लोकसेवा हेच लोकप्रतिनिधीचे कर्तव्य – सारंग पाटील

Karad News 20240203 101905 0000 jpg

कराड प्रतिनिधी | विचारांशी बांधिल आणि तत्वाशी एकनिष्ठ राहणे, ही खा. श्रीनिवास पाटील यांची शिकवण असून लोकांची सेवा करणे हेच कर्तव्य असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी केले. उंडाळे (ता.कराड) विभागातील तुळसण, सवादे, म्हसोली, येवती, भुरभूशी, येणपे, टाळगाव, लोहारवाडी व उंडाळे याठिकाणी खा.श्रीनिवास पाटील यांनी केलेल्या विकासकामांच्या कार्यपूर्ती संपर्क दौऱ्यात ते बोलत … Read more

श्वेतपत्रिकेची घोषणा स्वागतार्ह, पण संपूर्ण अर्थसंकल्प निराशाजनक : पृथ्वीराज चव्हाण

Satara News 20240202 115952 0000 jpg

कराड प्रतिनिधी | अर्थमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात मोदी सरकारच्या 10 वर्षांची आणि डॉ. मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळातील 10 वर्षांच्या कालावधीशी तुलना करून श्वेतपत्रिका काढण्याचे आश्वासन दिले आहे. मला वाटते ही एक स्वागतार्ह घोषणा आहे. बाकी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा अत्यंत निराशाजनक आणि पूर्णपणे विसरता येणारा अर्थसंकल्प म्हणावा लागेल, अशी खोचक टीका माजी … Read more

मुंढे गावातील बंब चोरणाऱ्या संशयितास डीबी पथकाने केली अटक, तांब्याचे 5 बंब जप्त

Crime News 20240202 081020 0000 jpg

कराड प्रतिनिधी | मुंढे (ता. कराड) येथील पाण्याचे बंब चोरणाऱ्या संशयीतास कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने बेड्या ठोकले आहेत. आरिफ अब्दुल खलिद शेख (वय 40, रा. खाज्या झोपडपट्टी, मिरज, जि. सांगली), असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून तांब्याचे पाच बंब आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल, असा 1 लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला … Read more

मराठवाडी धरणातून वांग नदीपात्रात पाण्याचा सुरु झाला विसर्ग

Marathwadi Dam News 1 jpg

पाटण प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून मराठवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात शेतीच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. मात्र, त्याकडे लक्ष दिले जात नसल्यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त केली जात होती. आता पाटबंधारे विभागाकडून शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नाकडे लक्ष देत बुधवारपासून धरणाच्या सिंचनद्वारातून वांग नदीपात्रात तातडीने विसर्ग सुरू करण्यात आला. नदीपात्रात पाणी येऊ लागल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा … Read more

“सत्तेची मस्ती या अर्थसंकल्पातून दिसते”; ‘बळीराजा’ संघटनेच्या पंजाबराव पाटील यांची प्रतिक्रीया

Karad News 34 jpg

कराड प्रतिनिधी । अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज संसदेत देशाचे अंतरिम बजेट सादर केलं. आपल्या भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी मागील १० वर्षात मोदी सरकारने देशातील जनतेसाठी केलेल्या कामाचे वाचन केलं. आमचं सरकार समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करत असून २०४७ पर्यंत आपण विकसित भारत होऊ असं सीतारामन यांनी म्हंटल. मात्र, केंद्राच्या अर्थसंकल्पावर बळीराजा … Read more

कराडात ‘राष्ट्रवादी’च्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात केली निदर्शने

Karad News 33 jpg

कराड प्रतिनिधी । छुप्या पद्धतीने सुरु असलेली कंत्राटी भरती तत्काळ बंद करावी, राज्यात पेपरफुटीसंदर्भात राजस्थान, उत्तराखंडच्या धर्तीवर कडक कायदा करावा आणि दत्तक शाळा योजना रद्द करावी आदींसह विविध मागण्यासाठी तसेच राज्य व केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात कराड येथील खासदार शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज आंदोलन केले. यावेळी तहसील कार्यालय येथे अएकत्रित येत … Read more

आयशर टेम्पो 25 फूट सर्विस रस्त्यावरील खड्ड्यात कोसळला; चालक जखमी

Karad News 32 jpg

कराड प्रतिनिधी । कोल्हापूरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आयशर टेम्पोचा पुणे बंगरूर राष्ट्रीय महामार्गावर कराडनजीक वाठार हद्दीत 25 फूट सर्विस रस्त्यावरील खड्ड्यात पडून अपघात झाला. या अपघातात टेम्पो चालक हा जखमी झाला असून टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून आज गुरुवार सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास एक आयशर टेम्पो कोल्हापूरहून … Read more

सह्याद्री कारखान्याची सभासदांना अन्यत्र विल्हेवाटची नोटीस, शेतकरी संघटनेचे साताऱ्यात आंदोलन

Satara News 20240201 060428 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | कराड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने सभासदांना अन्यत्र विल्हेवाटची नोटीस पाठवली आहे. या नोटीसीनंतर शेतकरी संघटना व शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. या नोटीसीचा निषेध रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेने केला आहे. त्याचबरोबर ही नोटीस रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनही सुरू केले आहे. याबाबत शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. … Read more

सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, कराड तालुक्यातील ‘या’ गावच्या सुपुत्राकडं कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्याचं पद

Karad News 20240201 040224 0000 jpg

कराड प्रतिनिधी | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 17 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची महा राज्य शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण परिषद संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्याच जागेवरील अमोल येडगे यांची कोल्हापूरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अमोल येडगे हे मूळचे कराड तालुक्यातील आबईनगर गावचे आहेत. ते २०१४ … Read more

तडीपार असताना वावरत होता गावात, डीबी पथकाने पाठलाग करून पकडले भर चौकात

Crime News 20240131 070329 0000 jpg

कराड प्रतिनिधी | दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेला संशयित लपून छपून गावात वावरत असल्याची माहिती मिळताच कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने संशयिताला पाठलाग करून भर चौकात पकडले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. देवेंद्र अशोक येडगे (रा. जखिणवाडी, ता. कराड), असे संशयिताचे नाव आहे. कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत आरोपी देवेंद्र अशोक येडगे (रा. … Read more

पालकमंत्र्यांच्या उपस्थिती पार पडली कराड विमानतळ विस्तारीकरण कामासंदर्भात महत्वाची बैठक

Satara News 95 jpg

सातारा प्रतिनिधी । कराड येथील विमानतळावर अनेक सुविधा उभारणीसाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. नुकताच विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी राज्य सरकारकडून 221.51 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. चार महिन्यांच्या दिवसाच्या प्रशिक्षणानंतर आता नुकतेच प्रशिक्षणार्थींना नाईट लँडिंग, टेक ऑफचे प्रशिक्षण देण्याच्या दुसऱ्या टप्प्यास सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान, आज साताऱ्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार … Read more

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या ‘या’ विकासकामांवरील स्थगिती उठली

Karad News 31 jpg

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात खासदार शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे आ. बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विकासकामांना स्थगिती देण्यात आली होती. ती स्थगिती न्यायालयीन लढा देवून उठली असल्याने विकासकामांना पुन्हा सुरुवात झाली आहे. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आ. बाळासाहेब पाटील हे महाविकास आघाडी सरकारमध्ये सहकारमंत्री होते. महाविकास आघाडी सरकारने मंजूर … Read more