लोणंद- सातारा रेल्वे मार्गावरील ‘हे’ रेल्वे फाटक सोमवारपासून 3 दिवस राहणार बंद; नेमकं कारण काय?

Railway Department News

सातारा प्रतिनिधी । सातारा महामार्गावरील कोरेगाव तालुक्यातील देऊर येथील रेल्वे फाटक क्रमांक ४७ हे सोमवारपासून (दि. ३) पासून तीन दिवसांसाठी बंद करण्यात येत आल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. याबाबत वाठार स्टेशन येथील रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लोणंद- सातारा रेल्वे मार्गावरील देऊर रेल्वे फाटक क्रमांक ४७ हे रेल्वे रुळाच्या दुहेरीकरण व दुरुस्तीसाठी तसेच निरीक्षणासाठी … Read more

Ajit Pawar : अजित पवारांना मोठा धक्का? जरंडेश्वर कारखाना घोटाळ्याची ACB विभागाकडून चौकशी सुरू

Ajit Pawar News

सातारा प्रतिनिधी । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना अडचणीत आणणारी बातमी समोर आली आहे. अजित पवार यांच्याशी संबंधित कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर साखर कारखान्याची पुन्हा एकदा राज्य सरकारकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे. पुणे लाचलुचपत विभागाकडून या कारखान्यातील गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरु करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा संपल्यानंतर चौकशी सुरु जरंडेश्वर साखर … Read more

चार मोरांची शिकार करणारा वन विभागाच्या ताब्यात

Satara News 20240524 090546 0000

सातारा प्रतिनिधी | चार मोरांची शिकार करून वाहतूक करणाऱ्यास कर्मा वन विभागाच्या पथकाने रंगेहात पकडल्याची घटना कोरेगाव तालुक्यातील वेळू येथे घडली आहे. संबंधित शिकाऱ्याकडून मोर मारण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य व दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. कर्मा परशा काळे (रा. बोरगाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कोरेगावचे वनक्षेत्रपाल वैभव घार्गे … Read more

पिकअप दुचाकीच्या धडकेत सातारा शहर ठाण्यातील पोलिसाचा मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल

Satara News 4 1

सातारा प्रतिनिधी । सातारा शहराजवळ पिकअपने दुचाकीला दिलेल्या जोरात धडकेत सातारा शहर ठाण्यात कार्यरत असणारे हवालदार संदीप साहेबराव कणसे यांचा म्रुत्यु झाला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात पिकअप चालकावर गुन्हा दाखल करण्यात आहे. पोलीस हवालदार कणसे हे अंगापूर वंदन येथील रहिवाशी होते. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संदीप कणसे (वय ४७, रा. अंगापूर वंदन) हे … Read more

एकंबे परिसर पाणीदार होऊन जलक्रांती घडवली जाणार!

Water News 20240520 084117 0000

सातारा प्रतिनिधी | पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य शेतीनिष्ठ गाव म्हणून एकंबे गावची ओळख आहे. या नावलौकिक असलेल्या एकंबे परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी भारत फोर्ज लिमिटेड सीएसआर विभाग निश्चितपणे प्रयत्न करेल. त्यातून परिसर पाणीदार होऊन जलक्रांती घडवली जाईल, असा विश्वास सीएसआर विभाग प्रमुख डॉ. लीना देशपांडे यांनी व्यक्त केला. भारत फोर्ज लिमिटेड सीएसआर विभागामार्फत एकंबे येथे डोंगर पायथ्याला … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘या’ पालिकेने केला धोकादायक इमारतींचा सर्वे

Survey Dangerous Building News 1

सातारा प्रतिनिधी । पावसाळा जवळ आला की शहरी भागातील पालिका प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने उपाययोजना आखण्यास सुरुवात केली जाते. याचा एक भाग म्हणजे कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर नगरपालिकेच्या वतीने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक इमारतींचा सर्व्हे करण्यात आला आहे. या सर्व्हेमध्ये तब्बल २३ इमारती धोकादायक आढळल्याचे दिसून आले आहे. रहिमतपूर नार्गपैकेच्या हद्दीत असलेल्या व मोडकळीस पडलेल्या इमारती, घरे … Read more

माझ्या प्रमुख कार्यकर्त्यांवर ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न; शशिकांत शिंदेंचा थेट आरोप

Satara News 2024 05 13T124534.331

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर महायुतीतील भाजप नेत्यांकडून गंभीर आरोप करण्यात आले. त्यांच्या आरोपांना शिंदेनी प्रत्युत्तर देखील दिले. आता प्रत्यक मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आमदार शशिकांत शिंदे यांनी एक गंभीर आरोप करत थेट तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. “लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभवाच्या भीतीने किंवा विरोधात मतदान … Read more

साताऱ्यातील कोरेगावसह कराड दक्षिण आणि उत्तरेत मतदानाचा टक्का वाढला, फायदा कुणाचा?

Satara News 20240508 160653 0000

सातारा प्रतिनिधी | संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या साताऱ्यात मंगळवारी (७ मे) हाय व्होल्टेज लढत झाली. मतदानात कोरेगाव विधानसभा मतदार संघात सर्वाधिक ६७.५१ टक्के मतदान झालं, तर कराड दक्षिणमध्ये ६५.६८ आणि कराड उत्तरमध्ये ६५.३३ टक्के मतदान झालंय. हा वाढलेला टक्का निकालात कोणाला फायद्याचा ठरणार, याचे आडाखे आता बांधले जात आहेत. सातारा लोकसभा मतदार संघात १८ … Read more

महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदेंनी कुटुंबीयासमवेत बजावला मतदानाचा हक्क

Satara News 20240507 105508 0000

सातारा प्रतिनिधी | महाविकास आघाडीचे (शरद पवार गट) उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव तालुक्यातील ल्हासुर्णे येथील मतदान केंद्रात मतदान केलं. पत्नी वैशाली, मुले तेजस आणि साहिल शिंदे यांच्या समवेत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. तत्पूर्वी त्यांनी देवदर्शन घेतलं. पत्नी वैशाली यांनी त्यांचं औक्षण केलं. त्यानंतर कुटुंबासोबत त्यांनी मतदान केलं. मी लोकशाहीच्या मंदिरात जावून मतदान केलं … Read more

जिल्ह्यात महिला, युवा, जवान, किसान दिव्यांग थीम नुसार मतदान केंद्रे

Koregaon News 20240503 150715 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात निवडणूक विभागाच्या वतीने मतदान जनजागृतीचाच एक भाग म्हणून विशिष्ट मतदान केंद्र काही घटकांना मध्यवर्ती ठेवून उभारली जाणार आहेत. या घटकांमध्ये दिव्यांग, महिला, जवान, किसान आणि तरुण यांचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघात अशी विशिष्ट मतदान केंद्रे उभी राहणार आहेत. त्यापैकी महिला मतदान केंद्राचे नाव सखी असे देण्यात आले … Read more

कोरेगाव ST आगारातील वर्कशॉप कर्मचाऱ्यांनी घेतली मतदानाची शपथ

Koregaon News 20240422 082102 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सर्वसामान्य समाजाशी थेट जोडलेल्या एसटी कोरेगाव आगारामध्ये आज मतदान जनजागृती उपक्रम घेण्यात आला. यावेळी कोरेगाव आगारातील वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे मतदानाची शपथ घेतली आणि लोकशाही अधिक बळकट करण्याचा निर्धार केला. यावेळी वर्कशॉप विभागाचे प्रमुख शुभम ढाणे ,वर्कशॉप मधील कर्मचारी तसेच जनजागृती पथकाचे प्रमुख यशेंद्र क्षीरसागर, पथकाचे सदस्य मंगेश घाडगे उपस्थित होते. यावेळी या … Read more

शरद पवारांना यशवंत विचारांचा विसर; महेश शिंदेंची घणाघाती टीका

20240421 164214 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभेसाठी भ्रष्टाचारी उमेदवार दिल्याने यशवंत विचारांवर बोलण्याचा शरद पवारांना अधिकार नाही, शरद पवारांना यशवंत विचारांचा विसर पडला आहे, अशी घणाघाती टीका कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी केली आहे. सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू असून निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान झाले आहे. तर पुढील टप्प्यांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर खोचली आहे. सत्ताधारी आणि … Read more