कराड DYSP कार्यालयात आज गुंडांची परेड, सकाळी 10 वाजता हजर राहण्याच्या सूचना

Karad News 20240209 233558 0000 jpg

कराड प्रतिनिधी | पुणे आणि नागपूर नंतर आता कराडमध्ये शनिवारी (दि. १०) रेकॉर्डवरील गुन्हेगारांची परेड होणार आहे. कराड उपविभागातील दोनशेहून अधिक गुन्हेगार या परेडमध्ये दिसतील. त्यात कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ८० जणांचा समावेश आहे. पोलिसांचा निरोप मिळाल्यापासून गुंडांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांसमोर ओळख परेड असल्याचे एव्हाना गुंडांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे डीवायएसपी कार्यालयात शनिवारी … Read more

खा. श्रीनिवास पाटलांच्या खंबाटकी घाटातील महत्वाच्या प्रश्नावर नितीन गडकरींनी दिलं उत्तर

Satara News 41 jpg

कराड प्रतिनिधी । पुणे – सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटातील नवीन सहापदरी बोगदाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. हे काम यावर्षी डिसेंबर अखेर पुर्ण होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभा अधिवेशनात दिली. सातारा लोकसभा मतदारसंघाचे खा. श्रीनिवास पाटील यांनी बोगद्याच्या बांधकामाबाबत प्रश्न अधिवेशनात उपस्थित केला असता त्यावर मंत्री गडकरी यांनी उत्तर दिले. … Read more

कराड विमानतळ परिसरातील अनधिकृत बांधकामाबद्दल MADC च्या उपाध्यक्षांनी दिले ‘हे’ निर्देश

20240209 071627 0000 jpg

कराड प्रतिनिधी | महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या उपाध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे आणि अपर जिल्हाधिकारी दीपक नलवडे यांनी गुरुवारी कराड विमानतळास भेट दिली. विमानतळाचे विस्तारीकरण व नाईट लँडिंगची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या अनुषंगाने त्यांचा हा दौरा होता. विमानतळ परिसरातील वाढत्या अनधिकृत बांधकामांबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. विमानतळ परिसरात स्थानिक स्वराज्य संस्थांनी कलर कोडेड … Read more

मलकापूर-आगाशिवनगर परिसरातून देशी बनावटीचे पिस्टल अन् काडतुसासह युवकास अटक

Crime News 20240208 103417 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने मलकापूर-आगाशिवनगर परिसरातुन एक देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसासह एका युवकास अटक केली आहे. लवराज रामचंद्र दुर्गावळे (वय 29, रा. आगाशिवनगर- मलकापुर), असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून 60 हजार रुपये किंमतीचे पिस्टल जप्त करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील … Read more

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून परळी विभागात कोट्यावधीची कामे : सारंग पाटील

Satara News 36 jpg

कराड प्रतिनिधी | दुर्गम भागात विकासाकामे झाली तरच लोकांचे राहणीमान सुधारेल आणि खऱ्या अर्थाने भागाच्या विकासाला चालना मिळेल, या विचारातून खा. श्रीनिवास पाटील यांनी विकासासाठी प्रयत्न केला. त्यामुळेच परळी विभागात कोट्यावधीची विकासकामे झाली असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी केले. सातारा तालुक्याच्या परळी विभागातील परळी, चिखली, जांभे, चाळकेवाडी, वावदरे, रेवंडी, राजापुरी, बोरणे, … Read more

सांगलीतील बैठकीतून वाहतूकदार संघटनांनी दिला थेट इशारा

Sangali News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सध्या माल वाहतूक व्यवसायिकांच्या संघटनानी मालवाहतुकीमध्ये जबरदस्तीने वसूल केल्या जाणाऱ्या वाराईविरोधात दंड थोपटण्यात आले असून निर्णय मागे न घेतल्यास चक्काजाम आंदोलन करू, असा थेट इशारा दिला आहे. सांगली, शिरोळ, सातारा, कराड, कोल्हापूर, वाठार येथील सर्व वाहतूकदार संघटनांची सांगली येथे नुकतीच महत्वाची बैठक पार पडली. यावेळी मोठ्या संख्येने वाहतूक व्यावसायिक उपस्थित होते. या … Read more

कराड तालुक्यातील 1589 लाभार्थी दिव्यांगांना साहित्य वाटप

Karad News 38 jpg

कराड प्रतिनिधी | केंद्र शासनाच्या भारतीय कृत्रिम अंग निर्माण निर्गम (अलिमको) यांच्या मार्फत दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असणारी साहाय्यभूत साधने दिली जातात. या संस्थेमार्फत कराड तालुक्यातील दिव्यांगांचे शिबिर डिसेंबर २०२१ मध्ये घेण्यात आले होते. या शिबिरात साहित्यासाठी दिव्यांगांची निवड करण्यात आलेली होती. यातील 1589 दिव्यांगांना कालपासून साहित्य वाटपास सुरुवात करण्यात आली. त्यापैकी 970 दिव्यांगांना काल साहित्याचे … Read more

शहर काँग्रेसचा ‘एक बूथ दहा युथ’ उपक्रम प्रभावी – श्रीरंग चव्हाण

Karad News 37 jpg

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव व प्रभारी श्रीरंग चव्हाण यांनी संपूर्ण जिल्ह्याचा तीन दिवस दौरा करून सर्व तालुक्याचा संघटनात्मक आढावा घेतला. तिसऱ्या दिवशी नुकताच त्यांचा कराड दौरा पार पडला. या दौऱ्यात त्यांनी कराड शहर ब्लॉक कमिटीचा आढावा घेतला. यावेळी “कराड शहर काँग्रेसचा एक बूथ दहा युथ हा उपक्रम आगामी … Read more

सारंगबाबांनी संपर्कपूर्ती दौऱ्यातून साधला रेठरे विभागातील गावकऱ्यांशी संवाद

Sarang Patil News jpg

कराड प्रतिनिधी । निस्वार्थ भावनेतून लोकसेवा करणारे तसेच एक संवेदनशील नेतृत्व म्हणून खा.श्रीनिवास पाटील यांना ओळखले जाते. समाजासाठी असलेल्या समर्पित वृत्तीमुळे त्यांना जिल्हावासिंयानी भरभरून प्रेम दिले, असे प्रतिपादन राष्ट्रवादीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी केले. कराड तालुक्यातील रेठरे विभागातील गोळेश्वर, कापिल, वडगाव हवेली, कोडोली, दुशेरे, शेरे, गोंदी, शेणोली, जुळेवाडी, खुबी, रेठरे खुर्द, रेठरे बुद्रुक … Read more

“आमचा खासदार असाच सर्वसामान्य असावा”; सातारा लोकसभेला सारंग पाटील यांना उमेदवारी?

Sarang Patil News jpg

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्हा हा राजकीयदृष्ट्या खूप महत्वाचा मानला जातो. महाराष्ट्राच्या राजकीय वाटचालीत या जिल्ह्याचा महत्वाचा सहभाग राहिला आहे. लोकसभा निवडणुक काही दिवसांत लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातून सर्वच पक्ष आपापले उमेदवार उभे करण्यासाठी मोर्चे बांधणी करू लागले आहेत. जिल्ह्यात आगामी लोकसभा निवडणुक लढण्यासाठी अनेक नावे चर्चेत आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार … Read more

खा. श्रीनिवास पाटील यांनी उपस्थित केलेला राज्यातील 13 हजार अंगणवाड्यांचा प्रश्न मार्गी, बालकल्याण मंत्र्यांकडून मान्यता

Shrinivas Patil 20240204 082753 0000 jpg

कराड प्रतिनिधी | खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभा अधिवेशनात अंगणवाडीबाबतचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर महाराष्ट्रातील १३ हजार ११ मिनी अंगणवाड्यांच्या संपूर्ण अंगणवाडी केंद्र म्हणून राज्याला मान्यता देण्यात आल्याची माहिती महिला व बालकल्याणमंत्री स्मृती इराणी यांनी दिली. राज्यातील अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होते. त्यांच्या विविध मागण्या केंद्र सरकारपर्यंत पोचविण्यात याव्यात, यासाठी अंगणवाडी कर्मचारी, सेविका … Read more

कोल्हापूर-अयोध्या विशेष रेल्वेला कराडात थांबा द्या; खा. श्रीनिवास पाटील यांचे रेलवेमंत्र्यांना पत्र

Karad News 36 jpg

कराड प्रतिनिधी । प्रभू श्रीराम भक्तांसाठी कोल्हापूर आयोध्या एक्सप्रेस ट्रेन या महिन्यात सुरू होणार आहे. कोल्हापूर हून दि. १३ फेब्रुवारी रोजी अयोध्येला जाणाऱ्या या ट्रेनला कराड येथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णेव आणि श्री. रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे नुकतीच केली आहे. याबाबत ‘हॅलो महाराष्ट्र’ने … Read more