विद्यानगरमध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी 5 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

Karad News 20240108 161551 0000 jpg

कराड प्रतिनिधी | विद्यानगर – सैदापूर, ता. कराड येथील बनवडी फाटा ते कृष्णा कॅनॉल चौकापर्यंतच्या रस्त्याच्या कामासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून ५ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. या विकासकामाचे भूमिपूजन मंगळवारी सकाळी ९ वाजता केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्प मार्च २०२३ मधून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्यातून … Read more

पालकमंत्री देसाईंविरोधात शिंदे गटाच्या तालुका प्रमुखाची अश्लील पोस्ट; गुन्हा दाखल

Crime News 20240108 091756 0000 jpg

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावाने सोशल मीडियावर शिवसेना शिंदे गटातील तालुकाप्रमुखाने एक पोस्ट लिहिली आहे. या प्रकरणी तालुका प्रमुखावर कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी रात्री ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शिवसेना एकनाथ शिंदे ग्रुप या नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप आहे. या व्हॉट्सअॅप … Read more

कराडच्या व्यावसायिकाला 90 लाखांचा गंडा; दोघा भावांवर गुन्हा दाखल

20240108 083416 0000 jpg

कराड प्रतिनिधी | भागीदारीत चांदीचा व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून कराड येथील व्यावसायिक सूरज विष्णू साळुंखे (रा. मंगळवार पेठ) यांना तब्बल 90 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी नवीनकुमार सावंत आणि महेशकुमार सावंत (रा. भिकवडी, ता. कडेगाव, जि. सांगली) या सख्ख्या भावांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, … Read more

आजच्या पत्रकारितेसमोर कृत्रिम बुद्धिमत्तेचे मोठे आव्हान : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

Karad News 20240107 211136 0000 jpg

कराड प्रतिनिधी | आज देशातील पत्रकारितेसमोर राजकीय आव्हान उभे राहिले असून निर्भीड पत्रकारितेला मिळणारा वाव कमी झाला आहे. त्याचबरोबर प्रसार माध्यमांची आर्थिक स्वायत्तता व बदलत्या तंत्रज्ञानाचा धोकाही प्रसारमाध्यमांसमोर आहे. त्यातच कृत्रिम बुद्धिमत्ता, चॅटजीपीटी, डीपफेक या तंत्रज्ञानामुळे पत्रकारितेसमोर मोठी आव्हाने उभी राहिली असून पत्रकारांनी बदलते तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे तरच त्यांचा नव्या युगामध्ये टिकाव लागेल, असे … Read more

कराड पोलिसांनी गहाळ झालेले 18 मोबाईल शोधून केले परत

20240107 091818 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड शहर पोलीस ठाण्याच्या वतीने नवीन वर्षाची अनोखी भेट शनिवारी मोबाईल मालकांना देण्यात आली. मालकांचे चोरीस गेलेल्या 18 मोबाईलचा शोध घेऊन मुळ मालकांना परत करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड शहर पोलीस ठाण्यास सन 2022-2023 पासून नागरिकांचे वापरात येणारे मोबाईल फोन ठिकठिकाणी गहाळ झाले होते. त्याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल … Read more

स्वच्छ सर्वेक्षणात कराड, पाचगणी नगरपालिका अव्वल

Karad News 20240106 101151 0000 jpg

कराड प्रतिनिधी | केंद्र सरकारतर्फे दरवर्षी राबवण्यात येणाऱ्या ‘स्वच्छ सर्वेक्षण’ स्पर्धेत 2023 या वर्षात सातारा जिल्ह्यातील कराड आणि पाचगणी नगरपालिकेने देशाच्या पश्चिम विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. दि. 11 जानेवारी रोजी नवी दिल्लीत या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. स्वच्छ सर्वेक्षणात देशातील पश्चिम विभागातील महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश या पाच राज्यांमध्ये पालिकांनी सहभाग घेतला होता. … Read more

माजगावच्या जिल्हा परिषद शाळेत भरला वैज्ञानिकांचा मेळावा

Patan News 20240105 212855 0000 jpg

कराड प्रतिनिधी | थोर शास्त्रज्ञ लुईस पाश्चर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून पाटण तालुक्यातील जिल्हापरिषद शाळा माजगाव येथे नुकतेच विज्ञानजत्रा व रांगोळी प्रदर्शन या दोन उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. भविष्यकालीन शिक्षणाचा वेध घेत सध्याच्या संगणक युगातील वाढत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आत्तापासूनच सक्षम विद्यार्थी तयार व्हावा व प्रत्येक मुलाच्या अंगी दडलेल्या सुप्त गुणांना संधी मिळावी या उद्देशाने … Read more

कोतवालाला मारहाण केली म्हणून कोर्टाकडून एकास सुनावली 90 दिवसांची शिक्षा

Karad News 20240105 133315 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यास सांगितल्याच्या कारणावरून कोतवालाला शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण केल्याप्रकरणी फिरोज गणी मुजावर (रा. पाडळी-केसे, ता. कराड) याला तीन महिने कारावास आणि 2.5 हजार रुपये दंडाची शिक्षा कराड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश अण्णासाहेब पाटील यांनी ठोठावली. याबाबत माहिती अशी की, कोरोना कालावधीत 28 एप्रिल 2020 रोजी सकाळी … Read more

नडशी कॉलनीत आढळली एक बेवारस बॅग

Crime News 20240104 122711 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील नडशी कॉलनीयेथे शिरवडे स्टेशन रस्त्यालगत बुधवारी सकाळच्या सुमारास दुचाकीवरुन आलेला एक जण एक बॅग ठेवून कराडच्या दिशेने निघून गेला. ही गोष्ट स्थानिकांच्या निदर्शनास आल्याने परिसरात भीती पसरली होती. संशयास्पद आढळून आलेल्या या बॅगेत नेमकं काय आहे? या भीतीने स्थानिक नागरिकांनी याची माहिती तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे … Read more

कराडातील ‘मोकाशी प्रतिष्ठान’च्या अभिजितसह विश्वजित मोकाशींवर गुन्हा दाखल

Karad News 19 jpg

कराड प्रतिनिधी । मुंबई येथील चुनाभट्टीमधील वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या इंजिनिअरिंग महाविद्यालयात तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार नुकताच घडला. या महाविद्यालयात ३० ते ४० जणांच्या जमावासह ताबा धरल्याप्रकरणी कराड येथील मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानचे सरचिटणीस अभिजित मोकाशी आणि उपाध्यक्ष विश्वजित मोकाशी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांच्या विरोधात वडाळा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. … Read more

शिरगावातील मोहिते कुटुंबाने रक्षाविसर्जन, पिंडदान विधीबाबत घेतला मोठा निर्णय

Karad News 20 jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील शिरगांव मधील सामाजिक परिवर्तनशील व पुरोगामी विचारसरणी असलेल्या मोहिते कुटुंबाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. कुटुंबात दि. ३१ डिसेंबर रोजी मानसिंगराव मोहिते (बाबा) यांचे सुपुत्र जयंत यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. अंत्यविधीनंतरच्या तिसऱ्या दिवसाचे प्रचलीत संपूर्ण विधी नैवेद्य, पिंडदान, कावळ्याचे स्तोम, मुंडन, आत्मापूजन पौराहित्य आदी कालबाह्य तरीही परंपरेने करण्यात … Read more

कराड – ढेबेवाडी महामार्गावर सुरक्षेच्या उपाययोजना राबवा अन्यथा रास्ता – रोको; मनसेचा इशारा

karad News 18 jpg

कराड प्रतिनिधी । सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कराड-ढेबेवाडी महार्मार्गाचे काम करण्यात आले आहे. मात्र, सुरक्षेच्या उपाययोजना राबवल्या नसल्याने वारंवार अपघात होत असून नागरिकांना प्राण गमवावे लागत आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर आवश्यक तिथे पांढरे पट्टे, रबलरचे गतीरोधक, गाव, शाळा, वळणरस्ता दर्शक पाटया लावाव्यात. अन्यथा दि. 20 जानेवारी रोजी कोळे बसस्थानक येथे रास्ता-रोको आंदोलन … Read more