अवघ्या पाच दिवसात गुन्हा उघड, दोघांना अटक

Crime News 20240302 080125 0000 jpg

कराड प्रतिनिधी | मृताची ओळख पटण्यापुर्वीच खुनाच्या गुन्ह्याची उकल करण्यात कराड शहर पोलिसांना यश आले आहे. डीवायएसपी अमोल ठाकूर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील या़च्या मार्गदर्शनाखाली तपास करून या गुन्ह्यात दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. शकील अन्वर शेख (वय 20, रा. दैत्यनिवारणों मंदीर कराड) आणि कृष्णा लक्ष्मण पुजारी (वय 2, रा. मुजावर कॉलनी, … Read more

कराडच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून 3 अल्पवयीन मुले ताब्यात; दीड लाख रूपये किमतीच्या 3 दुचाकी हस्तगत

Karad News 56 jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुका गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास कराड तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दहा दिवसांपूर्वी चोरलेल्या तीन दुचाकी चोरट्यास अटक करण्यात यश आले आहे. पथकाने तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या तीन दुचाकी हस्तगत केल्या आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कराड तालुका पोलीस ठाणे हद्दीत गेल्या … Read more

कराड ST आगाराच्या वर्कशॉपमध्ये दुरूस्तीसाठी लागलीय गाड्यांची रांग, प्रवाशांचे हाल

Karad News 55 jpg

कराड प्रतिनिधी । स्वच्छ, सुंदर बसस्थानक स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत राज्यात अव्वल आलेल्या कराड आगाराने स्वच्छतेत चांगलीच सुधारणा केली आहे. मात्र, नादुरूस्त गाड्यांमुळे ग्रामीण प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. कोणत्या ना कोणत्या रस्त्याला एसटी बंद पडल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच आगाराच्या वर्कशॉपमध्ये दुरूस्तीसाठी गाड्यांची रांग लागल्याचे दिसून येत आहे. भंगार झालेल्या गाड्यांना चालक-वाहक देखील कंटाळले आहेत. … Read more

कोयना नदीत बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह तिसऱ्या दिवशी सापडला

Karad News 54 jpg

कराड प्रतिनिधी । कोयना नदीतील आगाशिवनगर हद्दीतील पाणीपुरवठा योजनेच्या जॕकवेल जवळ जाधव पानवठ्यावर पार्टीसाठी गेलेला एक इसम कोयना नदीपात्रात बुडल्याची घटना बुधवारी (दि. २८) ही घटना घडली होती. या बुडालेल्या इसमाच्या मृतदेह शोधण्याचे काम पोलिसांकडून केले जात होते. दरम्यान, शुक्रवारी दुपारच्या सुमारास संबंधित इसमाचा मृतदेह पाणीपुरवठा योजनेच्या जॕकवेल जवळच नदीपात्रात तरंगताना आढळून आला. दादासाहेब आर्जून … Read more

कराडात चित्रा वाघ कडाडल्या, संदेशखालीतील घटनेचा निषेध करत ठाकरेंसह राठोडांवर साधला निशाणा

Karad News 53 jpg

कराड प्रतिनिधी । आज संपुर्ण राज्यभरात भाजप पदाधिकाऱ्यांकडून संदेशखालीतल्या महिला अत्याचाराच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येत आहे. याला पाठिंबा म्हणून आज कराड भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने येथील कोल्हापूर नाक्यावर महात्मा गांधी यांच्या पुतळा परिसरात आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पश्चिम बंगालची भूमी महिलांसाठी चालता-बोलता नरक बनलीय. या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी ममता बॅनर्जींसारखी … Read more

सातारा लोकसभा निवडणुकीसाठी कराड तालुक्यातील मराठा समाजबांधवांचा निर्धार

Karad News 20240301 094116 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील मराठा समाज बांधवांची गुरूवारी सायंकाळी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मराठा बांधवांच्या वतीने महत्वाचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, सगेसोयर्‍यांबाबत अध्यादेश काढण्याचे आश्वासन देऊन शासनाने मराठा समाजाची फसवणूकच केली असल्याची संतप्त भावना कराडमधील मराठा समाज बांधवांनी व्यक्त केली आहे. सत्ताधार्‍यांसह विरोधकांना धडा शिकवण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावातून एक ते दोन उमेदवारी … Read more

सरस्वती विद्यालयात मराठी राजभाषा दिनानिमित्त पार पडला मराठी भाषा समृद्धीसाठी अनोखा उपक्रम

Karad News 51 jpg

कराड प्रतिनिधी । कराड येथील जनकल्याण प्रतिष्ठान संचालित सरस्वती विद्यामंदिर व विद्यालयात मंगळवारी मराठी राजभाषा दिनानिमित्त मराठी राजभाषा सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत प्रतिसाद दर्शविला. यावेळी सुरुवातीला विद्यार्थ्यांना म्हणी पाठांतर स्पर्धेअंतर्गत विशेष अशा निवडक 100 म्हणी देण्यात आल्या व त्यांच्या … Read more

प्राथमिक सहकारी सोसायटी हा सहकारचा मुख्य पाया – ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर

Karad News 50 jpg

कराड प्रतिनिधी | सहकारी तत्वावर कार्यरत असणाऱ्या प्राथमिक सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातून शेतीच्या अर्थकारणाला मोठी चालना मिळाली आहे. त्यामुळे प्राथमिक सहकारी सोसायटी हा सहकारचा मुख्य पाया असल्याचे प्रतिपादन ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी केले. कापील विकास सेवा सोसायटीच्या शताब्दी पूर्ती निमित्त सभासदांना भेटवस्तू, वाहन वितरण आणि ज्येष्ठ सभासदांचा सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी खरेदी विक्री संघाचे … Read more

कराड उत्तरचे आमदार बाळासाहेबांनी थेट अधिवेशनातच सरकारला विचारला प्रश्न

Karad News 49 jpg

कराड प्रतिनिधी । राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) आज दुसऱ्या दिवशी खा. शरद पवार गटाचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी एक महत्वाचा प्रश्न उपस्थित करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. “सहकार कायदा आणण्यामागे सरकारचा काय उद्देश आहे? असा सवाल थेट अधिवेशनात आमदार पाटील यांनी उपस्थित केला. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या पार पडत आहे. अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक … Read more

जिल्ह्यातील ‘या’ 2 गावांनी मिळवले ग्रामस्वच्छता अभियानात नावलौकिक

Karad News 20240227 121926 0000 jpg

कराड प्रतिनिधी | संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्हयातील पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी आणि कराडमधील बनवडीची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या गावांचा पुरस्कार वितरण सोहळा दि. ५ मार्च रोजी होणार आहे. जिल्हा परिषदेचा राज्यस्तर तसेच दिल्लीतही गाैरव झाला आहे. आताही सातारा जिल्ह्याने स्वच्छतेची परंपरा कायम राखत याहीवर्षी राज्यात पुरस्कार पटकावला आहे. तर संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान … Read more

खंडणीसाठी ठार मारण्याची धमकी; गुंडावर गुन्हा दाखल

Crime News 20240227 042623 0000 jpg

कराड प्रतिनिधी | खंडणीची मागणी करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका गुंडावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विजय तुकाराम खडतरे (रा. गाय मंदिराजवळ, कार्वेनाका, कन्हाड) या युवकाने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मयूर मार्क फर्नाडिस (रा. दत्त बकुळा कॉलनी, गाय मंदिराजवळ, कार्वे नाका) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. … Read more

खा. श्रीनिवास पाटलांनी लावली कराड रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती

Karad News 48 jpg

कराड प्रतिनिधी । कराडसह लोणंद रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामाचे भूमिपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पार पडला. यावेळी कराड येथे रेल्वे स्टेशनवरती झालेल्या या कार्यक्रमास आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते तथा सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी उपस्थिती लावली. “रेल्वेच्या विकासकामांमुळे जिल्ह्याच्या विकासात भर पडणार असून … Read more