गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘हा’ महत्वाचा आदेश जारी

Satara Collector News 20230918 205203 0000 jpg

कराड प्रतिनिधी | गणेशोत्सव 2023 निमित्त कायदा व सुव्यवस्था आबाधित ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी मुंबई मद्य निषेध कायदा 1949 मधील कलम 142(1) मधील तरतुदीनुसार त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार दि. 19 सप्टेंबर गणेश चतुर्थी निमित्त जिल्ह्यात मद्य विक्री बंदी आदेश दिले आहेत. या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व देशीदारू किरकोळ विक्री (सीएल-3), बिअर विक्री परवाने (एफएल/बीआर-2) विदेशी … Read more

Crime News : प्रेमप्रकरणातून जखिणवाडीत भरदिवसा खून केलेल्या मोक्कातील टोळीप्रमुखाला जामीन मंजूर

Crime News 20230918 200130 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील जखिणवाडी येथे 9 वर्षांपुर्वी झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील टोळीवर मोक्का लावण्यात आला होता. या टोळीचा प्रमुख दीपक पाटील याने मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर आज सुनावणी होऊन उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती मकरंद कर्णिक यांनी त्यास जामीन मंजूर केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जखिणवाडी येथे दि. 9 जून … Read more

मुंबईकडे चालत निघालेल्या लाँग मार्चमधील चौघांच्या प्रकृतीत बिघाड; कराडच्या रुग्णालयात केले दाखल

Karad Bedar News 20230918 161658 0000 jpg

कराड प्रतिनिधी | मिरज तालुक्यातील बेडग गावात असलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वागत कमान ग्रामपंचायतीकडून पाडण्यात आल्यानंतर तेथील दलित समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. या समाजातील समाजबांधवांनी बेडग पासून थेट मुंबईकडे पायी लाँग मार्च सुरू केला आहे. घरांना कुलुपे लावून, बॅगा भरुन आंबेडकरी समाजबांधव मुंबईच्या दिशेने निघाला असून ते काल सायंकाळी कराड येथे दाखल झाले. … Read more

कराड उत्तरेत निघालेल्या काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेस पृथ्वीराजबाबांना उदयदादांची ‘साथ’

Karad Congress News 20230917 173800 0000 jpg

कराड प्रतिनिधी | काँग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेला कराड उत्तर विधानसभा मतदार संघामध्ये लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काँग्रेस कार्यकर्त्यांसह युवक – युवती, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झाले होते. माजी मुख्यमंत्री तथा आ. पृथ्वीराज चव्हाण आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. उदयसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हि जनसंवाद यात्रा काढण्यात आली. यावेळी दिवंगत माजी मंत्री … Read more

स्वच्छता महाअभियानातून निर्मळ झाला कराडचा कृष्णा नदीकाठ परिसर

Karad Palika News 20230917 170017 0000 jpg

कराड प्रतिनिधी | इंडियन स्वच्छता लीग 2.0 आणि स्वच्छतेचा पंधरावडा च्या ‘युथ वर्सेस गार्बेज’या थीम अंतर्गत कराड येथील कृष्णा नदीकाठी आज पालिका अधिकारी आणि कर्मचारी याच्या वतीने आज स्वच्छता महाअभियान राबविण्यात आले. यामध्ये शहरातील सामाजिक संस्था, शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. यावेळी करण्यात आलेल्या स्वच्छतेतून कृष्णा नदीपात्र परिसरातील गवत, झुडपे, कचरा काढून परिसर … Read more

कराडच्या भरवस्तीत सापडले स्टार कासव; वन विभागाकडून गोपनीय पध्दतीने तपास सुरू

Karad Star Turtle News 20230917 120839 0000 jpg

कराड प्रतिनिधी | वन्यजीव कायद्यानुसार सर्वाधिक संरक्षिक वर्गात समावेश असलेले दुर्मिळ प्रजातीचे स्टार कासव मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना कराड शहरातील रविवार पेठेसारख्या भरवस्तीत सापडले आहे. हे कासव लहानपणापासून घरात पाळले असल्याचा आणि जाणुनबुजून सोडले असल्याचा संशय आहे. या कासवाबद्दल मानद वन्यजीव रक्षक अथवा वन विभागाला माहिती द्यावी. माहिती देणार्‍याचे नाव गुप्त ठेवले जाईल, … Read more

घरगुती गॅस सिलेंडरमधून गाडीत भरत होता गॅस, पुरवठा विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले

Gas Cylinder News 20230916 232643 0000 jpg

कराड प्रतिनिधी | घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस मशीनच्या सहाय्याने वाहनात भरत असताना आगाशिवनगरमध्ये एकास पुरवठा विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. शनिवारी पुरवठा विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पुरवठा निरीक्षक महादेव आष्टेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन विशाल शिवाजी पवार (वय 32) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कराड तालुक्यातील आगाशिवनगर परिसरात एका … Read more

सातारा जिल्ह्यात लम्पीमुळे 26 जनावरांचा मृत्यू; कराडला वाढला धोका

20230916 212330 0000 jpg

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात लम्पीचा चांगलाच फैलाव होऊ लागला आहे. जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यातील लम्पी चर्मरोगाचा प्रादूर्भाव अकरा पैकी सुमारे आठ तालुक्यात झाला आहे. यामध्ये कराड तालुक्यात सर्वाधिक धोका आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत 350 जनावरे बाधित झाली असून यामधील 26 जनावरांचा मृत्यू झालेला आहे. मागीलवर्षी आॅक्टोबर ते २०२३ मधील मार्चपर्यंतच्या लम्पीच्या पहिल्या लाटेत सुमारे २० … Read more

‘कराड दक्षिण’ मध्ये काँग्रेसची उद्यापासून निघणार गावागावात जनसंवाद पदयात्रा

Karad Congress News 20230915 204302 0000 jpg

कराड प्रतिनिधी | काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळाला. केरळ ते जम्मू काश्मीरपर्यंत देश पादाक्रांत करत राहुल गांधी यांनी काँग्रेसचा हात बळकट केला. आता गाव-तालुका स्तरावर काँग्रेसची वज्रमूठ साकारण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने जनसंवाद पदयात्रा निघाली आहे. उद्यापासून कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात जनसंवाद पदयात्रेला सुरुवात होत आहे. “यात्रा संवादाची, … Read more

कराडात पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीत हिंदू- मुस्लिम समाज बांधवांचा मोठा निर्णय

Karad Police News 20230915 091608 0000 jpg

कराड प्रतिनिधी | पुसेसावळी येथे दोन गटात झालेल्या राड्यानंतर हिंदू – मुस्लिम या दोन्ही समाज बांधवामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, दोन्ही समाज बांधवांनी कराडात एकत्रित येत शांतता राखण्याचा निर्णय घेतला. आम्ही हिंदू- मुस्लिम समाज शांतताप्रिय असून कोणीही रस्त्यावर उतरणार नाही. तसेच कराड शहरात तसेच कोणत्याही ठिकाणी मोर्चा काढणार नसल्याचे हिंदू व मुस्लिम समाजातील … Read more

72 तासांनी जिल्ह्यातील इंटरनेट सेवा सुरू; पुसेसावळी घटनेतील ‘त्या’ 16 जणांना पोलीस कोठडी

Satara Intarnet News 20230914 094604 0000 jpg

कराड प्रतिनिधी | खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे रविवारी रात्री दोन गटात राडा झाल्यानंतर पोलिस प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद केली होती. ती आज सकाळपासून सुरू केली आहे. सोशल मीडियाचा कोणत्याही स्वरुपाच्या अफवा पसरू नये यासाठी 72 तास इंटरनेट सेवा बंद केल्यामुळे लाखो रुपयांचे ऑनलाईन आर्थिक व्यवहार तसेच कामे ठप्प झाली होती. तर घटनेतील 16 … Read more

पुसेसावळी दंगलीच्या पार्श्वभूमीवर आता ‘या’ ठिकाणी पोलीस अलर्ट मोडवर

Satara Pune News 20230913 115034 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी या ठिकाणी घडलेल्या दंगलीमुळे पोलिस प्रशासन चांगलेच अलर्ट झाले आहे. दरम्यान, पुसेसावळीतील दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अलर्ट मोडवर आहेत. पुणे शहर आणि जिल्ह्यात पुणे पोलिसांकडून सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. आज सकाळपासून पुणे शहर आणि जिल्ह्याभरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन पुणे … Read more