कराडात रविवार होणार इंडिया आघाडीचा संयुक्त मेळावा, आ. बाळासाहेब पाटलांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती

Karad News 83 jpg

कराड प्रतिनिधी | इंडिया आघाडीचा संयुक्त मेळावा रविवारी सायंकाळी ४ वाजता पंकज हॉटेलच्या मल्टिपर्पज हॉलमध्ये होणार असल्याची माहिती माजी सहकार मंत्री, आमदार बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षद कदम, सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस … Read more

मसूरच्या मुख्य चौकातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद

Masur News 1 1 jpg

कराड प्रतिनिधी । मसूर परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि विविध गुन्ह्यांची उकल करण्यासाठी मसूरच्या मुख्य चौकात चारही दिशेला लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, ते सध्या अनेक दिवसांपासून बंद असून नादुरुस्त आहेत. चौकात बंद अवस्थेतील सीसीटीव्ही कॅमेरे हे शोपीस बनून राहिले आहेत. मसूर परिसरातील वाढत्या गुन्हेगारीला आणि चोरीच्या घटनांना आळा बसून घटना कॅमेरात कैद … Read more

जरंडेश्वर – सातारा ब्लॉकमुळे रेल्वेसेवा होणार विस्कळित; आजपासून ‘या’ गाड्या रद्द

Satara News 20240326 110915 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | मध्य रेल्वेच्या (Central Railway) पुणे विभागातील लोहमार्गाच्या दुहेरीकरणातील इंजिनिअरिंग व इतर कामांसाठी पुणे-सातारा लोहमार्गातील जरंडेश्वर – सातारा या दरम्यान आजपासून दि. २६ शुक्रवार अखेर दि. २९ ‘ट्रॅफिक ब्लॉक’ घेण्यात आलेला असून, त्यामुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्या नियमित वेळेपेक्षा उशिरा सुटणार आहेत. मंगळवारी दि.२६ रेल्वे गाडी क्रमांक ०१४२३ … Read more

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पृथ्वीराजबाबांवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

Prithviraj Chavan News 20240324 210316 0000 jpg

कराड प्रतिनिधी | काँग्रेसकडून आगामी लोकसभा निवडणुकांसाठी प्रचार आणि व्यवस्थापनाची जय्यत तयारी केली जात आहे. या तयारीसाठी काँग्रेसकडून काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकांसाठी कॅम्पेन समिती स्थापन केली असून या कमिटीच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या … Read more

मलकापूरातील लाहोटीनगरमधील भरवस्तीतून बिबट्याचा मुक्तसंचार; नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

Karad News 82 jpg

कराड प्रतिनिधी । पाणी आणि भक्ष्याच्या शोधासाठी बिबट्याचा शहरी भागात संचार वाढला आहे. त्यामुळे कराड तालुक्‍यातील मलकापूर, आगाशिवनगर, कापील, गोळेश्वर नांदलापूर, जखिणवाडी, चचेगावसारख्या शहरी भागालगतच्या गावांसह ५२ गावांत बिबट्याचा वावर आहे. दरम्यान, आज रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मलकापुरातील लाहोटीनगर परिसरातील भर वस्तीतून शाळुच्या शेत शिवारातून बिबट्या संचार करत असल्याचे नागरिकांना दिसून झाले. या अघटनेमुळे … Read more

कराड डीबी पथकाची मोठी कारवाई, दारूची वाहतूक करणाऱ्या बोलेरोसह 7 लाखांचा मुद्देमाल जप्त

Karad News 81 jpg

कराड प्रतिनिधी | सध्या लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू असल्याने पोलिसांकडून नाकाबंदी केली जात आहे. वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. आचारसंहिता सुरू असताना वाहनातून विदेशी दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक के. एन. पाटील यांना खबऱ्याकडून मिळाली. माहितीच्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेने बैल बाजार- मलकापूर रस्त्यावर गोकाक पेट्रोल पंपाजवळ … Read more

कराड-मसूर रोडवर कार-दुचाकीच्या धडकेत युवकाचा मृत्यू; कारचालकावर गुन्हा दाखल

Karad News 20240323 230506 0000 jpg

कराड प्रतिनिधी | रात्रीच्यावेळी दुचाकीवरून निघालेल्या युवकाला भरधाव चारचाकी कारने जोरदार धडक दिल्याची घटना कराड-मसूर रोडवर बनवडी गावच्या हद्दीत सिताराम सिटी समोर शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. चारचाकी वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अजय विलास चव्हाण (वय 33, रा.कोपर्डे हवेली) असे अपघातात मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी कारचालक प्रमोद शिंदे … Read more

जिल्ह्यातील दोन तालुक्यात समावेश होणाऱ्या ‘या’ गावातील पाण्याचा तिढा सुटला

Jangalwadi News 1 jpg

पाटण प्रतिनिधी । आपल्या कानावर ‘एक घाव, दोन तुकडे’, अशी म्हण अनेकदा पडली असेल. मात्र, अशीच म्हण सातारा जिल्ह्यातील पाटण आणि कराड या दोन्ही तालुक्यांचा समावेश होणाऱ्या एका गावाबाबत लागू होतेय. सातारा जिल्ह्यातील जंगलवाडी हे असं गाव आहे कि याचा निम्मा कराड आणि निम्मा पाटण तालुक्यात समावेश आहे. डोंगरावर वसलेल्या आणि सुमारे चारशे लोकवस्ती असलेल्या … Read more

लॉजच्या खोलीत पंख्याच्या हुकला गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

Karad News 20240323 001942 0000 jpg

कराड प्रतिनिधी | लॉजच्या खोलीत पंख्याच्या हुकला गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केल्याची घटना कराड शहरातील सूर्या लॉजमध्ये शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.प्रथमेश विकास पवार (वय २४, रा. आंबेगाव, ता. जि. सातारा) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मलकापूर येथे राहणारे अभिषेक सिद्धप्पा अंकलगी हे शहरातील सूर्या लॉज चालवितात. गुरुवारी दुपारी … Read more

कराडातील पी. डी. पाटील उद्यान परिसरात वृद्ध महिलेची 2 महिलांनी बोरमाळ केली लंपास

Karad News 20240322 224840 0000 jpg

कराड प्रतिनिधी | सोन्याचे मणी देण्याचे अमिष दाखवून वृद्ध महिलेकडे असलेली बोरमाळ 2 महिलांनी लंपास केल्याची घटना कराड शहरातील पी. डी. पाटील उद्यानात शुक्रवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोन अज्ञात महिलांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत मालन राजाराम पवार (वय ८१, रा. गुरूवार पेठ, कराड) यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. … Read more

अखेर तारळी धरणाचे पाणी सोडले, लवकरच मसूर विभागात होणार दाखल

Karad News 80 jpg

सातारा प्रतिनिधी । तारळी धरण उभारणीस 1995 साली मंजूरी मिळाल्यानंतर त्याचे काम 2010 साली पुर्ण झाले. या धरणामध्ये 5.83 टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध असून त्यातील 1.83 टीएमसी पाणी नदीवाटे शेतीसाठी व पिण्यासाठी वापरात येत होते. उर्वरीत 4 टीएमसी पाणी वापरात येत नव्हते. दरम्यान, मसूर व कोपर्डे हवेली विभागातील शेतकऱ्यांनी पिकांना पाणी मिळावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे … Read more

कराड तालुक्यात ऊस लागवड क्षेत्र ‘इतक्या’ टक्क्यांनी घटणार; 44 पाझर तलाव आटले

Karad News 79 jpg

कराड प्रतिनिधी । यंदा कृष्णा व आरफळ कालव्याला पाणी नसल्याने ऐन उन्हाळ्यात पिकांची होरपळ सुरू आहे. शेतीच्या पाण्याची स्थिती बिकट होणार असल्याने अनेक शेतकऱ्यांकडून ऊस शेतीकडे पाठ फिरवली जात आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील ५९ पाझर तलावांपैकी ४४ पाझर तलाव आटले आहेत. शेतकऱ्यांनी चारा, भाजीपाला, उन्हाळी भुईमूग या पिकांचा पर्याय निवडला आहे. शेतीला पुरेसे पाणी मिळणार नसल्याने … Read more