अबब…! सातारा जिल्ह्यात ‘इतक्या’ लोकांना आले ‘डोळे’

Eye News 20230808 124332 0000 jpg

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सध्या डोळे येण्याची साथ जोरात असून मोठ्या प्रमाणात रुग्णांमध्ये ही लक्षणे दिसू लागली आहेत. फलटण व सातारा तालुक्‍यात तर या डोळे आलेल्या रुग्णांनी शंभरीच पार केली असून जिल्ह्यात तब्बल 636 नागरिकांना डोळे आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 258 रुग्ण उपचारद्वारे बरे झाले असून सध्या 378 रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. … Read more

शिक्षणमहर्षी परमपूज्य डॉ.बापूजी साळुंखे एक आदर्शवत दैवत

Dr. Bapuji Salunkhe News 20230808 111105 0000 jpg

कराड | देशभक्त क्रांतीकारकांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्याला लढवय्या वीरांबरोबरच संत परंपरेचाही वारसा लाभला आहे. हा वारसा जपण्याचे आणि तो पुढे नेण्याचे काम स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गोविंदराव ज्ञानोजीराव साळुंखे म्हणजेच शिक्षणमहर्षी परमपूज्य डॉ.बापूजी साळुंखे यांनी केले आहे. स्वतः चंदनासारखे झिजून बहूजन समाजास शिक्षणरूपी प्रकाश देणाऱ्या थोर महापुरुषाची ८ ऑगस्ट १९८७ रोजी … Read more

दहशत घालणाऱ्या तडीपार गुंडास अटक

Karad City Police

कराड प्रतिनिधी | तडीपार असतानाही कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत येऊन दहशत माजवत असलेल्या सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या कराडच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सोमवारी आवळल्या. देवा अशोक येडगे, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक राजू डांगे यांनी ही माहिती दिली. याबाबत पोलिसांनी अशी माहिती दिली की, माहितीनुसार, देवा येडगे व त्याच्या इतर साथिदारांना … Read more

मुलींनो छेडछाड झाल्यास करा ‘या’ नंबरवर कॉल, मिळेल तत्काळ मदत; कराड पोलिसांकडून हेल्पलाईन सुरु

Karad News 2 jpg

कराड प्रतिनिधी । महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुली तसेच महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांकडून अनेक उपाय केले जातात. एखाद्या महिलेची किंवा मुलीचे कुणी छेड काढल्यास किंवा तिला त्रास देत असल्यास संबंधितांवर कारवाई करण्यासाठी निर्भया पथक देखील स्थापन करण्यात आले आहे. दरम्यान आता या पथकाच्यावतीने संकटकाळात महिलांना पोलिसांशी तत्काळ संपर्क करता यावा यासाठी एक मोबाईल नंबर सुरु करण्यात … Read more

चोरटयांनी 40 हजाराच्या बांधकाम साहित्यावर मारला डल्ला

karad taluka police station

कराड प्रतिनिधी । सध्या कराड व पाटण तालुक्यात चोरटयांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. रात्रीच्यावेळी त्यांच्याकडून कुठे घरफोडी तर कुठे लुटमारीचे प्रकार केले जात आहेत. दरम्यान आता चोरटयांनी आपला मोर्चा हा रस्त्याच्या बांधकाम साहित्याच्या चोरीकडे वळवला आहे. अशीच घटना नुकतीच कराड तालुक्यातील सुर्ली येथे घडली आहे. या ठिकाणी असलेल्या ठेकेदार कंपनीच्या कार्यालयातून सुमारे 40 हजार रुपये … Read more

कोयना धरणाचा पाणीसाठा झाला 82.16 TMC; पावसाचा जोर ओसरला

Koyna Dam

पाटण प्रतिनिधी । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाचा वाढला जोर कमी झाला असल्यामुळे धरण क्षेत्रांत पाण्याचाही आवक कमी झाली आहे. दरम्यान, सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत धरणाचा एकूण पाणीसाठा 82.16 टीएमसी झाला असून, सुमारे 78.06 टक्के धरण भरले आहे. कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून 2 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. गेल्या सहा … Read more

ज्या हातांनी घोरपडीची शिकार करून खाल्ले; त्याच हातात पडल्या बेड्या

Crime News 5 jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यात सध्या वन्य प्राण्यांच्या शिकारीचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान कराड तालुक्यातील शेणोली रेल्वे स्टेशनजवळील संजयनगर-गोपाळनगर येथे शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घोरपडीची शिकार करून पार्टी केल्याचा प्रकार उघडकीस आला. यानंतर वनविभाग विभागाने संबंधित शिकारीवर कारवाई करत त्यास बेड्या ठोकल्या. सुनील विजय जाधव ( रा. गोपाळनगर-शेणोली, ता. कराड) असे वन विभागाकडून अटक … Read more

रात्री दूध घालून ‘ते’ दुचाकीवरून घरी परतत होते; वाटेतच घडलं असं काही…

Accident News jpg

कराड प्रतिनिधी । कराडला येऊन दूध घालून ते दुचाकीवरून आपल्या तांबवे गावाकडं परतत होते. दूध घालून कराड – पाटण मार्गावरून घरी परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. तांबवे गावच्या एका दूध विक्रेत्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास घडली. हणमंत (बाळासाहेब) रघुनाथ पाटील (वय- 52, रा. तांबवे, ता. कराड) … Read more

कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ; 81.49 TMC भरलं धरण

Koyna Dam 1

पाटण प्रतिनिधी । कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सध्या पावसाचा वाढला जोर कमी झाला असला असल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्याने 80 टीएमसीचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान, रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत धरणाचा एकूण पाणीसाठा 81.49 टीएमसी झाला असून, सुमारे 77.42 टक्के धरण भरले आहे. कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून 2 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. गेल्या … Read more

रामराव निकम कॉलेजच्या यशवंत गटाचा निरोप समारंभ उत्साहात साजरा

Karad News 1

कराड प्रतिनिधी । इंदोली ता. कराड येथील कै. रामराव निकम शिक्षण शास्त्र (बी.एड) महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष छात्राध्यापकांचा आंतरवासिता टप्पा क्रमांक एकचा निरोप समारंभ मसूर येथील इंदिरा कन्या प्रशालेत नुकताच पार पडला. यावेळी कापील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक लियाकतअली इनामदार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कै. रामराव निकम शिक्षणशास्त्र (बी.एड ) … Read more

NDRF च्या जवानांनी कराडच्या वेणूताई चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना दिले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

Karad NDRF News 1

कराड प्रतिनिधी । नैसर्गिक आपत्ती काळात नेमक्या कोणत्या उपाययोजना करायच्या? अशा वेळी बचावकार्य करून एखाद्याचा जीव कसा वाचवायचा? या सर्व गोष्टींची माहिती व प्रात्यक्षिक आज NDRF टीमच्या जवानांकडून कराड येथील वेणूताई चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना देण्यात आली. कराड येथील वेणूताई चव्हाण महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा पार पडली. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने … Read more

बेपत्ता झालेल्या वृध्द महिलेचा माहेरी विहिरीत आढळला मृतदेह

Crime News 2

पाटण प्रतिनिधी । कराड तालुक्यातील आगाशिवनगर येथून गुरुवारी एक वृद्ध महिला बेपत्ता झाली होती. त्या महिलेचा कुटुंबियांकडून शोधही घेतला जात होता. कुटुंबीयांनी याबाबत पोलीस ठाण्यातही फिर्याद दिली होती. मात्र, बेपत्ता झालेल्या वृद्ध महिलेचा अखेर माहेरी गलमेवाडी-कुंभारगाव, ता. पाटण येथील एक सार्वजनिक विहिरीत मृतदेह आढळून आला. चंद्रकला शंकर माटेकर (वय 65, सध्या रा. आगाशिवनगर) असे मृत … Read more