जिल्ह्यातील ‘या’ नगरपंचायतीच्या तत्कालीन मुख्याधिकारी विरोधात चौकशीचा आदेश

Medha News

सातारा प्रतिनिधी | स्वच्छता अभियानात झालेल्या भ्रष्ट्राचार प्रकरणी सातारा जिल्ह्यातील मेढा नगरपंचायतीचे तत्कालीन मुख्याधिकारी महेश गायकवाड यांच्या चौकशीचा आदेश नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांनी दिला आहे. याप्रकरणी जिल्हा प्रशासनाधिकार्‍यांना सात दिवसांत अहवाल पाठवावा, असे या आदेशात म्हटले आहे. याबाबत गायकवाड यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली होती. स्वच्छता अभियानात मेढा नगरपंचायतीने तीन महिन्यांसाठी भाडेतत्त्वावर बलून घेतला होता. हा … Read more

एकनाथ शिंदेंच्या गावाशेजारील मुनावळे जलपर्यटनस्थळी बोटीतून 100 टक्के मतदानाचा संदेश

Munawale News 20240425 054053 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीत १०० टक्के मतदान होण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. अशाचप्रकारे जावळी तालुक्यातील मुनावळे या जलपर्यटनस्थळीही प्रशासनाने बोटींचा वापर करुन निवडणुकीची ७ मे ही तारीख आणि १०० टक्के मतदान करणारच अशा संदेशाचा अभिनव उपक्रम राबवून पर्यटक तसेच नागरिकांत जागृती करण्याचे महत्वपूर्ण काम केले. सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होत … Read more

सातारा जिल्ह्यात वाई, जावळी तालुक्याला अवकाळीने झोडपले

Wai News 20240422 211452 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्याने उकाड्याने घामाघूम होण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. असे असतानाच सोमवारी दुपारनंतर वाई आणि जावळी तालुक्यात काही ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस झाला. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. तर या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सोमवारी तर दुपारी अडीचच्या सुमारास … Read more

स्पीड बोट उलटल्याने शिवसागर जलाशयात बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडला, तीन दिवस सुरू होता शोध

Koyna News 20240421 161717 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात गुरुवारी वादळामुळे स्पीड बोट उलटल्याने एकजण बुडाला होता. त्याचा मृतदेह रविवारी पाण्यावय तरंगताना आढळून आला. गजेंद्र राजपुरे, असे मृताचे नाव आहे. कायदेशीर सोपस्कार पार पाडून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी की, तेटली (ता.जावली) हद्दीत शिवसागर जलाशयात टी अँड टी कंपनीची स्पीड बोट वादळी वाऱ्याने … Read more

जावळीत शेतजमिनीच्या रस्त्यावरून 5 जणांवर गुन्हा दाखल

Crime News 20240403 110940 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | शेतजमिनीत रस्ता खुला करण्याच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी जावळी तालुका धनकवडी येथील पाच जणांवर मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जावळी तालुक्यातील धनकवडी येथील जमीन गट नं. ५०/८ या क्षेत्रामध्ये जाणे – येणेकरिता रस्ता खुला करण्याचे काम सुरू होते. त्यासाठी पोलिस संरक्षण पुरवण्यात आले होते. त्यानुसार मेढा … Read more

मेढ्यातील 4 जणांची टोळी 2 वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार

Crime News 20240330 113053 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | मेढा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने गुन्हे करणार्‍या टोळी प्रमुखास तिघा जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. प्रेम उर्फ बबलू विलास पार्टे (वय 24), गणेश विष्णू शिंदे (वय 23), सनी विकास कासुर्डे (वय 22) आणि राहुल रामा कुर्‍हाडे (वय 25, सर्व रा. मेढा, ता. जावळी) अशी टोळीतील आरोपींची नावे आहेत. या चौघांना सातारा … Read more

पुण्यातील PMT च्या बसचालकाची जावळीच्या सोनगावात आत्महत्या

Jawali News jpg

सातारा प्रतिनिधी । पुण्यातील पीएमटीचे बसचालक अभिजित तानाजी शिंदे (वय ३६, रा. सोनगाव, ता. जावळी, जि. सातारा) यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवार, दि. २५ रोजी दुपारी एक वाजता सोनगाव, ता. जावळी येथे घडली. दरम्यान, त्यांनी कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे अद्याप समोर आले नाही याबाबत मेढा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, … Read more

जावळी तालुक्यात बिबट्याकडून 3 कुत्र्यांचा फाडशा

Leopard News 20240326 122212 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | मालचौंडी ता. जावली आणि परिसरात बिबट्या आणि त्याच्या दोन पिल्लांचा रात्रीच्या सुमारास गावातून मुक्त संचार असल्याचे दिसून आले आहे. या बिबट्याने आतापर्यंत गावातील तीन पाळीव कुत्र्यांचा फाडशा पाडला असून विभागात भितीचे आहे तर बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी जनतेतून होत आहे. बिबटयाच्या मुक्त संचारा दरम्यान बिबट्याने हल्ला केलेली तिन्ही पाळीव कुत्रे मृत्युमुखी पडलेली … Read more

जिल्ह्यातील देशातील पहिलया गोड्या पाण्यातील जलपर्यटना लगत आहे ‘हे’ थंड हवेचे ठिकाण

Satara News 74 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात पर्यटनाची अनेक ठिकाणी आहेत. महाबळेश्वर, पाचगणी, कोयना अशी एकाहून एक पर्यटन केंद्र असणाऱ्या या जिल्ह्यात आता पर्यटनाचा वेगळा आनंद पर्यटकांना घेता येणार आहे. तो म्हणजे गोड्या पाण्यातील जल पर्यटनाचा होय. गोड्या पाण्यातील देशातील पहिले जलपर्यटन जिल्ह्यातील कोयना जलाशयातील मुनावळे येथे आजपासून सुरु करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत … Read more

जल पर्यटन प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगारास प्राधान्य : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Satara News 71 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मुनावळे येथे कोयना जलाशय (शिव सागर) तीर येथे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास महामंडळाच्या कोयना जल पर्यटन शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी “कोयना जल पर्यटन केंद्र हे देशातील गोड्या पाण्यातील सर्वात मोठे जल पर्यटन केंद्र आहे. या माध्यमातून पर्यावरण पूरक विकास आणि स्थानिकांना रोजगार या … Read more

महू-हातगेघर धरणग्रस्तांचे प्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले अधिकाऱ्यांना आदेश

Satara News 2024 02 28T164855.321 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील महत्वाचा प्रकल्प असलेल्या जावळी तालुक्यातील कुडाळी प्रकल्पांतर्गत महू – हातगेघर धरणग्रस्तांचे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या प्रश्नी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या दालनात आज मुख्यमंत्र्यांचे समन्वयक मिलिंद शिंदे यांच्यासमवेत धरणग्रस्तांची बैठक पार पडली. या बैठकीत गेली २७ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या धरणाचे बांधकाम ९५ टक्के झाले, मात्र धरणग्रस्तांचे पुनर्वसन करणे शिल्लक … Read more

मुनावळेतील जलपर्यटन प्रकल्पासाठी सामंजस्य करार अंतिम टप्प्यात

SATARA NEWS 20240224 112330 0000 jpg

सातारा प्रतिनिधी । जावळी तालुक्यातील मुनावळे येथे जलपर्यटन प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळ आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यात द्विपक्षीय सामंजस्य करार अंतिम टप्प्यात आला आहे. त्यातून कोयना धरणाच्या शिवसागर जलाशय परिसरात पर्यटन वाढीला चालना देणारा अभिनव प्रकल्प प्रत्यक्षात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सूचनेनुसार शुक्रवारी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मंत्रालयातील त्यांच्या … Read more