रत्नागिरीतील ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेच्या कार्यक्रमामुळं सातारा जिल्ह्यातील प्रवाशांचे होणार हाल

Karad News 20240820 222703 0000

कराड प्रतिनिधी | रत्नागिरीत होणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमामुळं सातारा जिल्ह्यातील एसटी गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं आहे. अनेक फेऱ्या आणि मुक्कामी गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. साताऱ्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा मेळावा झाल्यानंतर आता रत्नागिरीत कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. लाभार्थी महिलांना कार्यक्रमाला नेण्यासाठी सातारा जिल्ह्यातून एसटी बसेस रत्नागिरीला मागविण्यात … Read more

कोयनेसह जिल्ह्यात मुसळधार पाऊस; कोयना धरणात ‘इतका’ पाणीसाठा

Patan News 12

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पुन्हा पाऊस सुरू झाला असून सोमवार आणि मंगळवारी पाटण तालुक्याला पावसाने झोडपून काढले. आज मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या तालुक्यातील मल्हारपेठ, निसरे भागात पावसाने चांगली हजेरी लावली. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे कोयना धरणात पाण्याचीही आवक सुरू झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा 90.89 टीएमसीवर गेला आहे. सातारा … Read more

केंद्रीय मंत्री जे. पी.नड्डांसह उपमुख्यमंत्री फडणवीस गुरुवारी कराडात; विंगात भाजपचा होणार भव्य जनसंवाद मेळावा

Karad News 38

कराड प्रतिनिधी । भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री जे. पी. नड्डा गुरुवारी, दि. २२ रोजी कराड दौऱ्यावर येत आहेत. यानिमित्त त्यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी दुपारी ३ वाजता कराड तालुक्यातील विंग येथील आदर्श विद्यामंदिरच्या पटांगणावर भव्य जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी जे. पी. नड्डा यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read more

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीतर्फे अंकलजी सोनवणे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

Karad News 37

कराड प्रतिनिधी । साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती, महाराष्ट्र राज्य (कराड) या संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते यादवराव तथा अंकलजी सोनवणे (पुणे) यांना जाहीर करण्यात आला आहे. दि. २५ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी २ वाजता यशवंतराव चव्हाण स्मृती सदन (टाऊन हॉल) येथे पुरस्काराचे वितरण केले जाणार असल्याची माहिती समितीचे संस्थापक निमंत्रक प्रकाश … Read more

आरेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात एक शेळी 3 बकऱ्या ठार

Karad News 36

कराड प्रतिनिधी । जनावरांच्या गोठ्यातील पत्रा उचकटून एक शेळी व तीन बकरी बिबट्याने ठार केल्याची घटना कराड तालुक्यातील आरेवाडी येथील गुरवकी बेंद शिवारात घडली. या घटनेमुळे आरेवाडी परिसरात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील आरेवाडी येथील शेत शिवारात अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावरत असल्याचे शेतकऱ्यांनी पाहिले होते. दरम्यान, काल आरेवाडीतील … Read more

आ. पृथ्वीराज चव्हाणांच्या माध्यमातून कराड दक्षिणेतील 22 किलोमीटर रस्त्यांना दर्जोन्नती

Karad News 35

कराड प्रतिनिधी । कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विकासाचे मार्ग भक्कम करणारे नेतृत्व अशी ओळख असणाऱ्या आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून मतदारसंघातील २२ किलोमीटर अंतराच्या रस्त्यांना दर्जोन्नती मिळाली आहे. आ. चव्हाण यांनी विकासाचे हे आणखी एक पाऊल उचलले असल्याने त्यांच्या कार्याबद्दल कौतुक होत आहे. आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दि. १४ फेब्रुवारी २०२३ रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य … Read more

रेल्वे मार्गाच्या बाजूने रस्ता द्या, अन्यथा रेलरोको; ‘रयत क्रांती’चा पोलिसांना निवेदनाद्वारे इशारा

Karad News 34

कराड प्रतिनिधी । रेल्वेलाईनच्या दुहेरीकरणानंतर रेल्वे मार्गाच्या बाजूने शेतकऱ्यांसाठी रस्ता करून देण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र रेल्वे प्रशासनाने रस्ता केला नसल्याने शेतकऱ्यांना शेतमालाची ने- आण करण्यात अडचण येत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने रेल्वे मार्गाच्या बाजूने शेतकऱ्यांसाठी रस्ता करावा; अन्यथा रेलरोको करण्याचा इशारा रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे … Read more

पृथ्वीराज चव्हाणांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र; ‘मंकीपॉक्स’बाबत केली ‘ही’ मागणी

Karad News 20240819 151122 0000 scaled

कराड प्रतिनिधी | जगभरात प्रादुर्भाव वाढणाऱ्या ‘मंकीपॉक्स’च्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. ‘मंकीपॉक्स’ विषाणू जगभरात पसरत आहे. तो आपल्या शेजारील देशात पोहोचला आहे. त्यामुळे संसर्गीत देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबई विमानतळावर कठोर चाचणी आणि विलगीकरण प्रोटोकॉल लागू करावेत, अशी मागणी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज … Read more

कराड पोलिसांची वाहतूक शाखा ‘ॲक्शन मोड’वर; अडथळा ठरणारे फलक हटवले

Karad News 20240819 132243 0000 scaled

कराड प्रतिनिधी | कराड शहरात रविवारी कराड शहर वाहतूक शाखा पोलीसांच्या वतीने अतिक्रमणाची धडक कारवाई करण्यात आली. यावेळी शहरातील बाजारपेठेसह दत्त चौक ते चावडी चौक, बसस्थानक परिसर या भागात अनेक व्यावसायिकांनी दुकानांच्या जाहिरातीचे अवाढव्य असे उभे केलेले फलक पोलिसांनी संपूर्ण शहरात पाहणी करून हटविले. सणासुदीचा काळ असून शहरात दत्त चौक ते चावडी चौक, चावडी चौक … Read more

जिल्ह्यासह सातारा शहराला पावसाने झोडपले; सर्वत्र पाणीच पाणी

Satara News 20240818 152850 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा दिवसाच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर शनिवारी सायंकाळी पावसाचे जोरदार पुनरागमन झाले. काल आणि आज सातारा शहर व परिसरास ढगफुटीसदृश पावसाने झोडपून काढले.शनिवारी रात्री सोसाट्याचा वारा व विजांच्या कडकडाटात सुमारे तासभर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. जावली तालुक्यातही ठिकठिकाणी पावसाने थैमान घातले. गेल्या काही दिवसांपासून … Read more

लाडकी बहीण योजनेच्या मुदतीची अट काढून टाका; माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाणांची मुख्यमंत्री शिंदेकडे मागणी

Karad News 20240818 142436 0000

कराड प्रतिनिधी | शासनाची मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा सर्व्हर वारंवार बंद असल्याने योजनेमध्ये नोंदणीला विलंब होत असून काही ठिकाणी नोंदणीच होत नसल्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत. ६-६ तास ओटीपी येत नाही. त्यामूळे लाभार्थीना दिवस-दिवसभर आधार केंद्रात ताटकळत बसावे लागत आहे. त्यामुळे अंतिम तारखेपर्यंत नाव नोंदणी होऊ शकणार नाही ही चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे या … Read more

मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान कार्यक्रमासाठी 400 एसटी गाड्यांच बुकींग, शासकीय अधिकाऱ्यांना लावलं कामाला

Satara News 20240818 123652 0000

सातारा प्रतिनिधी | साताऱ्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान सोहळ्याला नेण्यासाठी शिंदे सरकारनं ४०० एसटी बसेस बुक केल्या आहेत. या गाड्या भरण्यासाठी गावोगावच्या तलाठी, ग्रामसेवकाना, कामाला लावल आहे. सकाळी ८ वाजता बसेस गावांमध्ये उभ्या करण्यात आल्या आहेत. मात्र, तीन तास झाले तरी गाड्या निम्म्याही भरलेल्या नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय. कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविकांनाही सक्ती मोठ्या गावांमध्ये प्रत्येकी … Read more