सातारा जिल्ह्यात चुरशीने मतदान सुरू; दुपारी 1 वाजेपर्यंत ‘इतके’ टक्के झाले मतदान

Satara News 74

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात आठही मतदार संघात सकाळी ७ वाजता मतदान प्रक्रियेस पारंभ झाला. सकाळी ७ ते ११ अशा चार तासात १८.७२ टक्के मतदान झाले. तर कोरेगावात चुरशीने मतदान सुरू असून २१.२४ टक्के मतदान झाले आहे. तर दुपारी 1 वाजेपर्यंत २५५ फलटण : 33.81, २५६ वाई : 34.42, २५७ कोरेगाव : 38.29, २५८ माण … Read more

सातारा जिल्ह्यात मतदानाचा वाढला वेग…; ‘या’ ठिकाणी 11 वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान

IMG 20241120 WA0014

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात पहिल्या टप्प्यात संथगतीने मतदान झाले. त्यानंतर मतदानाचा वेग वाढला असून सकाळी अकरा वाजेपर्यंत जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात चांगले मतदान पार पडले आहे. यामध्ये २५५ फलटण : 17.98, २५६ वाई : 18.55, २५७ कोरेगाव : 21.24, २५८ माण : … Read more

सातारा जिल्ह्यात विधानसभेसाठी मतदानास सुरुवात; 3 हजार 165 मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी

Satara News 20241120 092031 0000

सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील आठ मतदारसंघांत बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली. सदर मतदान प्रक्रिया पार जिल्ह्यातील ३ हजार १६५ मतदान केंद्रांवरून सुरू झाली आहे. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. निर्भय वातावरणात मतदान होण्यासाठी निवडणूक प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. जिल्ह्यात विधानसभेच्या आठ मतदारसंघांत चुरशीच्या लढती … Read more

पहिल्यांदाच मतदान करताय..? थांबा… अगोदर ‘हे’ वाचा आणि मग मतदानाला जा…

Satara News 20241120 073533 0000

सातारा प्रतिनिधी | राज्यासह सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली आहे. सातारा जिल्ह्यात मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. दरम्यान, आज म्हणजेच २० नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान सुरू झाले असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. आता तुम्ही नवमतदार असाल तर, मतदान कसं करायचं, मतदान … Read more

मतदार राजाला आकर्षित करण्यासाठी कुठे शेतकरी मतदान केंद्र तर आदर्श मतदान केंद्र

Satara News 65

सातारा प्रतिनिधी । मतदान हा भारतीय लोकशाहीचा आत्मा मानला जातो. विधानसभा निवडणुकीच्या निमिताने जिल्ह्यात उद्या बुधवारी लोकशाहीचा उत्सव पार पडणार आहे. तो धामधूममध्ये साजरा करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. दरम्यान, उद्या प्रत्यक्ष मतदान पार पडणार असून मतदार राजाला आकर्षित करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात काही मतदान केंद्रावर आकर्षक सजावट करण्यात आली आहे. … Read more

निवडणूक विभागाकडून EVM सह साहित्य घेऊन अधिकारी मतदान केंद्रांकडे रवाना

Satara News 61

सातारा प्रतिनिधी । राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून उद्या प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानास काही तास उरले असून सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात निवडणूक विभागाकडून मतदान केंद्राचे साहित्य वाटप करण्यास आज सकाळपासून सुरुवात करण्यात झाली आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात प्रथम वाई विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वात दुर्गम असलेल्या चकदेव मतदान केंद्राचे साहित्य … Read more

कोरेगावात 256 मतदारांचे घरातून मतदान; दिव्यांग 35 तर 221 ज्येष्ठांचा समावेश

Political News 20241118 123438 0000

सातारा प्रतिनिधी | कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग (पीडब्लूडी) आणि ज्येष्ठ नागरिक (८५+) अशा एकूण २७२ पैकी २५६ मतदारांनी गृहभेट कार्यक्रमातून घरच्या घरी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. कोरेगाव विधानसभा मतदार संघातील दिव्यांग (पीडब्लूडी) व ज्येष्ठ नागरिक (८५+) मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे, यासाठी निवडणूक आयोगाचे निर्देश आणि सूचनेनुसार कोरेगाव मतदारसंघात १६ पथकांद्वारे आठ ते दहा नोव्हेंबर … Read more

कोरेगावातील ‘त्या’ ऑडिओ क्लिपची चौकशी करा; शशिकांत शिंदेंची निवडणूक आयोगाकडे मागणी

shshikant shinde News

सातारा प्रतिनिधी | ‘कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सध्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवरील उमेदवारांच्या क्रमावरून चुकीचा संदेश देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ही ऑडिओ क्लिप नेमकं कोण व्हायरल करत आहे, याचा शोध पोलिसांनी तसेच निवडणूक आयोगाने घ्यावा,’ अशी मागणी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात प्रचारादरम्यान शशिकांत शिंदे यांनी शुक्रवारी … Read more

सोयाबीन खरेदी केंद्रांना ऑनलाइन नोंदणीस मुदतवाढ; सहकार विभागाच्या अवर सचिवांचे पत्र

Satara Agri News

सातारा प्रतिनिधी | जिल्ह्यात हमीभाव दराने सोयाबीन खरेदी करण्यासाठी पाच केंद्रांना मान्यता दिली आहे. या केंद्रांवर सोयाबीन घालण्यासाठी ऑनलाइन नोंदणीची मुदत आजपर्यंत देण्यात आली होती. मात्र, त्यास ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन चांगल्या पद्धतीने घेतले जाते. त्यामुळे उत्पादनही मोठ्या प्रमाणात होते. यावर्षीही सोयाबीनचे उत्पादन चांगले निघाले आहे. मात्र, बाजारपेठेत ऐन दीपावलीच्या … Read more

कराड उत्तरेत पालीचा खंडोबा कुणाला पावणार? सहाव्यांदा रिंगणात उतरलेल्या बाळासाहेबांसमोर ‘मनोधैर्य’चे तगडे आव्हान

Political News 1

कराड प्रतिनिधी । सध्या २०२४ मधील विधानसभा निवडणूक हि अटीतटीची असून सातारा जिल्ह्यातील आठ मतदारसंघात नऊ आमदार निवडणूक लढवत असून निवडणुकीत कुणाच्या अंगांवर विजयाचा गुलाल पडणार आणि कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार? याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून बाळासाहेब पाटील सहाव्यांदा निवडणूक लढवत आहेत तर, त्यांच्या … Read more

कोरेगाव हद्दीत एसटी बसच्या धडकेत चिमुरडा ठार; बसचालकावर गुन्हा

Crime News 7

सातारा प्रतिनिधी । सातारा – पुसेगाव मार्गावर कोरेगाव तालुक्यातील गोळेवाडी गावच्या हद्दीतील एका हॉटेलसमोर भरधाव एस.टी.ने चार वर्षांच्या चिमुरड्याला पाठीमागून धडक दिली. यात हा चिमुरडा ठार झाला. श्रवण प्रसाद गोळे (वय ४, रा. सद्‌गुरूनगर, कोरेगाव) असे त्याचे नाव आहे. अपघाताची नोंद कोरेगाव पोलिस ठाण्यात झाली आहे. रविवारी रात्री पुसेगाव-सातारा ही बस (क्रमांक एम. एच. २० … Read more

साताऱ्यात नऊ आमदारांची प्रतिष्ठा पणाला; कुणाचा होणार करेक्ट कार्यक्रम!

Satara News 25

सातारा प्रतिनिधी । राज्याच्या राजकारणात सातारा जिल्ह्यातील नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जिल्ह्यातील चार नेते राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्याचं पाहायला मिळालं. यशवंतराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा जिल्ह्यातील मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत असताना राज्याच्या प्रमुखपदाची भूमिका बजावली. तर, बाबासाहेब भोसले आणि एकनाथ शिंदे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील मात्र, त्यांना देखील राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली … Read more