अंतिम मतदार यादीमध्ये नावे वाढविण्याची निरंतर मोहीम सुरू राहणार : सुधाकर भोसले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 262 सातारा विधानसभा मतदार संघातील मतदार यादी पुर्ननिरिक्षण कार्यक्रमाप्रमाणे युवक/युवती, तृतीय पंथी, नवविवाहिता यांच्या नावांचा समावेश, मयत अथवा स्थलांतरितांच्या नावांची वगळणी आणि अन्य आवश्यक दुरुस्त्यांसह अद्ययावत करणेबाबतची मोहिम राबवून तयार झालेली मतदार यादी मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान या यादीत नावे वाढविण्याची निरंतर मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी दिली.

सातारा येथे मतदार नोंदणी अधिकारी भोसले याच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक पार पडली. यावेळी नायब तहसिलदार विजयकुमार धायगुडे, मतदार संघातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सातारा तालुक्यातील निवडणुक साक्षरता क्लबचे सर्व नोडल अधिकारी व महाविदयालयाचे प्राचार्य, तसेच विविध प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी मतदार नोंदणी अधिकारी भोसले यांनी महत्वाची माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, 262 सातारा विधानसभा मतदार संघातील नवमतदार नोंदणीसाठी विशेष शिबीरे आयोजीत करण्यात आलेली होती. त्या शिबीरामध्ये भटक्या विमुक्त जमातीमधील एकूण 160 मतदार, दिव्यांग 13 मतदार, देह व्यापार करणा-या 6 महिला मतदार व तृतीय पंथी 4 मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. सातारा तालुक्यातील सर्वच महाविदयालयांमध्ये मतदार नोंदणी कॅम्प आयोजीत केलेले आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 262 सातारा विधानसभा मतदार संघातील मतदार यादी पुर्ननिरिक्षण कार्यक्रमानुसार दि. 27/10/2023 पासुन वय 18-19 मधील 3318 मतदार व वय वर्षे 20-29 मधील 2929 इतक्या मतदारांची नोंदणी करण्यात आलेली आहे.

सन 2022 विशेष संक्षिप्त पुनरिक्षण मोहिम + निरंतर मोहिमेमध्ये 15406, सन 2023 विशेष संक्षिप्त पुनरिक्षण मोहिम + निरंतर मोहिमेमध्ये 8546, तसेच 2024 विशेष संक्षिप्त पुनरिक्षण मोहिमेमध्ये – 9707 असे एकुण एकंदर 33659 नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आलेली आहे. सन 2022 विशेष संक्षिप्त पुनरिक्षण मोहिम + निरंतर मोहिमेमध्ये 24013, सन 2023 विशेष संक्षिप्त पुनरिक्षण मोहिम + निरंतर मोहिमेमध्ये 3785, तसेच 2024 विशेष संक्षिप्त पुनरिक्षण मोहिमेमध्ये फोटो सिमीलर एंन्ट्री (PSE) एकुण 3605 होत्या त्यांची संपूर्ण पडताळणी करुन पडताळणी अंती एकुण 984 मतदार यांची वगळणी करण्यात आली. तसेच डेमोग्राफीकल सिमीलर एंन्ट्री (DSE) एकुण 1691 होत्या त्यांची संपूर्ण पडताळणी करुन पडताळणी अंती एकुण 344 मतदार असे 15702 मतदारांची वगळणी असे एकुण एकंदर 43500 मतदारांची वगळणी करण्यात आलेली आहे.

सन 2024 हे निवडणुकीचे वर्ष असुन निवडणुकीपूर्वी मतदार यादी ही शुध्द व अचुक असणे हे महत्वाचे असते त्याअनुशंगान सन 2022, 2023 व 2024 मध्ये विशेष संक्षिप्त पुनरिक्षण मोहिम तसेच निरंतर मोहिम घेणे हे महत्त्वाचे असते. त्या या मतदार संघामध्ये सदरच्या मोहिमा यशस्वीपणे राबविणेत आलेल्‍या आहेत, त्यामुळे सर्व नागरिकांनी त्यांची नावे मतदार यादीत असल्याचे निश्चित करण्यासाठी सतर्क राहिले पाहिजे. मतदार यांदीमध्ये नांवे वाढविणे बाबत दि. 23 जानेवारीपासून निरंतर मोहीम सुरू राहणार असुन ते अजुनही आपल्या नावाची नोंद करु शकत असल्याचे उपस्थितास सांगीतले. नागरिकांनी मतदार यादीत आपली नावे तपासावीत आणि नावे नसल्यास त्यांनी नमुना 6 क्रमांकाचा फॉर्म भरावा.

त्यांनी http://voters.eci.gov.in या ऑनलाइन लिंक्स आणि Voter Helpline App चा वापर करावा त्यामध्ये त्यांची नावे तसेच मतदान केंद्र तपासता येईल. महाविद्यालयीन विद्यार्थी आणि महाविद्यालय प्रशासन यांना आवाहन केले की, मतदार यादीत नसलेल्या सर्व विद्यार्थ्यांची नावनोंदणी करण्यात यावी आणि त्यांच्या नोंदणीची सोय करावी. राजकीय पक्षांनी BLA नियुक्त करून आपल्या मतदान केंद्रातील मतदारांची नावे मतदार उपस्थित असतानाही वगळली गेली असल्यास त्यांचे नमुना 6 चे फॉर्म भरणेबाबत प्रोत्साहित करणेबाबत सुचित करण्यात आले.

तसेच मतदान जनजागृतीसाठी EVM / VVPAT मशिन्सची माहितीसाठी गावोगावी प्रात्यक्षिक दाखविण्यात येत आहेत मोबाईल डेमोस्ट्रेशन व्हॅन हि मतदार संघात दि. 10/12/2023 ते दि. 31/01/2024 या कालावधीमध्ये मतदान केंद्राच्या तसेच वेगवेगळया महत्वाचे/गर्दीच्या ठिकाणी फिरत असलेबाबत निदर्शनास आणून दिले. तसेच दि. 25/01/2024 रोजी राष्ट्रीय मतदार दिवस (NVD) चा जिल्हास्तरावरील कार्यक्रम हा कर्मवीर भाउराव पाटील इंजिनिअरींग कॉलेज सातारा येथे सकाळी 11.00 वा. जिल्हाधिकारी यांचे उपस्थित होणार असुन तेथील कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली.