महाबळेश्वरातील हॉटेल व्यावसायिकाची फसवणूक, CID च्या अप्पर पोलीस अधीक्षकास अटक, 5 दिवस कोठडी

Crime News 20240909 081645 0000

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर येथील हॉटेल व्यवसायिकाची मद्य विक्रीचा परवाना मिळवून देतो असे सांगून एक कोटी पाच लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभाग (पुणे) येथे नेमणुकीस असलेल्या अपर पोलीस अधीक्षकास अटक करण्यात आली आहे. त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. श्रीकांत नामदेवराव कोल्हापूरे असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. गुन्हे अन्वेषण विभाग सीआयडी, … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘या’ 3 बसस्थानकांच्या इमारतीसाठी 42 कोटी निधीस मंजुरी

Satara News 20240905 081520 0000

सातारा प्रतिनिधी | राज्य परिवहन महामंडळातील सातारा विभागातील महत्वाच्या तीन एसटी आगारातील इमारतीसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला आहे. सातारा, वाई व महाबळेश्वर मध्यवर्ती बसस्थानकाच्या इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी राज्य शासनाच्या गृह विभागाने सुमारे 42 कोटींच्या निधीस मंजुरी दिली आहे. सातारा विभागात पुणे-बंगलोर महामार्गावर मध्यवर्ती बसस्थानक म्हणून सातारा बसस्थानकाची ओळख आहे. या बसस्थानकावर सतत प्रवाशांची वर्दळ असते. … Read more

कोयनेसह जिल्ह्यात मुसळधार पाऊस; कोयना धरणात ‘इतका’ पाणीसाठा

Patan News 12

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पुन्हा पाऊस सुरू झाला असून सोमवार आणि मंगळवारी पाटण तालुक्याला पावसाने झोडपून काढले. आज मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या तालुक्यातील मल्हारपेठ, निसरे भागात पावसाने चांगली हजेरी लावली. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे कोयना धरणात पाण्याचीही आवक सुरू झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा 90.89 टीएमसीवर गेला आहे. सातारा … Read more

रक्षाबंधनासाठी सातारला येत असताना दुचाकीची एसटीला धडक, अपघातात युवकाचा मृत्यू

Accident News 20240819 073428 0000

सातारा प्रतिनिधी | रक्षाबंधनासाठी दुचाकीवरून सातारला येत असलेल्या युवकावर शनिवारी रात्री मेढा येथे काळाने घाला घातला. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथून महाबळेश्वरमार्गे सातारला येत असताना मेढा बसस्थानकाजवळ अचानक आडव्या आलेल्या एसटीला दुचाकीने धडक दिली. या अपघातात आदित्य संजय साळुंखे (वय २३, रा. सिद्धिविनायक रेसिडेन्सी, बसाप्पा पेठ, करंजे, सातारा), या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. आदित्य हा रत्नागिरी … Read more

देवदर्शनाला गेलेल्या महाबळेश्वरातील तिघांचा महाडच्या सावित्री नदीत बुडून मृत्यु, मृतांमध्ये सख्ख्या भावांचा समावेश

Mahabaleshwar News 20240818 212947 0000

सातारा प्रतिनिधी | महाडमधील सव गावातील दर्ग्यात दर्शनाला गेलेल्या महाबळेश्वरमधील तिघांचा सावित्री नदीत बुडून मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी ही हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळं महाबळेश्वरमधील गवळी मोहल्ल्यावर शोककळा पसरली आहे. महाबळेश्वरमधील तिघांचा महाडमधील सावित्री नदीत बुडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. दर्ग्यात दर्शन घेतल्यानंतर जेटीकडे गेलेल्या एकाचा पाय घसरून तो … Read more

महाबळेश्वरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याबाबत पालकमंत्री देसाईंचे निर्देश

Satara News 70

सातारा प्रतिनिधी । महाबळेश्वर येथील आराम चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याच्या अनुषंगाने पुतळा समितीसोबत पालकमंत्री देसाई यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी महाबळेश्वर बाजार पेठेच्या चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा तात्काळ बसविण्यात यावा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य … Read more

पुणे-सातारा महामार्गावर बस पेटली; दुचाकीस्वाराचा जळून झाला अक्षरशः कोळसा!

Crime News 20240814 223222 0000

सातारा प्रतिनिधी | पुण्याहून पलूसकडे जाणाऱ्या एसटीच्या पुढील चाकाखाली दुचाकीस्वार अडकल्याने दुचाकी काही अंतर डांबरावर घासत गेली. त्यामुळे स्पार्किंग झाल्याने या आगीत एसटीसह दुचाकीस्वार जळून खाक झाल्याची भीषण दुर्घटना बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता वाई तालुक्यातील भुईंज येथे घडली. पुण्याहून पलूसकडे एसटी निघाबनली होती. एसटीमध्ये प्रवाशी खचाखच भरले होते. महामार्गावरील भुईंज येथील विरंगुळा पेट्रोल पंपाजवळ एसटी … Read more

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची उघडीप; धरणात झाला ‘एवढा’ TMC पाणीसाठा

Koyna Dam News 7

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात पावसाने सध्या उघडीप दिली असली तरी अजून काही भागात रिमझिम पावसाच्या सरी कोसळत आहेत. दरम्यान, कोयना धरणात पाण्याची आवक कमी झाली असून धरणाच्या पायथा वीजगृहातील विसर्गही बंद करण्यात आला आहे. तर शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आलेल्या आकडेवारीनुसार कोयना धरणात 88.22 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण भरण्यासाठी अजून १८ … Read more

सातारा जिल्ह्याला आज यलो अलर्ट; कोयना धरणात पाणीसाठा किती?

Koyna News 20240807 090400 0000

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर रात्रीपासून पुन्हा सुरु झाला आहे. तर उजनी व वीर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्यामुळे कोयना धरणाचे दरवाजे काल बंद करण्यात आलेले असून आज बुधवारी सकाळी आठ वाजता आलेल्या आकडेवारीनुसार धरणात 86.78 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण परिसरात पावसाचा … Read more

धोम, बलकवडी धरणातून सोडलं पाणी; पुराच्या पाण्याचा वाईच्या महागणपतीला चरणस्पर्श

Wai News

सातारा प्रतिनिधी । महाबळेश्वर आणि वाई तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर असल्यामुळे दुपारी धोम धरणातून ८ हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आलंय. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून पुराच्या पाण्यामुळं दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाईतील प्रसिद्ध महागणपतीच्या मंदिरात पुराचे पाणी शिरले आहे. पाण्याने वाईतील प्रसिद्ध महागणपतीच्या चरणाला स्पर्श केला आहे तसेच नदीघाट लगतच्या … Read more

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; 24 तासांत 2 टीएमसी पाणीसाठ्यात वाढ

Koyna Rain News 20240802 132334 0000

पाटण प्रतिनिधी | भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी उद्या शनिवारी व रविवारी अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. या दरम्यान धरणामध्ये येणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा विचार करता धरणामधील विसर्ग वाढविणे आवश्यक होते. त्यामुळे कोयना धरणातील पाण्याच्या विसर्गात वाढ करुन तो आज शुक्रवारी सकाळी नऊ वाजता 50 हजार क्युसेक करण्यात आला आहे. आज कोयना धरणात 86.63 टीएमसी … Read more

जिल्ह्यातील धबधबे आणि सर्व पर्यटन स्थळे 5 ऑगस्टपर्यंत बंद राहणार; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

Jitendra Dudi News 20240801 210319 0000

सातारा प्रतिनिधी | भारतीय हवामान विभाग, मुंबई यांनी 1 ते 5 ऑगस्ट 2024 अखेर सातारा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा रेड व ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. सातारा जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत आहे. हवामान विभागाने सातारा जिल्ह्यात आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अशात जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळांच्या ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये. जिवीत … Read more