ई-केवायसीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ; जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना मिळाला दिलासा

Satara News 92

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना दि. ३० सप्टेंबरपर्यंत ई केवायसी करून घेण्याचे आवाहन पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले होते. त्यानुसार काही शिधापत्रिकाधारकांनी ई केवायसी करून घेतली. त्यानंतर आता अशासनाने ई केवायसी करून घेण्यासाठीची मुदत वाढवली असून ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे ई केवायसी बाकी राहिलेल्या शिधापत्रिकाधारकांना दिलासा मिळालेला आहे. सातारा जिल्ह्यात अद्याप १२ … Read more

उत्तर कोरेगावमध्ये समाधानकारक पाऊस; देऊरचा तळहिरा तलाव झाला ओव्हरफ्लो

Satara News 90

सातारा प्रतिनिधी । उत्तर कोरेगाव मधील देऊर येथील तळहिरा तलाव यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने ओव्हर फ्लो झाला आहे. तलाव पूर्ण क्षमतेने भरला असल्यामुळे परिसरातील पाणी प्रश्न मिटला असून बळीराजा सुखावला आहे. गेल्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने सर्वत्र दुष्काळ परिस्थिती होती या परिस्थितीमध्ये येथील तळहिरा तलाव पूर्ण कोरडा पडला होता. त्यामुळे परिसरातील देऊर, तळीये, वाठार स्टेशन … Read more

अजित पवारांनी सातारा जिल्ह्यातील फलटण विधासभेचा फोनवरून केला पहिला उमेदवार जाहीर

Satara News 20240930 130024 0000

सातारा प्रतिनिधी । राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील उ,जागा वाटप आणि उमेदवारी निश्चितीच्या राजकीय हालचाली चांगल्याच वाढल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील जन सन्मान यात्रेच्या माध्यमातून विधानसभेची जोरदार तयारी सुरू केली असून, महायुतीच्या जागावाटपाची घोषणा होण्या अगोदरच अजितदादांनी आपला पहिला उमेदवारही जाहीर केला आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांना … Read more

घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून महिला उपअधीक्षकासमोरच एकाने पेटवून घेण्याचा केला प्रयत्न; 3 जणांवर गुन्हा दाखल

Crime News 20240925 140351 0000

सातारा प्रतिनिधी | कोरेगाव तालुक्यातील साठेवाडी येथील घरकुलाच्या जागेची मोजणी करून द्यावी अशी मागणी करीत उत्तम मोरे याने स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच भूमी अभिलेखच्या उपअधीक्षक लता घरात यांच्या अंगावर डिझेल ओतून ढकलून दिल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी उत्तम मोरे याच्यासह तीन जणांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा व जिवे मारण्याच्या … Read more

सातारा जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात उमेदवार देणार; RPI गवई गटाच्या डॉ. राजेंद्र गवईंची घोषणा

Koregaon News 20240924 151507 0000

सातारा प्रतिनिधी | आगामी विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यात सर्व विधानसभा मतदार संघात आरपीआय गवई गटाचे उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा गवई गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेंद्र गवई यांनी नुकतीच केली. कोरेगाव येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचा निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्याला राष्ट्रीय नेते राजेंद्र गवई यांनी मेळाव्यात बोलताना म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत … Read more

मराठा आरक्षणप्रश्नी संभ्रम निर्माण करून राजकीय पोळी भाजून घेण्याचे सरकारचे काम – शशिकांत शिंदे

Satara News 20240919 102805 0000

सातारा प्रतिनिधी | मनोज जरांगे- पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा आंदोलन सुरू केले आहे. कोणत्याही समाजाच्या नेत्याला आंदोलनास बसण्याची हौस असते काय? सरकार म्हणून तुम्ही दिलेल्या ग्वाहीची अंमलबजावणी व्हावी, एवढीच आंदोलकांची अपेक्षा असते. नक्की आरक्षण कसे देणार, हे सरकारनेच जाहीर करायला हवे. आरक्षणाच्या बाजूला असल्याची भूमिका विरोधकांनी आधीच स्पष्ट केली आहे. पन्नास टक्क्यांच्या वरील आरक्षण … Read more

आगामी पंचवीस वर्षे तरी अजित पवारांना पर्याय नाही – नितीन पाटील

Satara News 20240917 083920 0000

सातारा प्रतिनिधी | कोरेगाव तालुका नागरी सत्कार समितीच्या वतीने खासदार नितीन पाटील यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी राजकारणात दिशा चुकवू नका. दिशा चुकली की राजकारणाला फुलस्टॉप लागतो. अडचणी असतील तरी आपण बसून मार्ग काढू. परंतु, आता दिलेला शब्द काही झाले तरी पाळणारे एकमेव नेतृत्व म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. आगामी २५ वर्षे तरी … Read more

आ. शशिकांत शिंदे हे फरार गुन्हेगार, खोट्या प्रतिज्ञापत्रावर त्यांनी वाशीमध्ये 6 कोटींचं घर घेतलं; आ. महेश शिंदेंचा गंभीर आरोप

Satara News 20240916 201554 0000

सातारा प्रतिनिधी | विधान निवडणुकीच्या तोंडावर कोरेगाव विधानसभा मतदार संघात आरोप-प्रत्यारोप शिगेला पोहचले आहेत. कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष आणि शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी शरद पवार गटाचे विधान परिषद आमदार शशिकांत शिंदेंवर गंभीर आरोप केले आहेत. कोरेगावचे आमदार पोलिसांना हाताशी धरून सुडबुध्दीने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तडीपार करायला लावत असल्याचा आरोप आ. शशिकांत शिंदे यांनी केला … Read more

दहावा, तेराव्याच्या कार्यक्रमांना असे अनेक कावळे फिरतात…; नाव न घेता शिंदेंच्या आमदाराची पवारांवर टीका

Political News 20240910 132451 0000 1

सातारा प्रतिनिधी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नाव न घेता आज निशाणा साधला आहे. “दहावा आणि तेराव्याच्या कार्यक्रमांना असे अनेक कावळे फिरतात. त्याने काही फरक पडत नाही. ते फक्त प्रसाद उचलतात अन् निघून जातात,” अशी टीका आमदार शिंदे यांनी केली. आमदार … Read more

कोरेगावच्या उत्तर भागात लम्पीचा प्रादुर्भाव; आजारी जनावरांमुळे दूध उत्पादनात घट

Satara News 20240908 112702 0000

सातारा प्रतिनिधी | जिल्ह्यात जनावरांना लम्पी त्वचारोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असून, या आजारामुळे पशुपालकांचे मोठे नुकसान होत आहे. पसरणी परिसरात तीन दिवसांपूर्वी एक लम्पी आजाराने त्रस्त असणारी गाय आढळले. तर कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागात लंपीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पशुधन मालकांत भीतीचे वातावरण आहे. शेतीला जोडधंदा म्हणून या भागात मोठ्या प्रमाणात पशुपालन केले जाते. त्यामुळे … Read more

सोळशीत 100 वर्षांपूर्वीच्या मूर्ती; नायगावातून तांब्याची घंटा लंपास

Crime News 20240820 102118 0000

सातारा प्रतिनिधी | कोरेगाव तालुक्यातील सोळशी येथील मंदिरातून शंभर वर्षांपूर्वीची शुळपानेश्वर देवाची पंचधातूची मूर्ती अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. यावेळी नायगावच्या नागनाथ मंदिरातून तांब्याची घंटा चोरीला गेल्याचेही सोमवारी सकाळी ग्रामस्थांच्या निदर्शनाला आले. दरम्यान, ऐन श्रावण महिन्यात मंदिरात झालेल्या या चोऱ्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद वाठार स्टेशन पोलिस ठाण्यात … Read more

ट्रेनी डॉक्टरच्या हत्येप्रकरणी कोरेगावात निघाला निषेध मोर्चा

Satara News 20240818 082925 0000

सातारा प्रतिनिधी | कोलकाता येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील ट्रेनी डॉक्टरसोबत अत्याचार आणि हत्या केल्यावर देशभरात निषेध आणि आंदोलने सुरु आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनने देखील याबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे शनिवारी कोरेगाव शहर आणि तालुक्यातील सर्व वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात आल्या. कोरेगावातील आंदोलनाला समाजातील सर्वच घटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नगरपंचायत, रोटरी क्लब, इनरव्हील क्लब, केमिस्ट … Read more