जिल्ह्यातील दुष्काळी प्रकल्पांसह म्हसवड-धुळदेव MIDC ला गती देणार : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis Karad

कराड प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात जे प्रकल्प आहेत. त्या प्रकल्पांच्या माध्यमातून दुष्काळी भागांना पाणी मिळणार आहे, अशा प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध केला जाईल. तसेच माण तालुक्यातील म्हसवड-धुळदेव औद्योगिक वसाहतीच्या कामालाही गती देण्यात येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. कराड येथील कृष्णा सहकारी बँकेच्या सभागृहात जिल्ह्यातील औद्योगिक वसाहत व जलसंपदा विभागाच्या … Read more

तुम्ही मातोश्रीपासून वरळीपर्यंत तरी चालत गेला का? फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

uddhav thackeray devendra fadnavis

कराड प्रतिनिधी | मणिपूर येथे सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटनेवरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना टोला लगावला. मोदीजींवर बोलनाऱ्यानी एक गोष्ट लक्षात घ्यावी की तुम्ही साधे मातोश्री पासून वरळी पर्यंत तरी चालत गेला होता का? असा टोला फडणवीसांनी लगावला. आज कराड येथे फडणवीसांच्या उपस्थितीत … Read more

पंढरपूरात भक्तिभावाने या, पण राजकारणासाठी कोणी येऊ नये; फडणवीसांचा KCR यांना इशारा

jpg 20230622 143133 0000

कराड प्रतिनिधी | तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात आपल्या पक्षाचे पाय रोवायला सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणजे आषाढी एकादशी निमित्ताने चंद्रशेखर राव पंढरपूर मध्ये जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता भक्तीभावाने कोणी पंढरपूरला आल्यास स्वागतच आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. कराड येथील कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र … Read more

कोळेवाडीत 32 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

karad taluka police station

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील कोळेवाडी येथील एका 32 वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली असून या घटनेची नोंद कराड तालुका पोलिस ठाण्यात झाली आहे. तेजपाल अशोक पोतेकर (वय 32, रा. कोळेवाडी) असे संबंधित युवकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कोळेवाडी येथील ‘पन्हाळी’ नावाच्या ओढ्याकडेला तेजपाल पोतेकर याने ओढ्याकडेला झाडास गळफास घेऊन युवकाने … Read more

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या कराड मुक्कामी; BJP कोअर कमिटीच्या बैठकीचे आयोजन

Devendra Fadnavis to stay in Karad

कराड प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्यावतीने देशभर महाजनसंपर्क अभियान राबविले जात आहे. या अभियानाअंतर्गत कराडला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कराडच्या दौऱ्यावर येत आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (ता. 22) सकाळी 11 वाजता कराड येथे भव्य … Read more

साताऱ्याचे सुपुत्र जवान सुरज यादव यांना नागा बॉर्डर येथे कर्तव्य बजावताना वीरमरण

martyred Soldier Suraj Yadav

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील येरवळे गावचे सुपुत्र व जवान सूरज मधुकर यादव हे आसाम दिवापूर येथे नागा बॉर्डरवर सेवा बजावत शहीद झाले. जवान सुरज यांनी रोइंगमध्ये राष्ट्रपती पदक पटकावले होते. त्यांची 14 वर्ष सेवा झाली असून ते 111 इंजीनियरिंग रेजिमेंट मध्ये कार्यरत होते. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील येरवळे गावचे … Read more

गप्पा मारत निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला; Briza कार पलटी होऊन एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

Karad-Patan Road Accident

कराड प्रतिनिधी | कराड- पाटण रस्त्यावर भरधाव वेगाने Briza कार घेऊन जात असताना कार अचानक पलटी होऊन यामध्ये दोघा मित्रांचा अपघात झाल्याची घटना पाटण तालुक्यातील मल्हारपेठजवळील आबदारवाडी हद्दीत घडली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून दुसरा मित्र गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात घराचे तसेच गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. सागर दिनकर माथणे (वय- 35, रा. … Read more

कऱ्हाडला राज्यस्तरीय अधिवेशनात मराठा समाजाला ‘ओबीसी’त समाविष्ट करण्यासह 5 ठराव

Maratha Community Karad

कराड प्रतिनिधी । कराड तालुका सकल मराठा समाजाचे रविवारी राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले. यावेळी मराठा समाजाचे आरक्षणामध्ये 50 टक्के मर्यादेत राहून मराठा समाजाला ओबीसी यादीत क्रमांक वाढवून किंवा कुणबीची मराठा तत्सम जात घोषित करून ओबीसी यादीत समावेश करण्यात यावा, मराठा समाजाला ओबीसी दाखले द्यावेत, यासह पाच महत्वाचे ठराव राज्यस्तरीय मराठा समाजाच्या अधिवेशनात मांडण्यात आले. कराड … Read more

कराडात चोरट्यांनी फोडले प्रसार माध्यमांचे कार्यालय; तब्बल इतकी रक्कम केली लंपास

karad crime

कराड प्रतिनिधी | कराड शहरात गेल्या अनेक दिवसांपासून चोरट्यांकडून घडफोडीचे प्रकार केले जात आहेत. आता चोरट्यांनी काही कार्यालयांकडे आपला मोर्चा वळवला असून त्यांनी कराड शहरातील एका प्रसार माध्यमाचे कार्यालय फोडून सुमारे 50 हजाराचे साहित्य तसेच रोकड लंपास केल्याची घटना शनिवार पेठेत पंचायत समितीनजीक रविवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत प्रकाश काशिनाथ पिसाळ (रा.कार्वे, ता. कराड) यांनी … Read more

मोराच्या अंगावरची पिसं काढून Video शेअर करून तरुण झाला होता फरार; अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Accused From Madhya Pradesh Arrested

कराड प्रतिनिधी । मध्यप्रदेशातील एका युवकाने मोराच्या अंगावरची पिसे उपसून त्याचा व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियात व्हायरल करण्यात आल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. संबंधित आरोपी पाटण तालुक्यात आला होता. त्या फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध घेतला जात होता. दरम्यान आरोपीबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापळा लावून एक युवतीसह आरोपीस पाटण तालुक्‍यातील बेलवडे खुर्द या गावाजवळ … Read more

मलकापूर नगरपरिषदेचा चौथा राष्ट्रीय जल पुरस्कार 2022 ने गौरव

Malakapur News

कराड प्रतिनिधी । देशपातळीवर दिला जाणारा चौथा राष्ट्रीय जल पुरस्कार हा सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील मलकापूर नगरपरिषदेस आज प्रदान करण्यात आला. जलशक्ती मंत्रालय, भारत सरकार यांचे वतीने आज विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे भारताचे उपराष्ट्रपती महामहिम जयदिप धनखड यांचे प्रमुख उपस्थितीत केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते नगराध्यक्ष नीलम एडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांना … Read more

कृष्णा सरिता बझारच्या चेअरमनपदी स्नेहल राजहंस तर व्हाईस चेअरमनपदी संगिता शेटे

Krishna Sarita Bazaar News

कराड प्रतिनिधी । मलकापूर (ता. कराड) येथील कृष्णा हॉस्पिटल कॅम्पसमधील कृष्णा सरिता बझारच्या चेअरमन पदी स्नेहल मकरंद राजहंस यांची व व्हाईस चेअरमन पदी संगिता संजय शेटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी कृष्णा महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले यांनी नवनियुक्त चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी य. मो. … Read more