सातारा प्रतिनिधी । सातारा-सांगली जिल्ह्यातील धरण प्रकल्पातील उन्हाळ्यातील पाणी नियोजनासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक जलसंपदा मंत्री (कृष्णा खोरे) ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दि. १७ रोजी कोयनानगर (ता. पाटण) येथील चेंबरी विश्रामगृह येथे सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीस पालकमंत्री शंभूराज देसाई, ना. शिवेंद्रराजे भोसले, ना. जयकुमार गोरे, ना. मकरंद पाटील, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना. महेश शिंदे, आ. मनोज घोरपडे, आ. डॉ. अतुल भोसले, सातारा प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे,
सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता अरूण नाईक, दोन्ही मंडळांचे कार्यकारी अभियंता, सांगली जिल्ह्यातील आमदार, खासदार तसेच अधीक्षक अभियंता व संबंधित कार्यकारी अभियंता उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत घोम, घोम-बलवकडी, कण्हेर, उरमोडी, तारळी या मोठ्या प्रकल्पातील पाणी वाटपाच्या नियोजनावर चर्चा होणार आहे.