साताऱ्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती; 8 मतदारसंघात आता ‘काटे की टक्कर’

Satara News 1 3

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जाहीर झालेली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची उद्या अंतिम तारीख आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात विधानसभेच्या सातारा, कराड उत्तर, कराड दक्षिण, वाई, पाटण, कोरेगाव, फलटण, माण या आठ मतदारसंघात लढती निश्चित झाल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी उमेदवारांमध्ये काटे कि टक्कर पहायला मिळणार आहे. सातारा जिल्ह्यात असलेल्या आठही विधानसभा मतदार संघातून … Read more

पुरुषोत्तम जाधवांकडून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन जिल्हा प्रमुखपदाचा राजीनामा; वाई -खंडाळा- महाबळेश्वर मतदारसंघातून अपक्ष लढणार

Political News 20241028 082402 0000

सातारा प्रतिनिधी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती, कट्टर शिवसैनिक पुरुषोत्तम जाधव यांनी शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख पदाचा व शिवसेना सदस्यत्वाचा आज वर्षा निवासस्थानी जाऊन राजीनामा दिला असून, वाई -खंडाळा -महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून रणांगणात उतरणार आहे, असे पुरुषोत्तम जाधव यांनी जाहीर केले आहे. पुरुषोत्तम जाधव यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे की, गेली अनेक … Read more

सातारा जिल्ह्यातील रेशन दुकान बंद आंदोलन तूर्त स्थगित

Satara News 20241026 085738 0000

सातारा प्रतिनिधी | रेशन दुकानदारांच्या न्याय व प्रलंबित मागण्यांसाठी दोन्ही राज्य संघटनेच्यावतीने एकत्रित आवाहनानुसार दि. 1 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रातील 56,200 रेशन दुकानदारांनी धान्य उचल बंद, धान्य वाटप बंद, दुकान बंद आंदोलन पुकारलेले होते. मात्र, मंत्रालयात झालेल्या बैठकीप्रसंगी चर्चेनंतर तूर्त हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचा निर्णय सातारा जिल्हा रेशन दुकानदार संघटनेच्या वतीने घेण्यात आला. याबाबत अधिक माहिती … Read more

वाई विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून डॉ. नितीन सावंतांना उमेदवारी जाहीर

Nitin sawant News 1

सातारा प्रतिनिधी । राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या ३८ उमेदवारांच्या पहिल्या यादीत वाई विधानसभा मतदार संघातून मकरंद पाटील यांचा समावेश करण्यात आल्यानंतर पाटलांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार नेमका कोणता उमेदवार देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर या मतदार संघातून शरद पवार गटाकडून नुकतीच डॉ. नितिन सावंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली … Read more

वाई पोलिसांची धडक कारवाई; पुन्हा आरोपीसह 5 दुचाकी केल्या जप्त!

Crime News 20241023 104952 0000

सातारा प्रतिनिधी | वाई गुन्हे प्रकटीकरण विभागाने पुन्हा एक चमकदार कामगिरी करत चोरीस गेलेल्या सुमारे ३ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या ५ दुचाकी हस्तगत केल्या असून वाहनचोरीचे ५ गुन्हे उघडकीस आणले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ९ ते ५.३० वाजण्याच्या दरम्यान रविवार पेठ वाई येथुन होंडा स्पेल्डर गाडी (क्र … Read more

खंडाळ्यात भूमी अभिलेख उपअधीक्षकांना 75 हजारांची लाच घेताना ACB कडून अटक

Khandala Crime News 20241023 084409 0000

सातारा प्रतिनिधी | खंडाळा येथील भूमी अभिलेख उपअधीक्षक ऊर्मिला अशोक गलांडे (वय ४७, रा. समर्थ प्लाझा, पुणे) व युवा रोजगार कौशल्य योजनेतील कंत्राटी प्रशिक्षणार्थी स्विटी ऊर्फ साक्षी शिवाजी उमाप (वय २८, रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) यांच्यावर मंगळवारी साताऱ्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून धडक कारवाई करत ७५ हजार रुपयांची लाच घेताना पकडले. त्यांच्यावर खंडाळा पोलिसात … Read more

हुतात्मा अमर पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Satara News 20241022 075340 0000

सातारा प्रतिनिधी | देशासाठी हौतात्म्य पत्करण्याच्या सातारा जिल्ह्याच्या शौर्यशाली परंपरेत बावडा (ता. खंडाळा) येथील हुतात्मा जवान अमर शामराव पवार यांच्या कारकिर्दीने आणखी एक नोंद झाली. काल सोमवारी उपस्थित जनसागराने दिलेल्या ‘अमर रहे, अमर रहे अमर पवार अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम’ या घोषणांसह भारावलेल्या वातावरणात आणि शासकीय इतमामात बावडा (ता. खंडाळा) येथील … Read more

कारमधून 1 कोटी 40 लाखांची रक्कम लुटल्याचा बनाव, CID हवालदारासह कार चालकच निघाला आरोपी

1001007347

कराड प्रतिनिधी | कराडजवळ हवालाची तीन कोटींची रक्कम लुटल्याची घटना आठवड्यापूर्वी घडली होती. त्याच्याशी साधर्म्य असणारी आणखी एक घटना पाचवड (ता. वाई) येथे महामार्गावर घडली. परंतु, रक्कम लुटीचा बनाव भुईंज पोलिसांनी अवघ्या तीन तासात उघडकीस आणला. कोल्हापुरातील व्यावसायिकाची १ कोटी ४० लाखांची रक्कम पुण्यातून कोल्हापूरला घेऊन जाताना सातारा जिल्ह्यातील पाचवड (ता. वाई) हद्दीत ती अज्ञातांनी … Read more

बनावट ॲपच्या माध्यमातून तरुणाला 13 लाख रुपयांचा गंडा

Satara News 25

सातारा प्रतिनिधी । खासगी कंपनीत सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या पळशी येथील एका युवकाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याकरिता ॲप डाउनलोड करायला लावले. अशा प्रकारे सायबर चोरट्यांनी एका युवकास तब्बल १३ लाख ३९ हजार ७७० रुपयांचा ऑनलाइन गंडा घातल्याची घटना खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे घडली आहे. पंकज महादेव चव्हाण, असे गंडा घातलेल्या तरुणाचे नाव आहे. माहिती … Read more

शहीद जवान अमर पवार यांच्यावर बावडामध्ये आज अंत्यसंस्कार

Satara News 20241021 080036 0000

सातारा प्रतिनिधी | छत्तीसगड येथे नारायणपूर विभागातील नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत भूसुरुंगाचा स्फोट होऊन खंडाळ्यातील जवान अमर पवार हे शहीद झाले. त्यांचे पार्थिव येण्यास उशीर झाल्याने सोमवारी सकाळी 10 वाजता बावडा येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. खंडाळा तालुक्यातील बावडा येथील अमर पवार हे छत्तीसगड मधील नारायणपूर कॅम्पमध्ये असताना त्यांची नक्षलवाद्यांशी चकमक झाली. यावेळी … Read more

साताऱ्याच्या सुपुत्राला वीरमरण, माओवाद्यांशी लढताना आयडी स्फोटात शहीद

Satara News 20241019 212229 0000

सातारा प्रतिनिधी | छत्तीसगडमध्ये माओवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाल्याची घटना आज घडली आहे. शहीद जवानामध्ये सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील बावडा येथील सुपुत्र अमर शामराव पवार यांचा समावेश आहे. त्यांच्या मृत्युच्या बातमीनंतर बावडा गावावर शोककळा पसरली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, छत्तीसगड या ठिकाणी नारायणपूर जिल्ह्यात ओरचा भागातून माओवाद्यांच्या विरोधात जंगलात अभियान राबवण्यासाठी डीआरजी … Read more

साताऱ्यात विद्यमान आमदार अन् इच्छुकांमध्ये काटे कि टक्कर; संभाव्य लढती पहाच

Satara Political News

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल काल वाजला आहे. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी करण्यात येणार आहे. राज्यात आचारसंहिता सुद्धा लागू झाली असून निवडणूक जाहीर झाल्यानंतर सातारा जिल्ह्यात राजकीय घडामोडीना वेग आला आहे. राज्यात जशी महायुती आणि महविकास आघाडीत मुख्य लढत होत आहे तशीच जिल्ह्यात देखील होणार हे नक्की. निवडणुकीचं बिगुल … Read more