गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीस पुसेगाव पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Crime News 14

सातारा प्रतिनिधी । पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी तसेच सातारा जिल्ह्यातील एकूण १४ गुन्ह्यामध्ये व १० पेक्षा अधिक एनवीडब्ल्यू व स्टँडींग वॉरंटमध्ये असलेला आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून फरारी होता. या फरार आरोपीस अटक करण्यात पुसेगांव पोलिसांना यश आले आहे. झाकीर रिकव्हल्या काळे (मूळ रा. मोळ, ता. खटाव, सध्या रा. भांडेवाडी ता. … Read more

जिल्ह्यातील आमदार साहेबांना सोशल मीडियात किती आहेत फॉलोअर्स?

Satara News 96

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आमदारकीसाठी अनेक नेतेमंडळींनी दंड थोपटले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी विद्यमान आठ आमदारांनाही आपापल्या पक्षाकडून उमेदवारी मिळण्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात ९ आमदार राहतील अशी परिस्थिती सध्या दिसत आहे. विधानसभेची निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होणार असून या निवडणुकीत जे आमदार आणि इच्छुक उभे राहणार आहेत त्यांच्याकडून सोशल … Read more

ई-केवायसीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ; जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना मिळाला दिलासा

Satara News 92

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना दि. ३० सप्टेंबरपर्यंत ई केवायसी करून घेण्याचे आवाहन पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले होते. त्यानुसार काही शिधापत्रिकाधारकांनी ई केवायसी करून घेतली. त्यानंतर आता अशासनाने ई केवायसी करून घेण्यासाठीची मुदत वाढवली असून ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे ई केवायसी बाकी राहिलेल्या शिधापत्रिकाधारकांना दिलासा मिळालेला आहे. सातारा जिल्ह्यात अद्याप १२ … Read more

“तुम्ही दोघांनी लोकसभा निवडणुकीमध्ये काय केलं हे सर्वांना माहितीय”; आ. गोरेंचा रामराजेंसह दीपक चव्हाणांवर निशाणा

Satara News 89

सातारा प्रतिनिधी । “रामराजे नाईक निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाण यांनी लोकसभेला कोणाचं काम केलं; हे पाहणं महत्त्वाचं आहे. तसेच त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये काय केलं; हे सर्व जनतेला माहित आहे; अशा शब्दात भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी निशाणा साधला. सातारा जिल्ह्यातील दहिवडी ‘लाडकी बहीण सन्मान सोहळा’ नुकताच पार पडला. यावेळी भाजप आमदार … Read more

ग्रामस्थांनी मागितलेली माहिती वेळेत दिली नाही; ग्रामसेविकेला 25 हजारांचा दंड

Satara News 80

सातारा प्रतिनिधी । ग्रामस्थांनी मागितलेली माहिती वेळेत न दिल्याने खटाव तालुक्यातील खातगुण येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविकेस राज्य माहिती आयुक्त कार्यालयाच्या पुणे खंडपीठाने २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. खटाव तालुक्यातील खातगुण येथील सामाजिक कार्यकर्ते युवराज तुकाराम गायकवाड यांनी २९ ऑगस्ट २०२२ रोजी माहिती अर्जान्वये जुनी ग्रामपंचायत साहित्य लिलाव व वित्त आयोगाकडून … Read more

औंधसह 16 गावांतील ग्रामस्थांनी ठेवला कडकडीत बंद; नेमकं कारण काय?

Aaundh News 20240930 064442 0000

सातारा प्रतिनिधी | खटाव तालुक्यातील महत्वाच्या अशा औंधसह 16 गावांच्या शेती पाणी प्रश्नी मागील आठ दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय जगदाळे यांच्याकडून उपोषण सुरू असून रविवारी शासनाच्या वेळकाढूपणा व दुर्लक्षाबाबत औंधसह सोळा गावातील आर्थिक व्यवहार व दुकाने बंद ठेऊन तसेच औंध येथे मोर्चा काढून शासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी औंध गावातून भव्य निषेध रॅली काढण्यात आली. … Read more

वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन चळवळ गावोगावी उभी रहावी : वैभव राजेघाटगे

Agri News 20240921 183448 0000

सातारा प्रतिनिधी | भौतिक सुविधांचा विकास करताना आपणच पर्यावरणाची मोठी हानी करत आहोत. त्यामुळे भविष्यात उद्भवणाऱ्या संकटांचा सामना करताना भावी पिढीला त्रास होऊ नये म्हणून शासन तसेच सामाजिक संघटना व ट्रस्ट यांच्या माध्यमातून वृक्षारोपण लावलेल्या वृक्षांचे संवर्धन अशी चळवळ गावोगावी उभी राहिली पाहिजे, असे प्रतिपादन गृहविभागाचे सहसचिव वैभव राजेघाटगे यांनी केले. पुसेगाव, ता. खटाव येथून … Read more

शेतात मोटर सुरू करण्यासाठी गेलेला मूकबधीर मुलगा बंधाऱ्यात बुडाला, आईच्या डोळ्यादेखत घडली घटना, पण…

Mhasawad News 20240916 091559 0000

सातारा प्रतिनिधी | आईच्या डोळ्यादेखत १८ वर्षाचा मुलगा पाण्यात बुडाल्याची घटना माण तालुक्यात घडली आहे. तो साताऱ्यातील मूकबधीर विद्यालयात दहावीच्या वर्गात शिकत होता. रात्री उशीरापर्यंत त्याचा शोध लागलेला नव्हता. शेतातील मोटार सुरू करण्यासाठी गेलेला १८ वर्षाचा मूकमधीर मुलगा बंधाऱ्यात बुडाल्याची घटना माण तालुक्यातील म्हसवडमध्ये घडली आहे. हणमंत मोहन शेंबडे (वय १८, रा. शेंबडेवस्ती-म्हसवड) असं मृत … Read more

फक्त तीनच महिने थांबा, महाविकास आघाडी सरकार येईल; शरद पवारांचे महत्वाचे विधान

Satara News 20240907 100251 0000

सातारा प्रतिनिधी | फक्त तीनच महिने थांबा, महाविकास आघाडीच्या माध्यमातून खटाव-माणचे चित्र बदलेल. येथील सर्व पाणी योजना पूर्णपणे मार्गी लावतो. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ग्रामविकासाचा दृष्टिकोन रयत शिक्षण संस्थेच्या सर्वच शाखांमधून आम्ही पुढे नेला, असे प्रतिपादन खासदार शरद पवार यांनी केले. निढळ, ता. खटाव येथील हनुमान विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर … Read more

मायणी मेडिकल कॉलेज प्रकरणात ED ने देशमुखांना घेतले ताब्यात

Mayni News 20240905 110524 0000

सातारा प्रतिनिधी | मायणी मेडिकल कॉलेज प्रकरणात सातारा आर्थिक गुन्‍हे शाखेत हजेरीसाठी आलेल्‍या दीपक देशमुख यांना अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने ताब्यात घेतले. मायणी मेडिकल कॉलेज अपहार प्रकरणातून गुन्‍ह्यांची मालिका दाखल झालेली आहे. वडूज पोलिस ठाणे तेथून सातारा आर्थिक गुन्‍हे शाखा व पुढे ईडीपर्यंत यातील गुन्‍हे वर्ग झालेले आहेत. दीपक देशमुख यांच्यावर मायणी मेडिकल कॉलेज प्रकरणातून २०२३ … Read more

मुख्यमंत्र्यांच्या ‘लाडकी बहीण’चा गैरफायदा; दाम्पत्याला वडूज पोलिसांनी घेतले ताब्यात

Crime News 20240904 084059 0000

सातारा प्रतिनिधी | राज्यभरातील महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत असतानाच खटाव तालुक्यात गैरकारभार झाल्याचे निष्पन्न झाले. या योजनेतील पैसे घेण्यासाठी महिलेने विविध पेहरावांत सेल्फी घेऊन फोटो अपलोड केले. अशा प्रकारे २९ अर्ज भरले असल्याचे समारे आल्यानंतर वडूज पोलिसांनी निमसोड, ता. खटाव येथील गणेश संजय घाडगे (वय ३०) व त्याची पत्नी … Read more

पुसेसावळी दंगलीतील मुख्य फरारी संशयिताला अटक, उद्यापर्यंत पोलीस कोठडी

Crime News 20240903 204137 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी (ता. खटाव) येथे झालेल्या दंगलीतील फरारी असलेल्या मुख्य संशयिताच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. दंगलीच्या घटनेला आठ दिवसांनी वर्ष पूर्ण होत आहे. त्यापूर्वी पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी गावात गतवर्षी झालेल्या दंगल आणि हत्येप्रकरणी फरारी असलेल्या मुख्य संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. नितीन … Read more