Satara News : गाढव चावल्याने चिमुरडी जखमी; गाढवाच्या मालकावर गुन्हा दाखल

Donky News 20231009 091843 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | आतापर्यंत आपण कुत्रा किंव्हा साप चावल्याच्या घटना एकल्या असतील. मात्र, आता चक्क एका पाळीव गाढवाने चावा घेतल्याने एक अडीच वर्षाच्या चिमुकली जखमी झाल्याची घटना खटाव तालुक्यातील मायणी येथे घडली आहे. या घटनेप्रकरणी गाढवाच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहिरा मोहसीन मुजावर (वय 2.5 रा. मायणी, ता. खटाव) असे मृत्यू झालेल्या चिमुरडीचे … Read more

पावसाच्या हजेरीनंतरही सातारा जिल्ह्यात अद्याप ‘इतक्या’ गावात ‘पाणीटंचाई’

Water Shortage Satara District News jpg

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. उन्हाळ्यातही वळीव बरसला नाही. त्यानंतर मान्सूनचा पाऊसही चांगला झाला नाही. मात्र, आता जिल्ह्यातील काही भागात परतीचा चांगला पाऊस झाल्याने टंचाईची स्थिती कमी झाली आहे. त्यामुळे टॅंकरची संख्या 102 वरुन आता 96 पर्यंत कमी झाली आहे. तरीही सध्या 86 गावे आणि 404 वाड्यांसाठी टॅंकरने पाणीपुरवठा … Read more

सातारा जिल्ह्यातील 4 दुष्काळी तालुक्यातील पाणी प्रश्नी उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून मोठी घोषणा

Devendra Fadnavis jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील कृष्णा प्रकल्पाच्या फेरजल नियोजनाबाबत काल महत्वाची बैठक सुपर पडली. बैठकीत फेरजुळ नियोजनास राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली. या महत्वाच्या निर्णयामुळे सातार्‍यातील दुष्काळप्रवण तसेच जे भाग पाण्यापासून संपूर्णपणे वंचित आहेत अशा भागांना याचा मोठा फायदा होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटमध्ये … Read more

सातारा जिल्ह्याच्या पाणी प्रश्नाच्या बैठकीत 2 टीएमसी पाण्यास मुख्यमंत्र्यांकडून मंजुरी मिळवत आ. महेश शिंदेंनी केला भन्नाट डान्स

MLA Mahesh Shinde News

सातारा प्रतिनिधी । वेटणे-रणसिंगवाडी येथील शेतीला पाणी मिळावे यासाठी दोन्ही गावातील ग्रामस्थ गेली 7 दिवसांपासून उपोषनास बसले होते. त्याच्या उपोषणस्थळी आज सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी भेट दिली. तसेच काल सातारा जिल्ह्याच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जलसंपदामंत्री देवेद्र फडणवीस यांची भेट घेतली असून त्यांनी बैठकीमध्ये सातारा जिल्ह्यातील 4 तालुक्यातील … Read more

सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर!; ‘या’ योजनेसाठी मिळणार 75 टक्के अनुदान

Satara Agriculture News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक नवीन अशा शेती अवजारे खरेदी, शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी विविध अशा योजनांच्या माध्यमातून अर्थसहाय्य केले जाते. अशाच एक योजनेसाठी शासनाकडून ७५ टक्के अनुदान दिले जाणार आहे. शेडनेट, हरितगृह या घटकांचा फलोत्पादन विकास अभियाच्या माध्यमातून लाभ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. माण, खटाव, वाई व महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी … Read more

वडुज तहसीलमधील एका विभागाची कुलूपाची हरवली चावी; पुढं घडलं असं काही…

Vaduj Tasil Office News 20230925 223417 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | खटाव तालुक्यातील वडूज येथील तहसील कार्यालयात आज एक अनोखा प्रकार घडला. येथील एका विभागाचा कारभार आज चावी हरवल्याने कुलूपबंद राहिला. दुपारी १२:३० वाजेपर्यंत चावीच सापडली नसल्यामुळे नागरिकांचा कामांचा खोळंबा झाल्याचे पाहून सामाजिक कार्यकर्त्यांनीच हे कुलूप तोडले आणि त्यानंतर कामकाज सुरू झाले. आज आठवड्याचा पहिला दिवस तसेच गेली 2 दिवस कार्यालयाला सुटी असल्याने … Read more

पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तब्बल 20 जण तडीपार; 32 जणांकडून वर्तणुकीबाबतचा बॉंड

Pusegaon Police Station 20230924 140837 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | खटाव तालुक्‍यातील पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीत गणेशोत्सव व ईद ए मिलादच्या अनुषगाने हद्दीतून 20 सराईत गुन्हेगारांविरोधात तडीपारीचे आदेश देण्यात आले आहेत. तर 32 इसमांकडून चांगल्या वर्तणुकीचा बॉंड पुसेगाव पोलिसांनी लिहून घेतला घेण्यात आहे. पुसेसावळी या ठिकाणी सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे जाळपोळ व दोन गटात वाद झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर पोलिसांकडून … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘या’ गावातील दर्ग्यात ‘गणपती बाप्पा मोरया’!

Khatgun News 20230924 104234 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात हिंदू व मुस्लिम या दोन धर्मातील सामाजिक एकोप्याचा संदेश देणारी अनेक उदाहरणे आपल्याला पहायला मिळतील. त्यातील एक म्हणजे सुमारे 350 वर्षांपूर्वीच्या खटाव तालुक्यातील खातगुण या गावात असलेल्या दर्ग्याच्या आवारातच गेल्या 45 वर्षपासून विघ्नहर्ता गणपती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा प्रेरणादायी संदेश दिला जात आहे. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील खातगुण हे … Read more

दुचाकी अपघातात आदर्श शिक्षिकेचा मृत्यू

Accident News 20230922 112410 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | विसापूर (ता. खटाव) येथे दुचाकी अपघातात आदर्श शिक्षिका संगीता अंकुश शिंदे (वय ४८, गादेवाडी) यांचा संगीता शिंद मृत्यू झाला. खटाव तालुका शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष अंकुश गणपत शिंदे यांच्या त्या पत्नी होत. मिळालेल्या माहितीनुसार, संगीता शिंदे गुरुवार (दि. २१) दुपारी साडेतीनच्या सुमारास पुसेगाववरून मूळ गाव असणाऱ्या गादेवाडीकडे निघाल्या होत्या. दरम्यान औंध-फलटण राज्य … Read more

दंगलीनंतर पुसेसावळीतील जनजीवन पूर्वपदावर; मात्र, मोठा पोलिस बंदोबस्त

Pusesavali News 20230915 131429 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सोशल मीडियातील आक्षेपार्ह पोस्टवरून झालेल्या दंगलीनंतर विस्कळित झालेले पुसेसावळी येथील जनजीवन प्रशासनाच्या प्रयत्नानंतर काल गुरुवारपासून पूर्वपदावर येऊ लागले आहे. प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी दुकाने उघडल्याने काहीअंशी तणाव दूर होण्याबरोबरच आर्थिक उलाढाल सुरू झाली. गणेशोत्सवास अवघे चार दिवस उरले आहेत. याच्या पार्श्वभूमीवर पुसेसावळी येथील गणेशमूर्ती व्यावसायिकांनी आपले स्टॉल तसेच गणपती सजावटीच्या साहित्याची … Read more

72 तासांनी जिल्ह्यातील इंटरनेट सेवा सुरू; पुसेसावळी घटनेतील ‘त्या’ 16 जणांना पोलीस कोठडी

Satara Intarnet News 20230914 094604 0000 jpg

कराड प्रतिनिधी | खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे रविवारी रात्री दोन गटात राडा झाल्यानंतर पोलिस प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद केली होती. ती आज सकाळपासून सुरू केली आहे. सोशल मीडियाचा कोणत्याही स्वरुपाच्या अफवा पसरू नये यासाठी 72 तास इंटरनेट सेवा बंद केल्यामुळे लाखो रुपयांचे ऑनलाईन आर्थिक व्यवहार तसेच कामे ठप्प झाली होती. तर घटनेतील 16 … Read more

महिला पोलिसासह भावाविरोधात मारहाण, विनयभंगाचा गुन्हा दाखल; सासूनेच दिली फिर्याद

Crime News 20230908 092508 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील वडूज पोलिस ठाण्यात निर्भया पथकात कार्यरत असलेल्या महिला पोलिस व तिच्या भावाविरोधात दहिवडी पोलिस ठाण्यात मारहाण, विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. महिला पोलिस राणी खाडे- ओंबासे आणि तिचा भाऊ प्रमोद खाडे अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे असून याप्रकरणी सासूने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांकडून मिलेली माहिती अशी की, … Read more