कराड उत्तर भाजपाची किरोली वाठार ते चाफळपर्यंत बाईक रॅली, घरोघरी पोहचवला मोदींचा नमस्कार!

Karad News 20240501 192806 0000

कराड प्रतिनिधी | महायुतीचे उमेदवार खा. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कराडमध्ये झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला नमस्कार घरोघरी सांगा, असं आवाहन भाजप कार्यकर्त्यांना केलं होतं. त्यानुसार कराड उत्तरमध्ये भाजपचे प्रदेश सचिव ॲड. भरत पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाठार किरोली ते चाफळ दरम्यान कार्यकर्त्यांनी ‘नमस्कार बाईक रॅली’ काढली. मोटरसायकल रॅलीत ॲड. महादेव साळुंखे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष … Read more

महाराष्ट्र दिनी उद्या कराडात मराठी गीतांचा कार्यक्रम

Karad News 20240430 221133 0000

कराड प्रतिनिधी | स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कराड कर्मभूमीत महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून उद्या बुधवार दि. १ मे रोजी ६४ व्या महाराष्ट्र दिनानिमित्त महंमद रफी कॅराओके म्युझिक अॅकॅडमी कराड सुनहरी सरगम के सितारे प्रस्तुत शुक्रतारा मंदवारा या लोकप्रिय मराठी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार प्रमोद तोडकर आणि महागुरू आसिफ बागवान यांनी दिली. … Read more

कराड बार असोसिएशन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ॲड. एम. टी. देसाई यांचा भरघोस मतांनी विजय

20240430 201332 0000

कराड प्रतिनिधी | कराड बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीत ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. एम. टी. देसाई हे अध्यक्षपदी भरघोस मतांनी निवडून आले. दरम्यान, उपाध्यक्ष, सचिव आणि खजिनदार या पदांची निवडणूक बिनविरोध झाली होती. त्यामुळे मंगळवारी अध्यक्षपदासाठी मतदान झाले. दुपारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाला. कराड बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदासाठी ॲड. एम. टी. देसाई आणि ॲड. पी. … Read more

इंडिया आघाडी अन् काँग्रेस सत्तेत आल्यास संविधान बदलतील; नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

Narendra Modi News 20240429 190218 0000

कराड प्रतिनिधी | कराड येथे सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खा. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पार पडली. यावेळी त्यांनी काँग्रेससह इतर इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला. “सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातून समाजात फूट पाडत आहेत. इंडिया आघाडी आणि काँग्रेस तिसऱ्यांदा सत्तेत आले तर संविधान … Read more

Narendra Modi : कराडातील महाविराट सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल; हात जोडत केला नमस्कार

Karad News 20240429 164440 0000

कराड प्रतिनिधी | सातारा लोकसभा निवडणूक 2024 (Satara Lok Sabha Election 2024) मधील सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची कराड येथे आज सोमवार, दि. 29 विराट महाविजय सभा होत आहे. या सभेसाठी पंतप्रधान मोदी थोड्यावेळापूर्वीच दाखल झाले. यावेळी या ठिकाणी त्यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत … Read more

महाराष्ट्रात पक्ष फोडून सरकार पाडायला पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच राजाश्रय, पृथ्वीराज चव्हाणांचा थेट हल्लाबोल

Prithviraj Chavan News 20240429 080528 0000

कराड प्रतिनिधी | महाराष्ट्रातील सरकार पाडायला आणि पक्ष फोडायला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा स्पष्ट आशिर्वाद होता. मोदींच्या संमतीनेच सगळं झालेलं आहे. त्यांनी लॉजिस्टिकल मदत पुरवली असल्याचा खळबळजनक दावा माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. तसेच हा राजनैतिक भ्रष्टाचार असल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकार पाडण्यात राजनैतिक भ्रष्टाचार भ्रष्टाचार हा दोन प्रकारचा आहे. … Read more

नरेंद्र मोदींच्या सभेमुळे कराडला उद्या वाहतुकीत बदल; ‘अशी’ असणार वाहतूक

20240428 105704 0000

कराड प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सैदापूर (ता. कराड) येथील सभेच्या अनुषंगाने कराड शहरातील अंतर्गत वाहतुकीत बदल करुन वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी दि. २९ एप्रिल रोजी मध्यरात्रीचे एक वाजल्यापासून सभा संपेपर्यंत पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी अधिसूचना पारित केली आहे. या अधिसूचनेद्वारे वाहनांच्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. सोमवारी दि. २९ एप्रिल रोजी … Read more

कराड शहरातील शेतकरी ते थेट ग्राहक हापूस आंबा विक्रीला मोठा प्रतिसाद, पहा कुठे आहे हॅलो कृषी आउटलेट

hello krushi outlet karad

कराड : कराड शहरात शेतकरी ते थेट ग्राहक हापूस आंबा विक्री करणाऱ्या हॅलो कृषी आउटलेटला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांकडून थेट आंबे हॅलो कृषी आउटलेटच्या माध्यमातून ग्राहकांना उपलब्ध होत असल्याने अगदी योग्य दरात ओरिजिनल हापूस आंबा मिळत असल्याने यातून हॅलो कृषी च्या शेतकऱ्यांचा देखील फायदा होतो आहे. शेतकरी ते थेट ग्राहक … Read more

गिरेवाडीतील अपघातात एकजण जागीच ठार

Accident News 20240425 061808 0000 jpg

पाटण प्रतिनिधी | मल्हारपेठ आठवडा बाजारास येताना चार वाजण्याच्या सुमारास गिरेवाडी (ता.पाटण) जवळ रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या चरीत गाडी घसरून ट्रॅक्टरखाली गेल्याने दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला. दिपक शंकर काटकर (वय ५५, रा. बेलदरे ता. कराड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बेलदरे गावाहून मल्हारपेठ बाजारास येताना गिरेवाडी गावाजवळ चौपदरी रस्त्याच्या मध्यमागी … Read more

…तर सातारा जिल्ह्यात मोदी अन् पवारांची एकाच दिवशी झाली असती विराट सभा

Satara District Political News 20240424 185836 0000 jpg

कराड प्रतिनिधी | संपूर्ण देशासह राज्याचे लक्ष लागलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आखाड्यात प्रचारासाठी दिग्गज नेत्यांनी आपले दंड थोपटले आहे. शरद पवार यांच्या सातारा जिल्ह्यात तीन सभा होत आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील महाराष्ट्रात सभा आयोजित केल्या असून त्यांची सातारा जिल्ह्यातील कराड येथे सभा होत आहे. यात विशेष म्हणजे दि. 30 एप्रिल रोजी … Read more

नरेंद्र मोदींच्या कराडातील प्रचार सभेची तारीख बदलली; 30 ऐवजी होणार ‘या’ दिवशी सभा

Modi News 20240424 120821 0000 jpg

कराड प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र गोदी यांच्या कराडमध्ये होणाऱ्या सभेत बदल करण्यात आलेला आहे. जी सभा ३० एप्रिल रोजी होणार होती ती आता २९ एप्रिल रोजी सोमवारी सैदापूर येथे दुपारी दोन वाजता होणार आहे. पुणे व बारामती येथील सभांची कार्य व्यस्तता लक्षात घेऊन हा बदल करण्यात आलेला आहे. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली … Read more

सणबूरमध्ये कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला;15 जण जखमी

Sanbur News 20240423 131503 0000 jpg

कराड प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील सणबुर येथील कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाच्या मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात कुस्ती मैदानातील पैलवानांसह १५ जण जखमी झाले, तर कुस्त्या पाहायला आलेल्या अनेकजणांना चावा घेतल्याने जखमी झाले. जखमींना ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सणबूर (ता. पाटण) येथील ग्रामदैवत श्री विठ्ठलाई देवीच्या यात्रेनिमित्त रविवार सायंकाळी आयोजित कुस्तीच्या मैदानावर आग्या … Read more