ST चालवत असताना हृदयविकाराचा आला धक्का, तरीही चालकाने वाचविले प्रवाशांचे प्राण

Crime News 17 jpg

कराड प्रतिनिधी । एसटी चालवत असताना अचानक चालकाला हृदयविकाराचा जोराचा धक्का बसला. मात्र, तरीही चालकाने प्रसंगावधान दाखवत एसटी दुभाजकावर चढवून जागीच थांबवली. त्यामुळे ३१ प्रवाशांचे प्राण बचावले. अखेरउपचारादरम्यान चालकाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराडनजीक वारुंजी गावच्या हद्दीत सोमवारी ही घटना घडली. राजेंद्र विष्णू बुधावले (रा. सुळेवाडी, ता. खानापूर, जि. सांगली) असे संबंधित एसटी … Read more

ॲड. भरत पाटलांनी घेतली मंत्री गडकरींची भेट; चर्चा करत केली ‘ही’ महत्वाची मागणी

Karad News 29 jpg

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील भाजप नेते तथा महाराष्ट्र भाजपचे प्रदेश सचिव ॲड. भरत पाटील यांनी नुकतीच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत संवाद साधता राज्यासह जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा करत राज्यासह जिल्ह्यातील गड किल्ल्यांवर जे रोप वेचीमंजुरी देण्यात आली आहे. त्याबाबत जे नियम, अति घातलेल्या आहेत त्यांना शिथिलता आवी, … Read more

कराडात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास आ. बाळासाहेब पाटील यांच्याकडून अभिवादन

Karad News 27 jpg

कराड प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराजांची ३९४ वी जयंती संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज कराड शहरात शाळेच्या विद्यार्थ्यांच्यावतीने शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास आमदार बाळासाहेब पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. “छत्रपतींच्या मनातले स्वराज्य स्थापन करण्यासाठी कटिबद्ध राहू,” अशी ग्वाही … Read more

छत्रपतींचा स्त्रीयांविषयीचा दृष्टिकोन प्रत्येकाने ठेवला तर समाजापुढे एक आदर्श निर्माण होईल : खा. श्रीनिवास पाटील

Satara News 81 jpg

कराड प्रतिनिधी | छत्रपती शिवरायांचा स्त्रीयांविषयीचा दृष्टिकोन प्रत्येकाने ठेवला तर समाजापुढे एक आदर्श निर्माण होईल. त्यानंतर महिलांना आपोआपच सन्मान मिळेल. स्त्रियांना त्यांच्या क्षमतांची, त्यांच्या हक्कांची जाणीव करून देऊन त्यांच्यात आत्मसन्मान निर्माण केल्यास ‘ती’ उंच भरारी घेण्यास सज्ज होईल, असा विश्वास व्यक्त करून त्यांच्या कर्तृत्वामुळे माझ्या लेकीबाळींना लोकमान्यता मिळावी, असे प्रतिपादन खा. श्रीनिवास पाटील यांनी केले. … Read more

तळबीड पोलिसांनी रायगड जिल्ह्यातील 3 तस्करांना केली अटक, 1 कोटीचे मांडूळ जप्त

Crime News 12 jpg

कराड प्रतिनिधी | मांडुळाची विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना तळबीड पोलिसांनी जेरबंद केले आहे. रुपेश अनिल साने (रा. आड, ता. पोलादपूर), अनिकेत विजय उत्तेकर आणि आनंद चंद्रकांत निकम (दोघेही रा. कापडखुर्द, ता. पोलादपूर, जि रायगड), अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून १ कोटी १० लाख रुपये किंमतीचे मांडूळ पोलिसांनी जप्त केले आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावरील … Read more

कराडातील अंगणवाड्यांमध्ये मुलांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप

Karad News 26 jpg

कराड प्रतिनिधी । राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्ताने अंगणवाडीतील मुला-मुलींसाठी जंताच्या आजाराचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व विभागांना यशस्वीपणे ही मोहीम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केल्या आहेत. त्यानुसार कराड शहरात ही मोहीम राबविण्यात आली असून लहान मुलांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. त्यानुसार अंगणवाडीसह विविध शाळांमध्ये या गोळ्यांचे वाटप … Read more

कोयना एक्सप्रेस आज-उद्या 2 तास उशिरा सुटणार; नेमकं कारण काय?

Satara News 68 jpg

कराड प्रतिनिधी । मध्य रेल्वेच्या (Central Railway) पुणे विभागातील पुणे-मिरज रेल्वेमार्गावर तारगाव-मसूर-शिरवडे सेक्शनमध्ये रेल्वे ट्रॅकचे दुहेरीकरनाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे गुरुवार, दि. २२ फेब्रुवारीपर्यंत ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला आहे. परिणामी आज दि. १७ आणि उद्या १८ फेब्रुवारी रोजी कोल्हापूरहून सुटणारी कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस (Koyna Express) ही गाडी कोल्हापुरातून दोन तास उशिरा सुटणार आहे. … Read more

रेल्‍वेमार्गावरील गुरुवारपर्यंतच्या मेगा ब्‍लॉकमुळे ‘या’ गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले

Karad News 25 jpg

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात रेल्वेच्या दुहेरीकरणाची कामे वेगाने केली जात आहेत. अशात अधून मधून मेगाब्लॉक देखील लावला जात आहे. दरम्यान, मध्य रेल्वेच्‍या (Central Railway) पुणे विभागातील पुणे-मिरज मार्गावर असलेल्या तारगाव-मसूर-शिरवडे दरम्यान रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण, विविध अभियांत्रिकी, सिग्नलिंग दूरसंचार कामांसाठी गुरुवार दि. २२ रोजी पर्यंत वाहतूक बंद ठेवण्‍यात येणार आहे. त्यामुळे काही गाड्या रद्द झाल्या आहेत … Read more

DPDC निवडीवरून ‘प्रहार’च्या मनोज माळींनी दिला थेट इशारा

Karad News 24 jpg

कराड प्रतिनिधी । नुकतीच सातारा जिल्हा नियोजन समितीच्या निवडी पार पडल्या. या निवडीवरुण आता जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलाच तापलेल पहायला मिळतंय. कारण सातारा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी प्रहार जनशक्ती पक्षाचा एक सदस्य घेण्याची सुचना आ. बच्चू कडू यांनी केली होती. मात्र, केवळ भाजपा, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नेते व कार्यकर्त्यांची सदस्यपदी निवड … Read more

बिबट्याच्या 2 पिल्लांचे आईसोबत घडले पुनर्मिलन

Karad News 22 jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील मालखेड येथील शेतकरी रामचंद्र ज्ञानू मोरे यांच्या कूळकी नामक शिवारात बुधवारी ऊसतोड सुरू होती. यावेळी ऊसतोड सुरु असताना सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ऊसाच्या सरीमध्ये २ बिबट्यांची पिल्ले आढळून आली. याबाबत शेतकऱ्यांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधला असता वन विभागाच्या प्रयत्नानंतर दोन पिल्लांची त्यांच्या आईशी भेट घडवून आणण्यात यश आले. याचा … Read more

‘या’ गावच्या ग्रामस्थांनी दिला थेट मतदानावर बहिष्काराचा इशारा

Karad News 20240216 061925 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील एका गावाने आगामी लोकसभा व विधानसभा मतदान निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. कराड तालुक्यातील बाबरमाची, किल्ले सदाशिवगड येथील बुथ लेव्हल अधिकारी गावात राजकीय हेतूने काम करत आहेत. ठरावीक मतदारांची नावे परस्पर कमी करून त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा जाणीवपुर्वक प्रयत्न करण्यात आला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून अशा बिलओवर … Read more

28 ग्रामपंचायतींच्या मतदार यादी, आरक्षण सोडतीचा कार्यक्रम सुरू

Karad News 20240215 203139 0000 jpg

कराड प्रतिनिधी | नव्या वर्षात सुरुवातीलाच ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. कराड तालुक्यातील 28 ग्रामपंचायतींच्या मतदार याद्या आणि प्रभाग निहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामध्ये कराड दक्षिण मधील १६ तर उत्तर मधील १२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या निवडणुकांचा लवकरच बिगुल वाजणार आहे. ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापणार तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेने बाबरमाची, जुजारवाड़ी, … Read more