‘बळीराजा’च्या पंजाबराव पाटलांचे थेट मुख्यमंत्री शिंदेंना पत्र; केली ‘ही’ महत्वाची मागणी

Punjabrao Patil Eknath Shinde News 1

कराड प्रतिनिधी । मागील 50 वर्षांमध्ये घडली नाही अशी घटना सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. आषाढ महिना संपत आला तरी सुद्धा पावसाचा जोर दिसत नाही. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या ठिकाणी पेरणी केलेली उगवण उगवण्या इतपत सुद्धा पाऊस झालेला नाही. शेतकरी प्रत्येक वर्षी कर्ज काढून शेतीची मशागत व पेरणी करतो. यावर्षी सुद्धा कर्ज काढून शेतकऱ्यांनी पेरणी … Read more

पोलिसांनाही न जुमानता ‘ते’ आपापसात ‘भिडले’; 11 जणांनी तलवार नाचवत केला ‘राडा’

Karad City Police

कराड प्रतिनिधी । कराड शहरात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. कारण चोऱ्या, लुटमारीसोबतच इतर घटना वाढत आहेत. अशा गुन्हेगारांना पोलिसांचा धाक हवा आहे. मात्र, याच्या विरुद्ध घटना रविवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास घडली. शहरातील डॉ. आंबेडकर पुतळा ते जोतिबा मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर पालकरवाडा येथे 11 युवकांच्या दोन गटांत जोरदार राडा … Read more

Crime News : भयाण शांततेत ‘तो’ पिस्तूल घेऊन आला अन् पोलिसांच्या सापळ्यात अलगद अडकला…

Karad City Police

कराड प्रतिनिधी । कराड शहरात एकीकडे चोऱ्या-लुटमारीच्या, पिस्तूल विक्रीच्या घटना वाढू लागल्या आहेत तर दुसरीकडे पोलिसांकडून आरोपींची धरपकड कारवाई केली जात आहे. अशात रविवारी मध्यरात्री एका डॉक्टरच्या घरावर दरोडा टाकण्यात आल्याची घटना घडली. तर सोमवारी रात्री लाच घेताना ACB च्या पथकाने एका नगरअभियंत्यासह एकास अटक केले. यानंतर पोलिसांनी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास विनापरवाना देशी बनावटीचे … Read more

Karad News : मलकापूरच्या नगर अभियंत्यास ACB ने रंगेहाथ पकडले; 30 हजार रुपयांची घेतली लाच

jpg 20230710 223500 0000

कराड प्रतिनिधी | आपल्या स्वच्छतेमुळे नाव कमावलेल्या मलकापूर येथील अभियंत्यास आज लाच लुचपत विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. तब्बल ३० हजार रुपयांची लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोने कारवाई केली. यामध्ये नगर अभियंता गट क वर्गमधील शशिकांत सुधाकर पवार (वय 37, रा. मंद्रूळ कोळे, ता. पाटण जि. सातारा, सध्या रा. वसंत विला पाच मंदिर जवळ कोयना … Read more

Crime News : कराड येथे शिंदे डॉक्टरांच्या बंगल्यात 46 लाखांचा दरोडा; मध्यरात्री नक्की काय घडलं? CCTV पहा

Crime News

कराड प्रतिनिधी (Crime News) । मागील काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. मध्यरात्री घरफोडी आणि दरोडा अशा घटना घडत असल्याने सर्वसामान्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. काल रात्री कराड शहरातील डॉक्टर शिंदे यांच्या बंगल्यावर दरोडा पडल्याची घटना घडली. यावेळी चोरट्यांनी तब्बल ४६ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. आता या घटनेचे सीसीटिव्ह फुटेज समोर आले असून … Read more

कराडात मध्यरात्रीच्या सुमारास डॉक्टरच्या घरावर दरोडा; चाकूचा धाक दाखवत लुटले

jpg 20230710 104226 0000

कराड प्रतिनिधी : गेल्या अनेक दिवसांपासून कराड शहरात लूटमारीच्या घटना घडत आहेत. प्रत्येक महिन्यात किमान एक तरी घटना अज्ञातांनी गंठण लंपास केल्याची घटना घडतेच आहे. अशात आता कराड येथील सुप्रसिध्द अशा एका डॉक्टरच्या घरावर सात ते आठ अज्ञातांनी दरोडा टाकून सुमारे 25 तोळे सोन्या – चांदीचे दागिने व 15 लाख रुपये लुटल्याची घटना सोमवारी मध्यरात्रीच्या … Read more

BRS जिल्ह्यातील आगामी सर्व निवडणुका लढवणार; शंकरराव गोडसे यांचं मोठं विधान

jpg 20230709 221642 0000

कराड प्रतिनिधी : तेलंगणाचे राज्य सरकारने मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या आहेत. त्यामुळे शेतीबाबत तेलंगणा पंजाबच्याही पुढे गेले आहे. महाराष्ट्रातील शेतकरीही या पक्षाकडे आकर्षित होत असून आगामी काळात येणाऱ्या सातारा लोकसभेसह जिल्हय़ातील आठही विधानसभा मतदारसंघ तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका BRS (भारत राष्ट्र समिती) लढवणार आहे. बीआरएस हा कोणत्याही पक्षाची … Read more

सध्या माणूस हा स्वकेंद्री बनत चालला आहे : रो.मोहन पालेशा

Ceremony of Rotary Club of Karad

कराड प्रतिनिधी । सध्या माणूस हा स्वकेंद्री बनत चालला असून मी, माझी बायको व माझे कुटुंब अशी त्याची वृत्ती झाली आहे. स्वकेंद्रीत वृत्तीमुळे समाजातील प्रश्न कधी आपल्या कुटुंबापर्यत येऊन पोचतील, हे कळणारही नाही, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्याख्याते व प्रशिक्षक रो. मोहन पालेशा व्यक्त केले. कराड येथील दि कराड अर्बन बॅंकेच्या शताब्दी हॉलमध्ये रोटरी क्लब … Read more

कराडकरांचा स्वच्छतेचा संस्कार कौतुकास्पद : प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड 

Bapuji Salunkhe College News

कराड प्रतिनिधी । प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छतेबरोबर स्वतःच्या सीमित परिसराची स्वच्छता बाळगली तर काय होऊ शकते याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे कराड शहर होय. स्वच्छ शहराचा देश पातळीवर मिळालेला पुरस्कार ही त्याचीच पोचपावती आहे. आता एवढ्यावर थांबून चालणार नाही तर स्वच्छतेचा बालसंस्कारच आता रुजविणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही साळुंखे महाविद्यालयाच्या माध्यमातून कराड शहरात येत्या वर्षभरासाठी प्लास्टिक निर्मूलनाचा … Read more

काँग्रेसमधील आमदारांच्या फुटीच्या चर्चेबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे मोठे विधान; म्हणाले की,

Prithviraj Chavan News 1

कराड प्रतिनिधी । काँग्रेस पक्षामध्ये 45 आमदारांचा आमचा गट आहे. त्यातील 30-31 आमदार फुटून बाहेर जातील, याची अजिबात शक्यता नाही. मात्र, जाणीवपूर्वक भाजपकडून खोट्या अफवा पसरविण्याचे काम सुरू आहे. त्यांना साधा मंत्रिमंडळाचा विस्तार करता येत नाही. विधान परिषदेच्या बारा आमदारांची नियुक्ती करता येत नाही, हे वाटते तितके सोपे नसल्याचे विधान माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण … Read more

काँग्रेसचे माजी नगरसेवक इंद्रजित गुजर यांचा उद्धव ठाकरे गटात प्रवेश

Indrajit Gujjar joins Uddhav Thackeray group

कराड प्रतिनिधी । माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण याच्या गटाचे कराडचे काँग्रेसचे माजी नगरसेवक इंद्रजित गुजर यांनी आज मुंबईत मातोश्रीवर जाऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवक गुजर यांना शिवबंधन बांधले. यावेळी माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, माजी आमदार दगडूदादा सकपाळ, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख … Read more

बनावट दारू बनवणाऱ्या टोळीच्या अड्यावर छापा, 7 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त; 4 जणांना अटक

Police raids hideout of fake liquor gang News

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात बनावट दारू बनवणाऱ्या टोळीचा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पर्दाफाश केला आहे. पथकाने जिल्ह्यातील सातारा, कराड व फलटण येथे बनावट दारु तयार करणाऱ्या टोळीवर धडक कारवाई करत एकूण रुपये 7 लाख 36 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात केला आहे. तसेच 4 जणांना अटक केली असून त्यांना आज … Read more