कराडकरांनो पाणी पिताना सावधान; दूषित पाणी पुरवठ्याबाबत पालिकेनं केलं महत्वाचं आवाहन

Karad News 11

कराड प्रतिनिधी । सध्या पावसाळा सुरुवात झाली असून पावसाळ्यात सर्वात महत्वाचा विषय हा दूषित पाण्याचा असतो. कारण या दूषित पाण्यामुळे नागरिकांना अनेक आजार होतात. या आजारापासून कराडकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी कराड शहरात पालिकेने पावसाळा पूर्व उपाययोजनांची कामे हाती घेतली असली तरी नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. या पार्श्वभूमीवर कराड पालिकेडून शहरातील नागरिकांना महत्वाचे आवाहन करण्यात … Read more

कराडच्या मार्केटयार्ड रस्त्यावर ट्रकखाली सापडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Karad News 10

कराड प्रतिनिधी । कराड-तासगाव मार्गावर कार्वे नाका हद्दीत एका मालट्रकखाली सापडून दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी 3.15 वाजण्याच्या सुमारास घडली. शशिकांत प्रकाश माळी ( वय 55, रा. काले, ता. कराड असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. अपघातात ठार झालेले शशिकांत माळी हे आत्माराम विद्यालय, ओगलेवाडी येथे शिक्षक होते. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, … Read more

कराड तहसीलदारांच्या कारभाराची चौकशी करा; ‘जिल्हा विश्व इंडियन’ च्या सदस्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न उपोषण

Satara News 55

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यात होणाऱ्या बेकायदेशीर गौणखनिज उत्खननास शासकीय वरदहस्त असून, याप्रकरणी कराडच्या तहसीलदारांच्या कारभाराची चौकशी करावी, या मागणीसाठी सोमवारी जिल्हा विश्व इंडियन पार्टीच्या सदस्य व कराड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्रमक पावित्रा घेतला. त्यांनी थेट सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न होऊन उपोषण करत आंदोलनास सुरुवात केली. यावेळी जिल्हा विश्व इंडियन पार्टीचे सदस्य काकासाहेब चव्हाण, … Read more

हरवलेले 4 लाखांचे मोबाईल कराड तालुका पोलिसांनी मूळ मालकांना केले परत

Karad News 20240611 091818 0000

कराड प्रतिनिधी | कराड तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतून गेल्या काही दिवसांपूर्वी मोबाईल फोन चोरीस गेल्याच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी तक्रारी प्राप्त झाल्यानंतर गहाळ झालेले सुमारे 4 लाख रुपये किमतीचे 15 मोबाईल शोधण्यात तालुका पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले. त्यांनी शोधून काढलेले मोबाईल पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या हस्ते सोमवारी मूळ मालकांकडे सुपूर्द करण्यात आले. … Read more

कराडात भर रस्त्यात महामंडळाची ‘एसटी’ पडली बंद; तासभर वाहतूक कोंडीने नागरिक झाले हैराण

Karad News 4

कराड प्रतिनिधी । राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेसचा वापर किती वर्षे करायचा? याची मर्यादा निश्चित आहे. नवीन बस १५ वर्षे वापरता येते तर १५ वर्षांनंतर ती बस वापरातून बाजूला काढली जाते. कराड बसस्थानकात असलेल्या काही बसेस १२ वर्षांहून अधिक काळ झाल्याने त्या आरटीओकडून रिपासिंग करून वापरण्यात येत आहेत. त्यामुळे एसटी बस प्रवासातच बंद … Read more

वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातून एकाच रात्री तब्बल सहा मोबाईल लंपास

Karad News 9

कराड प्रतिनिधी । कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात एकाच रात्री तब्बल सहा मोबाईल चोरीस तर एका महिलेचे मंगळसूत्र लंपास करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्या घटनेमुळे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या व त्यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. उपजिल्हा वेणूताई चव्हाण बाह्य रुग्णालयात कराडसह इतर तालुक्यातून अनेक रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. गोरगरीब लोकांसाठी वरदान ठरणाऱ्या … Read more

कराड नगरपालिकेच्या जलतरण तलावात बुडून एकाचा मृत्यू

Karad News 20240610 072323 0000

कराड प्रतिनिधी | कराड नगरपरिषदेच्या वतीने शहर तसेच परिसरात राहणाऱ्या नागरिकांना पोहण्यासाठी जलतरण तलाव बांधण्यात आला आहे. कृष्णा नाक्याशेजारी असणाऱ्या या जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या एकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. शेखर दुंडाप्पा कोले (वय ४२, मूळ रा. उत्तूर, ता. आजरा, जि. कोल्हापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, … Read more

Khodshi Dam : कराडजवळचे ब्रिटिशकालीन खोडशी धरण झाले ओव्हरफ्लो

Khodshi Dam News

कराड प्रतिनिधी । गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असून ओढे- नाले पूर्णक्षमतेने भरून वाहू लागले आहेत. दरम्यान, कराड-पाटण तालुक्यातही दोन दिवसात पावसाने चांगली हजेरी लावली असून कराडजवळ असलेल्या कृष्णा नदीवरील (Krishna River) ब्रिटिशकालीन खोडशी धरण (Khodshi Dam) पूर्ण क्षमतेने भरले आहे. सध्या धरणाच्या सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ … Read more

युवकास पाठलाग करून मारहाण; अनोळखी सहा जणांवर गुन्हा दाखल

Crime News 20240609 083250 0000

कराड प्रतिनिधी | गोटखिंडी, जि.सांगली येथील बहिणीकडुन जेवण करुन कार्वेतील घरी निघालेल्या युवकास स्विफ्ट कारमधुन आलेल्या सहाजणांनी पाठलाग करुन मारहाण करत जखमी केल्याची घटना शुक्रवारी रात्री कराड तालुक्यातील गोंदी गावच्या हद्दीत घडली. मारहाण प्रकरणी पोलिसांनी संबंधित अनोळखी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी संकेत सुरेश मंडले (वय २५. रा. … Read more

हाताच्या ठश्याने रेशन घ्यायचे विसरा, आता डोळे स्कॅन केल्याने मिळणार रेशन!

Satara News 44

कराड प्रतिनिधी । रेशन दुकानातून धान्य घेताना बोटांचे ठसे ई-पॉस मशीनवर येत नाहीत म्हणून रेशन धान्य दुकानातून रिकाम्या हाताने लाभार्थ्यांना परत जावे लागते. मात्र, आता प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात ‘आय स्कॅनर गन’ असणार आहे. जिल्हा पुरवठा विभागाकडून आधुनिक यंत्रसामग्रीची मागणी करण्यात आली होती. ही यंत्रे पुरवठा विभागाला प्राप्त झाली आहेत. जिल्ह्यातील सुमारे १ हजार ७१२ … Read more

आधारकार्ड संदर्भात महत्वाची माहिती : बालकांचे 5, तर मोठ्यांचे 10 वर्षांनंतर आधारकार्ड अपडेट करणे अनिवार्य

Satara News 31

कराड प्रतिनिधी । सध्या आधारकार्ड हे सर्वांत महत्त्वपूर्ण ओळखपत्र म्हणून मानले जाते. इतर कोणत्याही कागदपत्रासाठी आता आधारकार्डची गरज हमखास भासतेच. अलीकडे बाळाचेही जन्मजात आधारकार्ड काढले जाते. अनेक पालक मुलांचे आधार कार्ड काढतात. मात्र, मुलांचे आधारकार्ड पाच वर्षांनी अपडेट करायला हवे. तसेच मोठ्यांचेही आधार कार्ड दर दहा वर्षांनी अपडेट करणे गरजेचे असल्याची गोष्ट माहिती असणे आवश्यक … Read more

फाऊंड्री कारखान्यातील चोरीप्रकरणी सहा जणांना अटक, दीड लाखाच्या बेअरिंग प्लेटा जप्त

Karad News 8

कराड प्रतिनिधी | ओगलेवाडी पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीतील विरखडे, ता. कराड येथील फाऊंड्री कारखान्यातून दीड लाखाच्या पितळी बेअरींग प्लेटा चोरणाऱ्या सहा जणांना कराड शहर पोलिसांनी अटक केली आहे. भरवस्तीत झालेला घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. सुमारे दोन महिन्यांनी संशयितांना पकडण्यात पोलिसांना यश आले. राजेश ऊर्फ नितीन बबन चव्हाण, अभिजीत विजय मदने, अभिजीत उत्तम तीरमारे, … Read more