सातारा जिल्ह्यात टँकरची वाटचाल दीड शतकाकडे; 8 तालुक्यांना ‘इतक्या’ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Water News 20240403 185013 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील पाणीटंचाई दिवसेंदिवस भीषण होऊ लागली आहे. जिल्ह्यात एकूण ११ तालुक्यांची संख्या आहे. या तालुक्यांपैकी ८ तालुक्यांत सद्या टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. जिल्ह्यात १३७ गावे व ४३५ वाड्या-वस्त्यांवरील २ लाख ४२ हजार २५१ जनतेस १४८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. माण तालुक्यात सर्वाधिक ७५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सातारा जिल्ह्यात … Read more

सातारा कधी वाकत नाही अन् तुतारीशिवाय इथं काही वाजणारच नाही’ : खासदार श्रीनिवास पाटील

Srinivas Patil News 20240403 171746 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा निवडणुकीमुळे जिल्हयातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या वातावरणात महायुती आणि महाविकास आघाडीकरून पदाधिकाऱ्यांच्या बैठका, मेळावे घेतले जात आहेत. अशात नुकताच कोरेगाव तालुक्यात वडाचीवाडी येथे कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला. यात खासदार श्रीनिवास पाटील यांनी चांगलेच दमदार भाषण केले. “सातारा कधी वाकत नाही. त्यामुळे येथे तुतारीशिवाय काही … Read more

अखेर देऊर तलावातील पाणीपुरवठा विहीर झाली कार्यान्वित

Water News 20240328 131019 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागावर ‘दुष्काळी’ हा शिक्का कायमच बसला असून, या भागात सध्या 50 रुपये प्रतिबॅरल या दराने पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. या परिस्थितीत देऊर ग्रामपंचायतीने तळहिरा पाझर तलावातील विहिरीचे 2016 पासून रखडलेले काम पूर्ण करून, गावाला पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे देऊरकरांची तहान भागवण्यास मदत होणार आहे. जिल्हा … Read more

जरंडेश्वर – सातारा ब्लॉकमुळे रेल्वेसेवा होणार विस्कळित; आजपासून ‘या’ गाड्या रद्द

Satara News 20240326 110915 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | मध्य रेल्वेच्या (Central Railway) पुणे विभागातील लोहमार्गाच्या दुहेरीकरणातील इंजिनिअरिंग व इतर कामांसाठी पुणे-सातारा लोहमार्गातील जरंडेश्वर – सातारा या दरम्यान आजपासून दि. २६ शुक्रवार अखेर दि. २९ ‘ट्रॅफिक ब्लॉक’ घेण्यात आलेला असून, त्यामुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्या नियमित वेळेपेक्षा उशिरा सुटणार आहेत. मंगळवारी दि.२६ रेल्वे गाडी क्रमांक ०१४२३ … Read more

निवडणूक काळात ‘एक खिडकी योजने’तून कोरेगावकरांना मिळणार विविध परवाने

Koregaon News jpg

सातारा प्रतिनिधी । लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कामांकरिता विविध राजकीय पक्ष आणि त्यांच्या इच्छुक उमेदवारांना आदर्श आचारसंहिता कालावधीत विविध परवानग्यांसाठी परवाने दिले जातात. त्या परवान्यांच्या वितरणासाठी निवडणूक विभागाकडून एक खिडकी कक्ष सुरू करण्यात आला आहे. कोरेगाव येथील डी. पी. भोसले कॉलेजमध्ये हा कक्ष स्थापन करण्यात आला असल्याची माहिती कोरेगावचे उपविभागीय अधिकारी अभिजित नाईक यांनी दिली. राजकीय … Read more

कोरेगाव, सातारारोड, रेवडीमध्ये पोलीस आणि BSF चे संचलन

Koregav News jpg

सातारा प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीच्या आचार संहितेची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी, आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये, यासाठी कोरेगाव, सातारारोड व रेवडी येथे पोलीस आणि सीमा सुरक्षा दलाच्या पथकाच्यावतीने नुकतेच सशस्त्र संचलन करण्यात आले. पोलीस उपअधीक्षक सोनाली कदम व कोरेगावचे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या नेतृत्वाखाली सपोनि दिवसे, पोलीस … Read more

कालव्यातून पाणी उपसा प्रतिबंधासाठी जलसंपदा विभागाचे महत्वाचे आवाहन

Satara News 2024 03 18T182947.453 jpg

सातारा प्रतिनिधी । सध्या सातारा जिल्ह्यात कोरेगाव, माण, खटावसह काही भागात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत या तालुक्यात समन्यायी पद्धतीने सिंचनासाठी आवश्यक पाणी विसर्ग पोहचण्यासाठी अडचण निर्माण होणार असल्याचे लक्षात घेत सिंचन विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडे तालुक्यातील कालव्याच्या दोन्ही बाजूला आवश्यकतेनुसार ३० मीटर ते ५० मीटर अंतरावर कलम १४४ आदेश लागू … Read more

बोरीवमध्ये नवीन पाणीपुरवठा नळ पाइपलाईन योजनेच्या कामास शुभारंभ

Boriv News jpg

सातारा प्रतिनिधी । कोरेगाव तालुक्यातील बोरीव या गावात ग्रामपंचायतीच्या वतीने जलजीवन मिशनच्या कार्यक्रम अंतर्गत नवीन पाणीपुरवठा नळ पाइपलाईन योजनेच्या कामाचा आज शुभारंभ करण्यात आला. यावेळी गावचे सरपंच राजेंद्र पुजारी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामास सुरुवात करण्यात आली. बोरीव गावात सुरू करण्यात आलेल नळ पाईपलाईन योजनेच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी सामजिक कार्यकर्ते श्री. संतोष दत्तु पोळ, राजेंद्र … Read more

कोरेगाव उत्तरमधील ‘या’ गावांत पाणी टंचाई; ग्रामस्थांसह महिला आक्रमक

Koregaon North News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यामधील कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागातील सोळशी, नायगाव, नांदवळ, सोनके या चार गावांच्या परिसरात भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर काल दि. १४ रोजी नायगाव येथील महिलांनी ग्रामस्थांच्या वतीने गावात हंडा मोर्चा काढण्यात आला. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागात सध्या मार्च महिन्यातच … Read more

अमावास्येसाठी नारळ, फुले घेऊन निघालेल्या दोघा कामगारांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू

Crime News 25 1 jpg

सातारा प्रतिनिधी । कोरेगाव तालुक्यात अलीकडच्या काळात दुचाकी आणि चारचाकी वाहनाच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अशीच एक अपघाताची घटना काल रविवारी कोरेगाव तालुक्यातील भोसे गावच्या परिसरातील कुमठे फाट्यावर घडली. अमावस्या असल्याने अमावास्येसाठी नारळ आणि फुले आणण्यासाठी दुचाकीवरून दोन कामगार कोरेगावला निघाले होते. नारळ आणि फुले घेऊन परतत असताना दोघं कामगारांचा कुमठे फाट्यावर अज्ञात वाहनाच्या धडकी … Read more

परतवाडीत अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा; घेतले दोन मोठे निर्णय

Satara News 70 jpg

सातारा प्रतिनिधी । जागतिक महिला दिन शुक्रवारी सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. या महिला दिनाचे औचित्य साधून कोरेगाव तालुक्यातील परतवडीये एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. गावातील सर्व महिलांनी महिला दिन नियोजन करून महिला दिन साजरा केला. यावेळी महिलांचे आरोग्य, लहान मुलाचे संगोपण, विधवा प्रथा बंद करणे, तीन दिवसाचे सुतक पाळणे या महत्वाच्या विषयावरती सखोल चर्चा … Read more

सातारा जिल्ह्यात 23 लाख रुपये किंमतीची 114 किलो अफूची झाडे जप्त, दोघांना अटक

Crime News 27 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात दोन ठिकाणी छापा मारून स्थानिक गुन्हे शाखेने २३ लाख रुपये किंमतीची अफूची झाडे जप्त केली आहेत. याप्रकरणी दीपक आबा झणझणे (रा. सासवड-झणझणे, ता. फलटण आणि मधुकर शिवाजी कदम (रा. देऊर, ता. कोरेगाव) यांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना खबऱ्याकडून माहिती सासवड (झणझणे) आणि … Read more