फ्युज बॉक्सचा शॉक लागून दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू

Crime News 20240525 084404 0000

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील बाबरमाची – सदाशिवगड येथे शेतात विहिरी नजीकच्या फ्युज बॉक्सचा शॉक लागून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. सायंकाळी साडे सातनंतर ही घटना घडली. रात्री उशिरा पोलिस घटनास्थळी पोचले. त्याची नोंद घेण्याचे काम सुरू होते. तुकाराम सदाशिव खोचरे (वय ५५) व शहाजी सदाशिव खोचरे (५०) अशी मृत्यू भावांची नावे आहेत. याबाबत घटनास्थळावरून … Read more

डॉ. भारत पाटणकर ‘या’ दिवशी 5 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत करणार पंचगंगा नदीपुलावर ‘रास्तारोको’; नेमकी मागणी काय?

Dr. Bharat Patankar News

कराड प्रतिनिधी । श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी शासनाच्या अन्यायी धोरणाविरोधात थेट आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यांनी महत्वाची मागणी करत थेट कोल्हापूर येथील पंचगंगा नदीच्या पुलावर बुधवार, दि. २९ रोजी सकाळी 11 वाजता आंदोलन करण्याचा इशारा आज कराड येथे पत्रकार परिषदेतून दिला. जलसंपदा विभागाने सहकारी पाणीपुरवठा संस्था व व्यक्तिगत कृषिपंप धारकांना जलमापक … Read more

अखेर 3 महिन्यानंतर ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश; कराड – किरपे एसटी बससेवा सुरू

Karad News 3 2

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील ग्रामीण भागात खासगी गाड्या असल्या तरी देखील अजूनही एसटी बसला पसंती मिळत आहे. मात्र, प्रवाशांच्या कमतरतेमुळे काहीवेळा एसटी बसेसच्या फेऱ्या बंद केल्या जातात. अशाच प्रकार कराड तालुक्यातील किरपे गावात घडला. तीन महिन्यांपासून किरपे गावात एसटी बस फिरकलीच नाही. एसटी नसल्याने गावातील ग्रामस्थ, विद्यार्थ्यांचा दळणवळणाचा प्रश्न देखील निर्माण झाला होता. अखेर … Read more

कराड पोलिसांचा भोंगळ कारभार; 2 व्हीलर चोरीनंतर तरुण बनला डिटेक्टिव्ह, 4 दिवसांत अट्टल गुन्हेगाराला फिल्मी स्टाईल पकडलं

Karad News 2 1

कराड प्रतिनिधी । मागील काही दिवसांपासून कराड शहर आणि परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट पसरला आहे. मोबाईल, दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या असून दिवसा ढवळ्या चोऱ्या होत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. अशात कॉटेज हॉस्पिटल, कराड समोरून दुचाकी चोरीला गेलेल्या एका घटनेतून पोलिसांचा भोंगळ कारभार समोर आला आहे. दुपारी १ वाजता जामिनावर सुटलेल्या एका अट्टल गुन्हेगाराने त्याच … Read more

पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रकमधील CNG गॅसच्या टाकीला गळती

Karad News

कराड प्रतिनिधी । पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराडनजीक मलकापूर हद्दीत कराड खरेदी विक्री संघ इमारतीशेजारी भारती बँक परिसरात सर्व्हिस रस्त्यावर एका सीएनजी गॅस वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील गॅसची अचानक गळती सुरु झाल्याची घटना आज गुरुवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे एकच गोंधळ उडून गेला. दरम्यान, ज्या ठिकाणी सीएनजी गॅस गळतीचा टँकर उभा होता. … Read more

उंच होर्डिंग्ज, प्लेक्स लावलेत आता 3 दिवसात रिपोर्ट दाखल करा; कराड पालिकेची 42 जणांना नोटीस

Karad News 4 1

कराड प्रतिनिधी । मुंबईतील घाटकोपर येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर राज्यातील प्रत्येक महानगरपालिका आणि नगरपालिकांनी खबरदारी घेत शहरातील होर्डिंग्ज, फ्लेक्स, कटआऊट, बोर्ड याविरोधात मोहीम हाती घेतली आहे. साताऱ्यानंतर आता कराड पालिकेने देखील कराडमधील अनाधिकृत फ्लेक्सप्रकरणी कराड होर्डिंग्ज, फ्लेक्स लावणाऱ्या ४२ जणांना सोमवारी नोटीस बजावली आहे. संबंधित इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट तसेच नगरपालिकेची परवानगी सादर करण्याच्या सूचना केल्या … Read more

कराडच्या रेल्वेस्थानकाची विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडून पाहणी; अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना

Karad News 3 1

कराड प्रतिनिधी | कराड येथील रेल्वे स्थानकाचे रुपडे पालटणार असून प्रवाशांच्या आकर्षणाच्या दृष्टीने अनेक उपाययोजना केल्या जाणार आहेत. या ठिकाणी अनेक सोयी सुविधा उभारण्यासाठी विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांनी नुकतीच कराड रेल्वे स्थानकास भेट देत पाहणी केली. यावेळी कराडच्या रेल्वे स्थानकावर कशा प्रकारच्या सुविधा असाव्यात? तसेच इतर कोणत्या बाबी असाव्यात, प्रवाशांना कोणत्या सुविधा आवश्यक … Read more

दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीस अटक; 3 लाख 37 हजाराचा मुद्देमाल जप्त

Karad News 2

कराड प्रतिनिधी । कराड शहर परिसरातील काही ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीच्या मुसक्या कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने आवळल्या आहेत. अटक केलेल्या टोळीत पाच जणांचा समावेश असून त्यातील पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर त्यांच्याकडून ३ गावटी पिस्टल, ४ जिवंत काडतुसे, २ कोयते असा एकूण ३ लाख ३७ हजार ४०० रुपये … Read more

वादळी वाऱ्यासह ‘अवकाळी’नं झोडपलं; शेती पिकांसह घरांचे लाखो रुपयांचे नुकसान

Karad News

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यास वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसामुळे सोमवारी दुपारी चांगलेच झोडपून काढले. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सुसाट्याच्या वाऱ्यासह पावसाळा सुरुवात झाली. यामुळे तासवडे एमआयडीसी येथील बेघर वस्तीसह परिसरात असलेल्या घरावरील पत्रे उडून गेले. यामध्ये याइतजील परिसराचे सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी विद्युत खांबावर वृक्षांच्या फांद्या कोसळल्या तर … Read more

10 लाखांचा गुटखा जप्त; कराड तालुका पोलिसांची धडक कारवाई

Crime News 20240519 145847 0000

कराड प्रतिनिधी | घोगाव (ता. कराड) गावच्या हद्दीत सुमारे १० लाखांच्या गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणारा टेम्पो कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतला. ही कारवाई शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. यावेळी पोलिसांनी टेम्पोसह एकास ताब्यात घेतले आहे. या कारवाईत 9 लाख 64 हजार 900 रुपये किमतीची विमल पान मसाल्याची पोती व चार लाख … Read more

ATM जिलेटीनने फोडण्याच्या तयारीत असणारी 5 जणांची टोळी जेरबंद

Crime News 20240519 140559 0000

कराड प्रतिनिधी | उंब्रज व तळबीड पोलिसांनी कराड तालुक्यातील मसूर येथील एटीएम जिलेटीनने फोडण्याच्या तयारीत असणार्‍या 5 जणांच्या टोळीला शिवडे, ता. कराड गावच्या हद्दीत कृष्णा नदीच्या पुलानजीक सापळा रचून पकडले. या टोळीमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. वैभव राजेंद्र साळुंखे (वय ३३), ओमकार बाळासाहेब साळुंखे (वय २३), आदित्य संतोष जाधव (वय १९, सर्व रा. मोळाचा … Read more

कराडात चोरीस गेलेले 25 मोबाईल हस्तगत; शहर पोलिसांची दमदार कामगिरी

Karad Crime News 20240519 111657 0000

कराड प्रतिनिधी | कराड शहरातील भाजी मंडई, मुख्य बाजारपेठेसह शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेले तब्बल २५ मोबाईल कराड शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने हस्तगत केले. सुमारे ५ लाख २० हजारांचे हे मोबाईल आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक समीर शेख,अपर पोलीस अधीक्षक ऑचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड़ अमोल … Read more