जिल्हा परिषदेच्या ‘स्वच्छ माझे अंगण’ अभियानास सुरुवात; निवड झालेल्या आदर्श कुटुंबांचा प्रजासत्ताकदिनी गौरव

0
1

सातारा प्रतिनिधी । स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत ‘स्वच्छ माझे अंगण अभियानास १ जानेवारीपासून जिल्ह्यामध्ये राबविण्यास सुरुवात झाली आहे. या आबाहीयानाच्या माध्यमातून लोकांत स्वच्छतेविषयी जागृती होण्यास मोठी मदत होणार आहे तर या अभियानात स्वच्छतेचा आदर्श ठरणाऱ्या कुटुंबांना २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे.

सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ‘स्वच्छ माझे अंगण’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात प्रत्येक कुटुंबाने स्वच्छतेच्या नियमांचे पालन तसेच वैयक्तिक शौचालयाचा नियमित वापर करणे, घरगुती कचऱ्याचे वर्गीकरण आणि पुनर्वापर, कंपोस्ट खत तयार करणे, परसबाग निर्मिती करणे अभिप्रेत आहे.

अभियानाची ‘ही’ आहेत मुख्य उद्दिष्ट

घरातील कचरा व्यवस्थापन सांडपाणी व्यवस्थापनाच्या नियमांचे पालन करावे. यासाठी तालुका स्तरावरील गटविकास अधिकारी तसेच विस्तार अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य महिला बचत गटांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा, परसबाग निर्मिती करणे, सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डा व पाझर खड्ड्यांचा वापर करणे, त्यासोबत गावातील इतर कुटुंबांना प्रोत्साहित करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.

अभियानातील महत्वाची निक्षे कोणती?

या अभियानामध्ये कुटुंब निवडण्यासाठी कुटुंबाकडे घरगुतीह खतखड्डा किंवा परसबाग आवश्यक आहे. वैयक्तिक शोषखड्डा किंवा पाझर खड्डा असावा, स्वतःचे वैयक्तिक शौचालय व नियमित वापर आवश्यक, कुटुंबस्तरावर ओला आणि सुका कचरा वर्गीकरणाची सुविधा आवश्यक आहेत. या निकषांच्या आधारे गावस्तरावर उत्कृष्ट कुटुंबांची निवड करून त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

अभियान अंमलबजावणी कालावधी – १ ते २० जानेवारी
उत्कृष्ट कुटुंब पडताळणी कालावधी – २१ ते २४ जानेवारी
प्रशस्तिपत्रक देऊन सन्मान – २६ जानेवारी