सातारा जिल्ह्यात विधानसभेसाठी मतदानास सुरुवात; 3 हजार 165 मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी

Satara News 20241120 092031 0000

सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील आठ मतदारसंघांत बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली. सदर मतदान प्रक्रिया पार जिल्ह्यातील ३ हजार १६५ मतदान केंद्रांवरून सुरू झाली आहे. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. निर्भय वातावरणात मतदान होण्यासाठी निवडणूक प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. जिल्ह्यात विधानसभेच्या आठ मतदारसंघांत चुरशीच्या लढती … Read more

पहिल्यांदाच मतदान करताय..? थांबा… अगोदर ‘हे’ वाचा आणि मग मतदानाला जा…

Satara News 20241120 073533 0000

सातारा प्रतिनिधी | राज्यासह सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली आहे. सातारा जिल्ह्यात मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. दरम्यान, आज म्हणजेच २० नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान सुरू झाले असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. आता तुम्ही नवमतदार असाल तर, मतदान कसं करायचं, मतदान … Read more

निवडणूक विभागाकडून EVM सह साहित्य घेऊन अधिकारी मतदान केंद्रांकडे रवाना

Satara News 61

सातारा प्रतिनिधी । राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून उद्या प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानास काही तास उरले असून सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात निवडणूक विभागाकडून मतदान केंद्राचे साहित्य वाटप करण्यास आज सकाळपासून सुरुवात करण्यात झाली आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात प्रथम वाई विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वात दुर्गम असलेल्या चकदेव मतदान केंद्राचे साहित्य … Read more

माण-खटाव विधानसभा मतदारसंघात यावेळी परिवर्तन निश्चित : शरद पवार

Karad News 20241117 103731 0000

सातारा प्रतिनिधी | दहिवडी (ता. माण) येथे माण खटाव विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर घार्गे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खा. शरद पवार यांची शनिवारी सभा पार पडली. यावेळी ‘माण-खटावमधील जनतेचे प्रश्न निकाली काढण्यासाठी येथील नेतेमंडळी एकत्रित आले आहेत. दोन्ही तालुक्यांतील प्रश्नांची जाण असलेल्या या नेत्यांची जबरदस्त शक्तीच माण-खटाव विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडवेल, … Read more

जिल्ह्यात नेत्यांच्या धडाडणार तोफा; पवार, ठाकरे, गांधींसह गडकरी, योगी, फडणवीसांची सभा

Satara News 20241114 100447 0000

सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून सातारा जिल्ह्यातील चुरशीच्या लढती होणाऱ्या मतदारसंघांत दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभातून तोफा धडाडणार आहेत. यामध्ये महायुतीकडून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे नेते प्रवीण दरेकर, तर महाविकास आघाडीकडून खासदार शरद पवार, प्रियांका गांधी, उद्धव ठाकरे, जयंत पाटील, अमोल कोल्हे … Read more

माण – खटाव मतदारसंघात ट्रम्पेट चिन्हावरून झाला वाद; उमेदवारावर गुन्हा दाखल

Crime News 20241114 083425 0000

सातारा प्रतिनिधी | माण-खटाव विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाच्या आदेशाची अंमलबजावणी न करता उमेदवार सत्यवान विजय ओंबासे (रा. वडगाव ता. माण) यांनी मतदारांवर गैरवाजवी प्रभाव पाडण्यासाठी डिजिटल फ्लेक्सवर ट्रम्पेट या चिन्हाच्या समोर कंसात तुतारी असे लिहून आणि स्पीकरवर ऑडिओ क्लिप प्रसारित केल्याने सदरच्या गाडीवर व उमेदवारावर वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक … Read more

जयकुमार गोरेंना कोविड घोटाळा भोवणार; हायकोर्टाने सातारा पोलीस अधीक्षकांना खडसावले

Jaykumar Gore News 20241113 083126 0000

सातारा प्रतिनिधी | कोविड घोटाळा भाजपचे सातारा येथील उमेदवार जयकुमार गोरेंच्या चांगलाच अंगलट आला आहे. या घोटाळ्याचा तपास कोणाच्याही दबावाखाली करू नका, असे उच्च न्यायालयाने मंगळवारी सातारा पोलीस अधीक्षकांना खडसावले आहे. घोटाळ्याचा निःसंदेह तपास करून त्याचा अहवाल पुढील सुनावणीत सादर करा, असे आदेशही न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने सातारा पोलिसांना दिले … Read more

साताऱ्यात नऊ आमदारांची प्रतिष्ठा पणाला; कुणाचा होणार करेक्ट कार्यक्रम!

Satara News 25

सातारा प्रतिनिधी । राज्याच्या राजकारणात सातारा जिल्ह्यातील नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जिल्ह्यातील चार नेते राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्याचं पाहायला मिळालं. यशवंतराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा जिल्ह्यातील मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत असताना राज्याच्या प्रमुखपदाची भूमिका बजावली. तर, बाबासाहेब भोसले आणि एकनाथ शिंदे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील मात्र, त्यांना देखील राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली … Read more

माण खटावच्या दोघां भावांचा संघर्ष मिटला; जयकुमार गोरेंच्या विजयासाठी बंधू शेखर गोरे प्रचारात

Political News 20241112 101907 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघाची निवडणूक सध्या सुरू असून निवडणुकीतील प्रचार वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान आठ विधानसभा मतदारसंघांपैकी मान खटाव विधानसभा मतदारसंघात सर्वात महत्त्वाचा चर्चेचा विषय ठरलेला भाजपचे आमदार जयकुमार कोरे व त्यांचे बंधू शेखर गोरे यांच्यातील वाद हा आता मिटलेला आहे. माण-खटाव विधानसभा मतदारसंघात साधारण पंधरा ते वीस वर्ष दोन … Read more

मायणीच्या चितळीत 155 लिटर ताडी जप्त; मायणी पोलिसांची धडक कारवाई

Crime News 20241112 081505 0000

सातारा प्रतिनिधी | विनापरवाना ताडीची चोरटी विक्री करणाऱ्या खटाव तालुक्यातील चितळी येथील एकावर मायणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपीकडून ५ कॅनमधील १५५ लिटर ३ हजार शंभर रुपये किमतीची ताडी जप्त करण्यात आली आहे. अंबाती रमेश नारायण गौड (वय ४३, रा. चितळी, ता. खटाव) असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत अधिक … Read more

कार्तिकी एकादशी निमित्ताने पंढरपूरला सातारा जिल्ह्यातून जाणार 122 जादा ST गाड्या

Satara News 20

सातारा प्रतिनिधी । दरवर्षी कार्तिकी एकादशीनिमित्त महाराष्ट्रातून लाखो भाविक पंढरपूरला एसटी, रेल्वे तसेच खासगी वाहनांनी जातात. दरवर्षीप्रमाणे यंदाही रेल्वे आणि एसटीकडून भाविकांच्या प्रवाशाच्या सोयीसाठी जादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. कार्तिकी एकादशी उद्या असून या एकादशीला राज्याच्या विविध भागातून भाविक पंढरपूरला जात जाणार आहेत. त्यांची ही कार्तिकी वारी सुरळीत पार पडावी, यासाठी राज्य परिवहन … Read more

विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत हजारोंच्या हातांना मिळतंय काम; मंडप-खुर्च्यांना वाढलं डिमांड !

Political News 10

सातारा प्रतिनिधी । विधानसभा निवडणूकीच्या उमेदवारांकडून प्रचार सभांना सुरुवात करण्यात आलेली आहे. निवडणुकीच्या काळात हजारो हातांना काम मिळाले आहे. त्यातून लाखोंची उलाढाल होत आहे. सध्या प्रचार सुरू झाल्याने मंडप व्यावसायिक, वाद्य व्यावसायिक, खानावळी चालविणारे, तसेच अन्य व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत. सध्या कष्टकरी मजुरांच्या हाताला काम मिळाल्याने एरवी कामाच्या शोधात असणारे हे कामगार आता निवडणुकीच्या … Read more