कृष्णा विद्यापीठात शुक्रवारपासून ‘न्यूरोकॉन’ आंतरराष्ट्रीय परिषद; जगभरातील 150 न्युरोसायन्स तज्ज्ञांचा असणार सहभाग

Karad News 26

कराड प्रतिनिधी । कराड मलकापूर येथील कृष्णा विश्व विद्यापीठात दि. १६ ते १८ ऑगस्ट दरम्यान न्यूरोसर्जरी विषयावरील ‘न्यूरोकॉन २०२४’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये जगभरातील १५० हून अधिक मेंदू विकारतज्ज्ञ, तसेच न्युरोसर्जन तज्ज्ञांचा सहभाग असणार आहे. शुक्रवार दि. १६ दुपारी ३ वाजता या परिषदेचे उद्‌घाटन वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्युरोसर्जिकल सोसायटीज्‌चे अध्यक्ष … Read more

कराड विमानतळ परिसरातील अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना नोटिस; सात दिवसांची दिली मुदत

Karad News 20240813 080742 0000

कराड प्रतिनिधी | कराड येथील विमानतळ विस्तारीकरणासाठी व या ठिकाणी विमान सेवा सुरू करण्याबाबत केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नुकतेच महत्वाचे विधानही केले. लवकरच विमानसेवा सुरू होणार असून भू संपादनाचा विषय मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, शासनाकडून देखील यासाठी 221 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. प्रशासनाकडून विमानतळ परिसरातील रेड झोनमध्ये समाविष्ट असणार्‍या पाच गावांतील 62 … Read more

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघावर भाजपनं केलं लक्ष केंद्रीत; केंद्रीयमंत्री जे. पी. नड्डा शुक्रवारी कराडात

Karad News 25

कराड प्रतिनिधी। लोकसभा निवडणुकीनंतर भाजपसह सर्वच राजकीय पक्ष आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. याचाच एक भाग म्हणजे भाजपच्या नेत्यांचे सातारा जिल्ह्यात दौरे वाढू लागले आहेत. आठवड्यात भाजपच्या दोन नेत्यांनी सातारा वकराड दौरा केला आहे. साताऱ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर कराडात केन्द्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थिती लावली आहे. यानंतर आता शुक्रवारी दि. 16 ऑगस्ट … Read more

पावसाच्या उघडीपीमुळे खरिपाच्या आंतरमशागतीची कामे सुरू; कोयना धरणात ‘इतका’ पाणीसाठा

Koyna News 5 1

कराड प्रतिनिधी । गेली महिनाभर सातत्याने पडत असलेल्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे. त्यामुळे खरिपाच्या व इतर पिकांच्या शेतीतील आंतरमशागतीच्या कामासाठी शेतकरी बाहेर पडला आहे. पाटण आणि कराड तालुक्यातील शेतशिवारे शेतकऱ्यांनी फुलली आहेत. दरम्यान, कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाने उघडीप दिली असून धरणात 90.14 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. जूनमधील पावसावर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीला सुरूवात … Read more

कोल्हापूरच्या महिलेचे सव्वादोन लाखांचे दागिने लंपास; किणी वाठार ते कराड दरम्यानची घटना

Karad News 24

कराड प्रतिनिधी । एसटीमधून प्रवास करणाऱ्या कोल्हापूरच्या महिलेच्या बॅगमधील सुमारे सव्वादोन लाख रुपये किमतीचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना किणी वाठार ते कराड यादरम्यानच्या प्रवासात शुक्रवारी घडली. याप्रकरणी महिलेने कराड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्या विजय पाटील (रा. सैनिक टाकळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) यांनी … Read more

तासवडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिपाली जाधव यांची बिनविरोध निवड

Karad News 23

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील महत्वपूर्ण अशा तासवडे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ. दिपाली अमित जाधव यांची बिनविरोध निवड झाली. सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष व शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य अमित जाधव यांच्या त्या पत्नी आहेत. तासवडे हे गाव एमआयडीसी व टोल नाका यामुळे कराड तालुक्यातील महत्वपूर्ण गाव आहे. सन 2021 च्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये तासवडे ग्रामपंचायतीत … Read more

कराडच्या विमानतळाचा प्रश्न कधी मार्गी लागणार?; केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी दिली महत्वाची माहिती

Karad News 22

कराड प्रतिनिधी । आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून राज्यात संवाद यात्रा काढण्यात येणार असून त्याच्या जिल्ह्यातील नियोजनासाठी महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या सूचनेनुसार भाजपचे जिल्हास्तरीय अधिवेशन आज कराड येथे पार पडत आहे. या अधिवेशनास नागरी विमान वाहतूक व सहकार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित असून त्यांनी कराड येथील विमानतळाच्या भू संपादनाविषयी महत्वाची माहिती दिली. “कराड येथील विमानतळाच्या … Read more

कराडातील तरूणास 65 हजाराच्या पिस्तुलासह अन्नपूर्णा हॉटेलसमोर अटक

Karad Crime News

कराड प्रतिनिधी । अवैध पिस्टल बाळगणाऱ्या संशयितास कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने शिताफीने अटक केली. ओंकार श्रीकांत माने उर्फ के. के. (रा. कोष्टी गल्ली, रविवार पेठ, कराड), असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून ६५ हजार रुपये किंमतीचे पिस्टल जप्त करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड शहर पोलीस ठाणे प्रभारी वरीष्ठ पोलीस निरीक्षक … Read more

हा जरांगे पाटील समाजाच्या पाठीशी मरेपर्यंत उभा राहणार – मनोज जरांगे पाटील

Karad News 21

कराड प्रतिनिधी । “एक मराठा लाख मराठा…, कोण म्हणतो देत न्हाय… घेतल्याशिवाय राहत न्हाय…, अशा घोषणा देत कराड येथील वारुंजी फाटा येथे मनोज जरांगे-पाटील यांचे मराठा समाज बांधवांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी जरांगे पाटील यांना जेसीबीच्या माध्यमातून १५ फुटी हार घालण्यात आला. यावेळी आपल्या मराठा समाजा हिणवण्याचे काम काही जणांकडून केले जात आहे. … Read more

अर्ध्या तिकिटात चला, ST बसमधून धार्मिक पर्यटनाला ! एस.टी. महामंडळाचा अभिनव उपक्रम

Karad News 20

कराड प्रतिनिधी । श्रावण सुरु झाला असून श्रावण (Shravan) महिन्यात धार्मिक पर्यटन स्थळांना (Devotional Tourism) भाविक मोठ्या संख्येने भेटी देतात. अशा भाविक पर्यटकांसाठी एसटी महामंडळाने (MSRTC) ‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ हा नावीण्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. सातारा आगारांच्या माध्यमातून श्रावण महिन्यानिमित्त तीर्थक्षेत्री जाण्यासाठी ‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ हा अभिनव उपक्रम सुरू असून ४२ प्रवासी मिळाल्यास … Read more

राजधानी साताऱ्यात थोड्याच वेळात धडाडणार मनोज जरांगे पाटलांची तोफ

Manoj Jarange Patil News

सातारा प्रतिनिधी । मराठा आरक्षणासाठी लढा देत असलेले संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील हे मराठा आरक्षण रॅलीसाठी राजधानी साताऱ्यात आज दि. १० रोजी सकाळी येत आहेत. साताऱ्यातील पोवई नाका येथे छ. शिवाजी महाराजांना पुतळ्यास अभिवादन करुन या रॅलीला सुरुवात होणार आहे. दरम्यान, ऐतिहासिक गांधी मैदान येथे जरांगे यांची तोफ धडाडणार आहे. त्याच्या रॅलीची जय्यत तयारी जिल्हा … Read more

प्रेमसंबंधाच्या संशयावरुन युवकावर ‘त्यानं’ केला कोयत्याने सपासप वार; एकावर गुन्हा दाखल, हल्ल्यात युवक गंभीर

Karad Crime News 20240809 220543 0000

कराड प्रतिनिधी | कराड शहरात किरकोळ कारणावरून थेट धारदार शस्त्राने हल्ला करण्याच्या घटना अधून मधून घडत आहेत. अशात कोयत्याने वार करुन युवकाला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना कराड शहरातील ऊर्दु शाळेमागे दरवेशी गल्लीत गुरूवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी एकावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सद्दाम हुसेन शेख … Read more