सातारा जिल्ह्यात सरासरी 10.4 मि.मी. पाऊस; नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

Heavy Rains News

कराड प्रतिनिधी । जिल्ह्याच्या पश्चिम भागात मागील तीन आठवड्यांपासून पाऊस पडत आहे. कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजा, महाबळेश्वरसह संपूर्ण कांदाटी खोऱ्यात जोरदार पाऊस पडलयामुळे परिसरातील ओढे, नाले भरून वाहत आहेत. तसेच भातखाचरेही भरून गेली आहेत. त्याचबरोबर जोरदार पावसामुळे धोम, बलकवडी, कोयना, तारळी, कण्हेर, उरमोडीसारख्या प्रमुख धरणांतील पाणीसाठाही वाढत चालला असून सातारा जिल्ह्यात सरासरी 10.4 मि.मी. … Read more

पाणी टंचाईग्रस्त भागात तातडीने उपाययोजना करा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Jitendra Dudis News

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत खंडाळा, पाटण, जावली, महाबळेश्वर, सातारा या पाच तालुक्यामध्ये कमी प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली आहे. तसेच माण, खटाव, फलटण, कोरगाव, वाई, कराड या सहा तालुक्यामध्ये कमी प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने टँकरने पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. या गावात विहीर अधिग्रहण करण्याच्या अधिकाराला 31 जुलै पर्यंत मुदतवाढ दिली जात आहे. त्यामुळे अधिकाऱ्यानी … Read more

पहाटेच्या वेळी धुक्यांऐवजी दिसले धुरांचे लोट; पिंपोडे बुद्रुकमधील मुख्य बाजार पेठेत घडलं असं काही…

main market place in Pimpode Budruk fire

कराड प्रतिनिधी । कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथील एस. टी. बसस्थानक परिसरात मुख्य बाजारपेठेत दत्तात्रय काशिनाथ महाजन यांच्या राहत्या घराला व त्यांच्या इमारतीतील कृषी सेवा केंद्राला आज बुधवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीमुळे 50 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. स्थानिकांनी पाण्याचे टँकर व वाई नगरपालिकेच्या … Read more

स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई : 2 पिस्टलसह 5 जिवंत काडतुसे; 3 कोयता जप्त, तडीपार आरोपींना अटक

Satara Crime News

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात व जिल्ह्यात वाढत असलेली गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून धडक कारवाईची मोहीम राबविली जात आहे. दरम्यान, शुक्रवार आणि शनिवार रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या ६ पथकांनी कॉम्बिंग ऑपरेशन राबविले. यामध्ये आकाशवाणी झोपडपट्टी, नामदेववाडी झोपडपट्टी, बुधवार नाका, लक्ष्मी टेकडी झोपडपट्टी, वनवासवाडी एमआयडीसी या ठिकाणी छापा टाकला. तसेच तेथून 2 देशी बनावटीची पिस्टलसह … Read more

‘संवाद-तक्रारदारांशी’ मधून पोलीस साधणार नागरिकांशी थेट संवाद

Police Department

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून अनेक घटना घडत आहेत. कधी चोरी तर कधी मारामारी या घटना घडल्यानंतर पोलिसांकडून तात्काळ कारवाई देखील केली जातेय. मात्र, पोलीस विभागातही अनेकी समस्या आहेत. त्या संबधीत समस्या सोडवण्याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा कार्यालय स्तरावर एक उपक्रम राबविला जात आहे. ‘संवाद तक्रारदारांशी’ हा उपक्रम पोलीस विभागाच्यावतीने राबविला जाय … Read more

पाठीत खंजीर खुपसणे म्हणजे काय असते हे पवारांना आता चांगलेच कळले असेल : शालिनीताई पाटील

Shalinitai Patil News

कराड प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजप-शिंदे सरकारसोबत जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या घटनेनंतर अनेक राजकीय घडामोडी घडू लागल्या असून यावरून कोरेगावच्या माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला आहे. देशात विश्वासघातकी राजकारणाला शरद पवार यांनीच सुरुवात केली आहे. स्व. वसंतदादा पाटील यांच्या … Read more

वर्धनगडावरील ‘ते’ अतिक्रमण पोलिस बंदोबस्तात हटवले; पहाटेपासून राबविली कारवाईची मोहीम

Vardhangad News

कराड प्रतिनिधी । खटाव तालुक्यातील वर्धनगड किल्ल्यावरील दर्गा परिसरात असलेले अतिक्रमण आज पहाटेपासून पोलीस प्रशासन व वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हटवण्यास सुरुवात करण्यात आली. आज पहाटेच्या सुमारास पोलिस व वन विभागचे पथक वर्धनगड किल्ल्याच्या पायथ्याशी दाखल झाले. तसेच पोलीस व वनविभागाच्या पथकाकडून अतिक्रमण हटवण्यास सुरुवात करण्यात आली. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गडाच्या … Read more

सातारा जिल्ह्यात 131 नवी रेशनिंगची दुकाने सुरु होणार

District Supply Officer Vaishali Rajmane News

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागाकरिता रास्त भाव दुकानातून स्वस्त धन्याचा पुरवठा केला जातो. शासनाच्यावतीने पुरवठा करल्या जाणाऱ्या रास्त भाव दुकानांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील एकूण 11 तालुक्यामध्ये 131 नव्याने रास्त भाव दुकाने सुरु करण्यात येणार आहेत. या दुकानांना मंजुरी देण्याच्या अनुषंगाने आज दि. 1 जुलै … Read more

सातारा जिल्ह्यातील 110 ग्रामपंचायती होणार पेपरलेस

Satara ZP

कराड प्रतिनिधी | राज्यातील ग्रामपंचायती पेपरलेस करण्याचे प्रयत्न राज्य शासनाच्यावतीने केले जात आहेत. त्यासाठी राज्य शासनाकडून महा ई- ग्राम संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहेे. या प्रणालीच्या वापरातून सातारा जिल्ह्यातील 110 ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे निवडलेल्या ग्रामपंचायती पेपरलेस होणार आहे. सातारा जिल्ह्यातील पेपरलेस ग्रामपंचायतीसाठी निवड केलेल्या ग्रामपंचायतींमध्ये अकरा तालुक्यातील प्रतेकी 10 ग्रामपंचायतींना … Read more

इंच ना इंच जमीन पाण्याखाली येत नाही, तोपर्यंत काम करत राहणार : आ. महेश शिंदे

Mahesh Shinde News

कराड प्रतिनिधी । कै. लक्ष्मणराव इनामदार जिहे कटापूर उपसा जलसिंचन योजना १९९७ मध्ये मंजूर झालेली ही उपसा सिंचन योजना युती सरकार सत्तेतून जाताच बासनात गुंडाळली होती. कालांतराने पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजनेसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला. बुद्धीभेदाचे व लबाडीचे राजकारण करत केवळ बोंबा मारणाऱ्यांकडे आता दुर्लक्ष … Read more

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये निवडणूक घेण्याचे धाडस नाही : आ. बाळासाहेब पाटील यांचा हल्लाबोल

Balasaheb Patil Devendra Fadnavis Eknath Shinde

कराड प्रतिनिधी । राज्यात शिंदे-फडणवीस सरकारकडून जनतेचे अनेक प्रश्न सोडवले जात नाहीत. राज्यात सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका पालिका, नगरपालिका यांवर प्रशासक आहेत. या सरकारमध्ये निवडणूका घेण्याचे धाडस करत नाही. कारण त्यांना निवडणुका घेतल्या तर धक्का बसू शकतो हे चांगले माहिती आहे. या सरकारने मंत्रिमंडळ विस्तार केला नसल्यामुळे एका मंत्री महोदयांकडे अनेक खात्यांची जबाबदारी … Read more

‘7 हजार रुपये द्या घरातील भांडणे दैवी शक्तीने सोडवतो,’ म्हणणारा जंगू बाबा अडकला सापळ्यात

Crime News

सातारा प्रतिनिधी । घरावर पितृदोष असून कोणीतरी करणी- भानामती केली आहे. हा दोष काढण्याचे आश्वासन देऊन 3 हजार 500 रुपयांना गंडा घालणाऱ्या कोरेगाव तालुक्यातील अंभेरीतील भोंदू बाबाला रहिमतपूर पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सहकार्याने पोलिसांनी कारवाई केली असून याप्रकरणी भोंदू बाबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जंगू अब्दुल मुलाणी (वय 72, रा.अंभेरी, … Read more