबळेश्वर येथे ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम सुरू आहे. जितेंद्र भिलारे हे शनिवारी दुपारी चारच्या सुमारास … Read more

महाबळेश्वरात घोड्यावरून जात असताना पडून बहीण-भाऊ जखमी; पुढं घडलं असं काही…

Crime News 20240430 160051 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील प्रसिद्ध वेण्णालेक परिसरात नौकाविहार व घोड्यावरून रपेट मारण्यासाठी पर्यटकाची तुबंड गर्दी होते. परंतु शुक्रवार, दि. २६ रोजी एक कुटुंब महाबळेश्वरला फिरण्यास आले असता कुटुंबातील बहीण-भाऊ घोड्यावरून रपेट मारताना घोडा अनियंत्रित झाला आणि घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. महाबळेश्वरमध्ये घोडेस्वारांना ड्रेस कोड आहे; परंतु कोणीही युनिफॉर्म … Read more

महाबळेश्वरातील केट्स पॉईंटवरुन गुजरातच्या पर्यटकाची आत्महत्या, सुमारे 250 फूट दरीत उडी मारली

Crime News 20240426 164959 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या केट्स पॉईंटवरून गुजरात येथील पर्यटकाने बुधवारी रात्री सातच्या सुमारास सुमारे अडीचशे फूट दरीत उडी मारून आत्महत्या केली. काल गुरुवारी दुपारी मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. मृतदेहाशेजारी सापडलेल्या आधार कार्डवर अनिल अग्रवाल (वय ६६, रा. आत्माराम अग्रवाल सी/८०१, एकता अनुवऐ बी/एच एकता टॉवर वसना बर्रागे रोहद … Read more

महाबळेश्वरातील हॉटेल कामगाराचा वाईच्या धोम धरणातील पाण्यात बुडून मृत्यू

Crime News 32 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील एका मोठ्या नामांकित हॉटेलमध्ये काम करणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाचा वाईच्या धोम धरणात बुडुन मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. मनोजकुमार महेंद्र पाल (सध्या रा. बोंडारवाडी, ता. महाबळेश्वर) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, वाई सोमवार दि. १५ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मनोजकुमार महेंद्र पाल … Read more

मिनी काश्मीरमध्ये पर्यटक घामाघूम; पारा सरासरी 32 अंशांवर

Mahabaleshwar News 2 jpg

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची कायम गर्दी असते. महाबळेश्वरची संध्याकाळची गुलाबी थंडी, हिरवागार निसर्ग अशा वातावरणात महाबळेश्वर पर्यटनस्थळी गर्दी सध्या वाढत आहे. मात्र, दुपारच्या वेळी सूर्य चांगलाच तळपत असून पारा सरासरी ३२ अंशांपर्यंत जात आहे. परिणामी पर्यटकांच्या अंगातून घामाच्या धारा लागत आहे. तर उकाडा कमी करण्यासाठी महाबळेश्वरातील … Read more

अभ्यासासाठी गेलेल्या दोन मुलींचा शिवसागर जलाशयात बुडून मृत्यू; आशा सेविकेने वाचविले दोघींचे प्राण

Mahabaleshwar News 20240401 124222 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | तापोळा भागातील दुर्गम वाळणे (ता. महाबळेश्वर) या गावातील चार मुली काल शिवसागर जलाशयात खेळताना बुडाल्या. यातील एक मुलीचा जाग्यावरच मृत्यू झाला, तर एकीला तापोळा येथील आरोग्य केंद्रात नेल्यावर मृत घोषित करण्यात आल्याची घटना रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. सोनाक्षी रामचंद्र सुतार (वय १२), सोनाक्षी तानाजी कदम (वय १२) अशी मृत झालेल्या … Read more

महाबळेश्वरच्या आंबेनळी घाटात टेम्पो 400 फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात

Mahabaleshwar News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमधील आंबेनळी घाटात आज दुपारी मोठी अपघाताची भीषण दुर्घटना घडली. महाबळेश्वरकडून प्रतापगडाकडे निघालेल्या टेम्पो आंबेनळी घाटातील सुमारे 400 फूट दरीत कोसळला. मेटतळे या गावाजवळ टेम्पो दरीत कोसळल्याने घाटातील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. महाबळेश्वर ट्रॅकरच्या युवकांनी दरीतून 2 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती … Read more